Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारं भ्रष्ट प्रशासन,’ मोशी कचरा डेपो अपघातावरून विजय वडेट्टीवार यांचा प्रशासनावर निशाणा

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनावर तीव्र टीका केली. भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Jul 27, 2026 | 06:36 PM
'मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारं भ्रष्ट प्रशासन,' मोशी कचरा डेपो अपघातावरून विजय वडेट्टीवार यांचा प्रशासनावर निशाणा

'मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारं भ्रष्ट प्रशासन,' मोशी कचरा डेपो अपघातावरून विजय वडेट्टीवार यांचा प्रशासनावर निशाणा

Follow Us
Follow Us:

पुण्यातील मोशी येथील कचरा डेपोत झालेल्या इमारत दुर्घटनेत नऊ निष्पाप कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यातून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. यावरूनच आता काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला असून ‘मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारं भ्रष्ट प्रशासन!’ असे म्हणत प्रशासनावर निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून पोस्ट करत जोरदार टीकास्त्र सोडले. यावरून पुन्हा एकदा मोशी कचरा डेपोचा प्रश्न उपस्थित होत आहे.

Kangana Ranaut: ‘राहुल गांधींची अवस्था त्या अस्वस्थ मांजरासारखी’; संसदेतील गदारोळावरून कंगना राणौत यांचा विरोधकावर घणाघात

नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार ?

आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून विजय वडेट्टीवार म्हणाले, “मोशी कचरा डेपोतील नऊ निष्पाप कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा अपघात नाही, तर भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि सत्तेच्या मग्रुरीने घेतलेला बळी आहे. कचऱ्याच्या ६५-७० फूट उंच ढिगाऱ्याच्या अवघ्या ३० मीटर अंतरावर प्रशासकीय इमारतीला परवानगी देणारे अधिकारी नेमकं कुणाच्या आशीर्वादाने काम करत होते? कायदे, पर्यावरणाचे नियम आणि मानवी जीव यांना पायदळी तुडवून परवानग्या वाटणाऱ्या या यंत्रणेच्या हाताला आज नऊ जणांच्या रक्ताचे डाग लागले आहेत.”

मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणारं भ्रष्ट प्रशासन! मोशी कचरा डेपोतील नऊ निष्पाप कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा अपघात नाही, तर भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि सत्तेच्या मग्रुरीने घेतलेला बळी आहे. कचऱ्याच्या ६५-७० फूट उंच ढिगाऱ्याच्या अवघ्या ३० मीटर अंतरावर प्रशासकीय इमारतीला परवानगी देणारे… pic.twitter.com/hgev9M8Zz9 — Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 27, 2026

“निष्पाप कामगार मृत्यूच्या दाढेत ढकलले”

ते पुढे म्हणाले, “PPP आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा खेळ झाला, पण सुरक्षिततेच्या नावाने शून्य काम झाले. नियम धाब्यावर बसवून कंत्राटदार, अधिकारी आणि सत्तेच्या जवळचे लोक आपली तिजोरी भरत राहिले, आणि निष्पाप कामगार मृत्यूच्या दाढेत ढकलले गेले. हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर मृतांच्या टाळूवरच लोणी खाणाऱ्या भ्रष्ट प्रशासनाचा निर्लज्ज चेहरा आहे.”

“या प्रकरणात केवळ चौकशीची घोषणा नको, तर संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधासह कठोर गुन्हे दाखल करून त्यांना तातडीने तुरुंगात पाठवले पाहिजे. प्रत्येक मृताच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. अन्यथा मोशीतील हा ढिगारा फक्त कचऱ्याचा नव्हता, तर या सरकारच्या संवेदनाहीन आणि भ्रष्ट कारभाराचा होता, हेच इतिहासात नोंदवलं जाईल,” असे म्हणत त्यांनी सडकून टीका केली.

‘बाळासाहेबांचा नातू स्वतःला झुरळ म्हणतो, तर बाप काय म्हणतो ?’ प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल

Web Title: Vijay wadettiwar slams government over moshi garbage depot accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • Moshi Building
  • pune news
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

Air Pollution: प्रदूषणाचा ‘डिलेड अटॅक’! दिल्लीत हवामानातील बदलांचा फटका ५१ तासांनंतर; IITM चा नवा खुलासा
1

Air Pollution: प्रदूषणाचा ‘डिलेड अटॅक’! दिल्लीत हवामानातील बदलांचा फटका ५१ तासांनंतर; IITM चा नवा खुलासा

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल
2

VIDEO VIRAL: ‘आई तुझा उत्साह योग्य, पण…’ पुण्यात बाळाला कडेवर घेऊन महिलेचे ढोल वादन; नेटकऱ्यांनी केले जोरदार ट्रोल

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन
3

सुनील पांडे यांची संकल्पना; विसर्जन घाटावरील गणेशोत्सव सांस्कृतिक चित्राचे मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम
4

२१ हजार पाणीपुरींपासून साकारला १३ फूटी गणपती बाप्पा; पुण्यातील गणेश भेळचा अनोखा उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.