Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur ZP Elecection : निवडणुकीसाठी चुरशीची लढत; राधानगरी तालुक्यात राजकीय वातावरण शिगेला

राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असून सर्वच प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केल्याने लढत बहुरंगी लढती झाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 24, 2026 | 06:13 PM
Kolhapur ZP Elecection : निवडणुकीसाठी चुरशीची लढत; राधानगरी तालुक्यात राजकीय वातावरण शिगेला
Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणुकीसाठी चुरशीची लढत;
  • राधानगरी तालुक्यात राजकीय वातावरण शिगेला
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असून सर्वच प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केल्याने लढत बहुरंगी लढती झाली आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी पाच गट तर पंचायत समितीसाठी दहा गण असून प्रत्येक ठिकाणी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्जाच्या छाननीत जिल्हा परिषद १०७ अर्ज आणि पंचायत समिती २०३ अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. पाच ही मतदार संघात पंचरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढती होणार आहेत.

या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस व काही अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने पंचरंगी लढत स्पष्ट झाली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून उमेदवार घरोघरी जाऊन जोरदार प्रचार करत आहेत. भाजपाकडून भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रविश पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी प्रचारात सक्रिय आहेत. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गटाकडून सर्व गटांत उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचार यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत आहे. दरम्यान आरपीआय (गवई गट), आरपीआय (आठवले गट), आम आदमी पार्टी, जनता दल आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत पाठिंबा मिळवण्यासाठी उमेदवारांकडून जुळवाजुळव सुरू आहे. पहिल्या टप्प्यातच तर्क-वितर्काना उधाण आले असून काही ठिकाणी निकालाबाबत पैजाही रंगू लागल्या आहेत. राधानगरी तालुक्यातील ही निवडणूक अत्यंत हायव्होल्टेज ठरणार असून नेमकी बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Navi Mumbai : पालिकेत समाविष्ठ भागातील नगरसेवकांना महापौर पदाची संधी द्या; स्थानिक मतदारांची मागणी

महायुतीतील घटक पक्षांत झाली बिघाडी

काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे केडीसीसी बँकेचे ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांचे सर्व कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले असून आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जात आहे. काँग्रेसच्या प्रचारात राहुल पाटील गट (भोगावती साखर कारखाना संचालक गट) सक्रिय झाला आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला शेतकरी कामगार पक्षाचा अधिकृत पाठिंबा मिळाला असून तालुक्यातील पाचही गटांत एकमुखी उमेदवार देण्यात आले आहेत. मात्र महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकमत न झाल्याने भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह प्रत्येक पक्षाने स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

कसबा तारळे गटात दिग्गज उमेदवार रिंगणात

महिला आरक्षित कसबा तारळे गटात दिग्जज उमेदवार उतरले आहेत. भाजपाच्या ऋतुज राविश पाटील कौलवकर, काँग्रेसकडून भाग्यश्री धीरज डोंगळे, राष्ट्रवादी अजित पवान गटामार्फत अमृता अरुण डोंगळे, शिवसेना शिंदे गटाकडून राजश्री अमृत पाटील यांच्यात चुरशीची लढत पहावयास मिळत आहे.

चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार; गटनेतेपदी सुरेंद्र अडबाले गट फायनल

Web Title: Zp elecection tight contest for the election political atmosphere at its peak in radhanagari taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • kolhapur news
  • political news

संबंधित बातम्या

Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित
1

Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?
2

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?

चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार; गटनेतेपदी सुरेंद्र अडबाले गट फायनल
3

चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार; गटनेतेपदी सुरेंद्र अडबाले गट फायनल

कर्नाटकात 2500 कोटींचा घोटाळा; भाजपचा गंभीर आरोप, ‘या’ मंत्र्याची केली गेली राजीनाम्याची मागणी
4

कर्नाटकात 2500 कोटींचा घोटाळा; भाजपचा गंभीर आरोप, ‘या’ मंत्र्याची केली गेली राजीनाम्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.