'ऑपरेशन टायगर' यशस्वी ठरलं? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला फक्त 3 खासदार उपस्थित; 6 बंडखोरांनी फिरवली पाठ
६ खासदार गेले, आता १६ आमदारांची बारी? एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर …
पक्षात पुन्हा एकदा फूट पडण्याच्या चर्चांना उधाण आले असून, बंडखोर खासदारांचा एक गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. ही बैठक अशा वेळी होत आहे, जेव्हा एक दिवसापूर्वी बंडखोर गटाने लोकसभेतील पक्षाच्या नऊ खासदारांपैकी सहा खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती समोर आली. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उद्धव ठाकरे गटाने आपल्या सर्व नऊ खासदारांना दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी पक्षाने ‘थ्री-लाइन व्हीप’ जारी करत सर्व खासदारांना वैयक्तिकरित्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीला कोणते खासदार उपस्थित राहतात आणि कोण गैरहजर राहतात, यावरून नेमके किती खासदार बंडखोर गटात आहेत, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, काही काळ खासदारांची वाट पाहिली जाईल. त्यानंतर तात्काळ कारवाई सुरू करण्यात येईल. त्यांनी महायुतीवर हल्लाबोल करत आरोप केला की, शिवसेना (UBT)च्या खासदारांचे ‘हायजॅकिंग’ केले जात आहे. पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, संसदीय मंडळाच्या बैठकीला सहा खासदार उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांच्याविरोधात अपात्रतेची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते.
नाराजी व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले, “लोकशाहीचा हा खेळ लावला आहे का? देशाची प्रतिष्ठा, नियम आणि संविधानाशी खेळ सुरू आहे. आम्ही मेहनत करून निवडून येतो आणि तुम्ही आमच्या खासदारांचे अपहरण करत आहात.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान परदेश दौऱ्यावर आहेत, पण देशात काय सुरू आहे तेही त्यांनी पाहावे.”
शिवसेना (यूबीटी) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पक्षात फूट पडण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर आपल्या विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. राऊत म्हणाले की, शिवसेना एकदा तुटली आहे, पण आता पुन्हा तोडण्याचा प्रयत्न करातात. ते म्हणाले, “आमच्या वडिलांचे नाव बाळासाहेब ठाकरे आहे, आम्ही घाबरणार नाही.” राऊत यांनी इशारा दिला की, पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तुरुंगात जावे लागले तरी धडा शिकवला जाईल. ते म्हणाले की, शिवसेना ईडी आणि सीबीआयच्या धमक्यांना घाबरत नाही, कारण त्यांना यापूर्वी तुरुंगवास भोगावा लागला आहे.
Operation Tiger : ‘सहा खासदार शिंदे गटात येणार’; संजय गायकवाडांचा दावा …






