Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चौदा गावांचा पाणी प्रश्न पूर्णत्वास नेला जाईल…; मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

खंडाळा आणि महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विजयानंतर पहिल्यांदा मतदारसंघाचा दौरा केला आहे. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 25, 2024 | 03:25 PM
warm welcome to MLA Relief and Rehabilitation Minister Makarand Patil

warm welcome to MLA Relief and Rehabilitation Minister Makarand Patil

Follow Us
Close
Follow Us:

शिरवळ : महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले आहे. यामध्ये खंडाळा आणि महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपदाचा सन्मान मिळाला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची पुणे सातारा जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या शिंदेवाडी निरा नदी पात्रालगत त्यांचे ढोल ताश्याच्या गजरात घोड्यावरून मिरवणूक आणि फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी लवकरच चौदा गावांचा पाणी प्रश्न पूर्णत्वास नेला जाईल अशी ग्वाही दिली.

तब्बल ४५ वर्षांनंतर वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपदाचा सन्मान मिळाला असून, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे आज (दि.२५ ) सातारा जिल्ह्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या हा पहिला अधिकृत जिल्हा दौरा आहे. मकरंद पाटील यांच्या स्वागतासाठी सकाळी ९ वाजता शिंदेवाडी येथे जोरदार तयारी करण्यात आली होती. स्वागत केल्यानंतर शिरवळ या ठिकाणी शिरवळ ग्रामपंचायत व सरपंच रविराज दुधगावकर यांच्याकडून स्वागत करण्यात आले. पुढे नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस्थळाची भेट देत अभिवादन केले.

महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नायगाव येथील आयोजित स्वागत समारंभात बोलताना मंत्री मकरंद पाटील यांनी मतदारसंघातील प्रलंबित चौदा गावांच्या पाणी प्रश्नाबाबत लवकरच तोडगा काढण्याची ग्वाही दिली. तसेच, देवघर प्रकल्प आणि सिंचन योजनांच्या मंजुरीबाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच त्या सुरू होतील, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री पाटील यांनी सांगितले की, “या मतदारसंघाच्या विकासासाठी महायुती सरकारने मला मंत्रीपदाची संधी दिली आहे. पाणीप्रश्न, रस्ते आणि धरणग्रस्तांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. मांढरदेवी रस्ता व इतर कनेक्टिव्हिटी प्रकल्पही लवकरच मार्गी लागतील.जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो मला मोठी जबाबदारी देतो. विरोधकांनी घराणेशाहीचा मुद्दा उचलला होता, मात्र जनतेने मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. गेल्या कार्यकाळात मंजूर झालेला शंभर कोटींचा आराखडा आता पूर्णत्वास नेण्याचा माझा संकल्प आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, उरमोडी, आणि इतर धरण प्रकल्पांच्या धरणग्रस्तांच्या समस्यांवर लवकरच न्याय दिला जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. मकरंद पाटील यांच्या जिल्हा दौऱ्यामुळे खंडाळा, महाबळेश्वर आणि वाई मतदारसंघातील जनतेत उत्साहाचे वातावरण आहे. मंत्रीपदाच्या रूपाने या भागाचा विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी फलटणचे आमदार सचिन कांबळे पाटील,जिल्हा परिषदचे अध्यक्ष उदय कबुले,पंचायत समितीचे सभापती राजेंद्र अण्णा तांबे, नितीन भरगुडे, शिरवळचे सरपंच रविराज दुधगावकर, बाळासाहेब सोळस्कर,मनोज पवार तसेच पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच उपसरपंच तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Warm welcome to mla relief and rehabilitation minister makarand patil in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 03:25 PM

Topics:  

  • political news
  • Satara News

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Modi Government : “ही BJP नाही तर भ्रष्ट जनता…; राहुल गांधींनी फोडला नवीन बॉम्ब
1

Rahul Gandhi on Modi Government : “ही BJP नाही तर भ्रष्ट जनता…; राहुल गांधींनी फोडला नवीन बॉम्ब

राष्ट्रवादीवर नाराज बाबा कांबळे यांचा भाजपला जाहीर पाठिंबा; राष्ट्रवादीकडून उमेदवारी डावल्यानंतर घेतला मोठा निर्णय
2

राष्ट्रवादीवर नाराज बाबा कांबळे यांचा भाजपला जाहीर पाठिंबा; राष्ट्रवादीकडून उमेदवारी डावल्यानंतर घेतला मोठा निर्णय

नाशिकमध्ये आज होणार ठाकरे बंधूंची पहिली सभा; मनसेसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
3

नाशिकमध्ये आज होणार ठाकरे बंधूंची पहिली सभा; मनसेसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

भाजपचे ‘मिशन 100+’ संकटात; अजित पवारांची ‘ही’ खेळी ठरतीये अडचणीची
4

भाजपचे ‘मिशन 100+’ संकटात; अजित पवारांची ‘ही’ खेळी ठरतीये अडचणीची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.