Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurg: विधानसभा निवडणूकीसाठी भाजपची आढावा बैठक; काय असेल महायुतीची रणनिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची जोरदार तयारी सुरु,कार्यकर्त्यांशी साधणार संवादसाठी बाैठकीचं आयोजन करण्यात आलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 11, 2024 | 03:01 PM
Sindhudurg: विधानसभा निवडणूकीसाठी भाजपची आढावा बैठक; काय असेल महायुतीची रणनिती
Follow Us
Close
Follow Us:

कणकवली/ प्रगत लोके: विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत माहायुती आणि राणे कुटुंब अ‍ॅक्शन मोडवर काम करताना दिसून येत आहेत. अशातच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीची भव्य प्रचारसभेचं आयोजन होणार आहे. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची प्रमुख हजेरी असणार आहे, असं जाहीर करण्यात आलं आहे. कणकवली विधानसभा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ व निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सचिव विनोद तावडे कोकण दौऱ्यावर दि .१२ नोव्हेंबर रोजी येत आहेत. कणकवली विधानसभेतील निवडणुकीचा आढावा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे,माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती भाजपा विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे यांनी दिली.

हेही वाचा-“उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री होण्यासाठी…. “; रावसाहेब दानवेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,कणकवली तालुका मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे १२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता कणकवली प्रहार भवन येथे कणकवली तालुका आढावा बैठक होणार आहे.दुपारी ३ वाजता फणसगाव येथे डॉ.सर्वेश नारकर यांच्या घरी बैठक होणार आहे.त्यानंतर वैभववाडी भाजपा कार्यालयात तालुक्याची आढावा बैठक ५ वाजता होणार आहे. या बैठकीला सर्व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे,असे मनोज रावराणे यांनी सांगितले.

हेही वाचा- “राणेंच्या कार्यकर्त्यांकडून निविदासाठी ठेकेदारांना धमक्या” ;परशुराम उपरकरांचा आरोप

कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे यांचा सर्वात मोठा विजय होणार आहे. तशी तयारी भारतीय जनता पार्टी कडून सुरु आहे.भविष्यात आ.नितेश राणे यांच्या विरोधात विरोधी पक्षाचा उमेदवार उभा राहताना विचार करेल, एवढा मोठा विजय नितेश राणेंचा असेल असा विश्वास मनोज रावराणे यांनी व्यक्त केला.

भाजप विरुद्ध ठाकरे गट

सध्या कणकवली आणि सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजप आणि ठाकरे गट यांच्यात चुरशीची लढत दिसत आहे. याचं कारण म्हणजे नितेश राणे आणि परशुराम उपरकर यांचे एकमेकांवर होणारे आरोप प्रत्यारोेप. उपरकर यांनी काही दिवसांपूर्वीच राणेंवर टीका केली होती. उपरकर म्हणाले की, दापोली ची सभा आणि चिपळूणच्या सावंतांना मारहाण झाल्यानंतर निलेश राणेंची जी बोलण्याची पद्धत आहे, त्यावर निलेश राणे यांनी आवर घातलेला असला तरी, येणाऱ्या २३ नोव्हेंबर ला निलेश राणे पडल्यानंतर सोबतच्या कार्यकर्त्यांना हवं ते बोलतील. निलेश राणे शांत झाले तरी लोक त्यांना निवडून देणार नाही. लोकांना राणेंची दहशत आणि राणेंच्या दोन्ही मुलांची दहशत लोकांच्या स्मरणात आहे. दापोलीच्या सभेत महिलांबद्दल जे काय बोललात किंवा एखाद्याला कशा पद्धतीने शिव्या घालता हे सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळे निलेश राणे या २० दिवसासाठी जरी गप्प राहिले. तरी ते नंतर गप्प राहणार नाही ते त्यांच्या स्वभावाप्रमाणे वागणार आहेत. हे लोकांनी लक्षात ठेवावे.

 

 


Web Title: Will interact with activists of sindhudurg district special presence of vinod tawde at the meeting of mahayuti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 02:54 PM

Topics:  

  • BJP
  • Narayan Rane
  • Nitesh Rane
  • Vinod Tawde

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.