
कर्जत तालुक्यात होणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची सात फेब्रुवारी रोजी होणार असून या निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी दिली.तालुक्यात 9 – कळंब,10- कशेळे,11- माणगाव तर्फे वरेडी,12- नेरळ,13- कडाव, 14- मोठे वेणगाव असे सहा जिल्हा परिषद आहेत.तर कर्जत पंचायत समितीचे 12गण असून त्यात पोशीर,कळंब,पाथरज,कशेळे, माणगाव तर्फे वरेडी,उकरूल,नेरळ, दामत,वाकस,कडाव,मोठे वेणगाव, बीड बुद्रुक असे गण आहेत.
तालुक्यात या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कळंब जिल्हा परिषद गटात 36 मतदान केंद्र असून पंचायत समितीचे दोन्ही गणामध्ये प्रत्येकी 18 केंद्र आहेत.कशेळे गटामध्ये एकूण 37 मतदान केंद्र असून येथील पाथरज गणात 21 तर कशेळे गणात 16 मतदान केंद्र आहेत. माणगाव तर्फे वरेडी गटामध्ये एकूण 38 मतदान केंद्र असून माणगाव गणामध्ये 21 तर उकरूल गणांमध्ये 17 मतदान केंद्र आहेत. नेरळ जिल्हा परिषद गटामध्ये 40 मतदान केंद्र असून नेरळ गणामध्ये सर्वाधिक 23 मतदान केंद्र असून दामत गणामध्ये 17 मतदान केंद्र आहेत.कडाव जिल्हा परिषद गटामध्ये 34 मतदान केंद्र असून त्यातील वाकस गणामध्ये 15 तर कडाव गणामध्ये 19 मतदान केंद्र आहेत.मोठे वेणगाव गटामध्ये 35 मतदान केंद्र असून त्यातील वेणगाव गण मध्ये 16 तर बीड बुद्रुक गण मध्ये 19 मतदान केंद्र आहेत.
कर्जत तालुक्यात पेठ आणि तुंगी अशी दोन मतदान केंद्र ही दुर्गम मतदान केंद्र असून तेथे थार गाडी मधून मतदान साहित्य आणि मतदान कर्मचारी यांना पाठवले जाणार आहे.तर ढाक आणि कळकराई अशी दुर्गम भागातील दोन मतदान केंद्र हलवण्यात आली आहेत.तालुक्यात एकही संवेदनशील किंवा अती संवेदनशील मतदान केंद्र नाही. तालुक्यातील सर्व 220 मतदान केंद्रासाठी साधारण 1400 मतदान अधिकारी कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.तर तालुक्यात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कर्जत,नेरळ आणि पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि सर्व पोलिस कर्मचारी तैनात असणार आहेत.त्यात 12 अधिकारी पोलिस आणि .. कर्मचारी यांचा समावेश असून पोलिसांच्या मदतीला 500 होमगार्ड देखील तैनात असतील.
मतदानासाठी अधिकारी कर्मचारी
प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष,तीन सहायक,एक शिपाई आणि एक सुरक्षा कर्मचारी तैनात असणार आहेत.