Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navnath Gatha : हत्तीच्या कानातून जन्मला तेजस्वी बालक; कानिफनाथ महाराज हिमालयातून महाराष्ट्रात कसे आले ?

नवनाथ म्हणजे नऊ नारायण. यांपैकी पाचवे नाथ म्हणजे कानिफनाथ. आता या कानिफनाथांचा जन्म कसा झाला ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 02, 2026 | 01:00 PM
Navnath Gatha : हत्तीच्या कानातून जन्मला तेजस्वी बालक; कानिफनाथ महाराज हिमालयातून महाराष्ट्रात कसे आले ?
Follow Us
Follow Us:
  • हत्तीच्या कानातून जन्मला तेजस्वी बालक;
  • कानिफनाथ महाराज हिमालयातून महाराष्ट्रात कसे आले ?
नवनाथ म्हणजे नऊ नारायण. यांपैकी पाचवे नाथ म्हणजे कानिफनाथ. आता या कानिफनाथांचा जन्म कसा झाला ते जाणून घेऊयात. तर गोष्ट अशी की, बद्रीनाथ आश्रमात एकदा भगवान महादेव, अग्नीदेव आणि जालिंदरनाथ बसले होते. त्यावेळी महादेव म्हणाले की, हिमालयाच्या पर्वताच्या परिसरात एका हत्तीच्या कानातून नाराय़णांनी जन्म घेतला आहे. त्यावेळी जालिंदरनाथ त्यांना शोधायला निघाले. जालिंदरनाथांनी हाक मारली ‘हे प्रबुद्ध नारायणा तुम्ही कुठे आहात’? त्यावेळी एक धिप्पाड हत्ती समोर आला त्या हत्तीच्या कानातून एक सोळा वर्षाचा बालक आला.

सूर्याचं देखील तेज फिकं पडेल असा तो तेजस्वी बालक होता. हत्तीच्या कानातून याचा जन्म झाला म्हणून जालिंदरनाथांनी या मुलाचं नाव कानिफनाथ असं ठेवलं. आणि या विश्वाच्या कल्याणासाठी म्हणून कानिफनाथ हिमालयातून मढीच्या दिशेने निघाले. कानिफनाथ महाराजांनी पहिल्यांदा जिथे वास्तव्य केलं ते आणि संजिवन समाधी घेतली ते ठिकाण म्हणजे मढी. असं म्हणतात की, मढी म्हणजे नाथसंप्रदायातील भक्तांसाठी साक्षात पंढरीच. अहिल्यानगरमधील हे मढी येथे कानिफनाथ महाराजांनी अनेक लीला आणि चमत्कार केले. तंत्र, मंत्र आणि योग विद्येचं माहेरघर मढीला म्हटलं जातं. कानिफनाथांचं हे मंदिर गड किल्यासारखं दिसतं या गडाला अध्यात्मिक बाजू आहे तशी ऐतिहासिक बाजू देखील आहे. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी राणी येसूबाई आणि शंभूराजांचा मुलगा शाहूमहाराज यांना मोघलांनी याच परिसरांत काही काळ नजरकैदेत ठेवलं होतं. नाथसंप्रदायातील अनेक भक्त आवर्जून कानिफनाथांच्या दर्शनास मोठ्या भक्तीभावाने येतात.

 

.Navnath Gatha : गाथा नवनाथांची; दत्तसंप्रदायात नवनाथांचं महत्व काय ?

असं म्हणतात की, जेव्हा अन्याय अत्याचार वाढू लागले तेव्हा नारायणांनी म्हणजेच भगवान विष्णू यांनी नवनाथांचा अवतार घेतला. लोकांना अध्यात्म आणि भक्तीमार्ग काय आहे ? काय चांगलं काय वाईट हे त्यांनी समजावून सांगितलं. आजंही कानिफनाथांच्या गुहेत गेल्यावर ओम असा ध्वनी ऐकू येतो, असं भाविक सांगतात. अहिल्यानगर जिल्ह्यात आजंही कानिफनाथांचे अनेक भक्त आहेत. खरंतर हा जिल्हाच कानिफनाथांच्या समाधीमुळे ओळखला जातो.

Navnath Gatha : माशाच्या गर्भातून जन्मला तेजस्वी बालक , मच्छिंद्रनाथांच्या जन्माचं रहस्य ? 

 

 

 

Web Title: A bright child was born from an elephants ear how did kanifnath maharaj come from the himalayas to maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 12:34 PM

Topics:  

  • hindu religion
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Superstitions: खरंच मांजर आडवं गेल्याने घडतात अशुभ घटना? लिंबू-मिरची, दही-साखरसारख्या लोकमान्यतेमागील सत्य काय
1

Superstitions: खरंच मांजर आडवं गेल्याने घडतात अशुभ घटना? लिंबू-मिरची, दही-साखरसारख्या लोकमान्यतेमागील सत्य काय

Atma Parmatma: ही सृष्टी नक्की कोणाच्या तालावर? आत्मा आणि परमात्मा फरक काय
2

Atma Parmatma: ही सृष्टी नक्की कोणाच्या तालावर? आत्मा आणि परमात्मा फरक काय

महर्षी अत्रि आणि सूर्यग्रहणाची कथा; जाणून घ्या वैदिक परंपरेतील खगोलशास्त्राचा इतिहास
3

महर्षी अत्रि आणि सूर्यग्रहणाची कथा; जाणून घ्या वैदिक परंपरेतील खगोलशास्त्राचा इतिहास

Katas Raj Temple: पाकिस्तानातील कटसराज मंदिर का आहे हिंदूंसाठी पवित्र? जाणून घ्या भगवान शंकरांच्या अश्रूंशी काय आहे संबंध
4

Katas Raj Temple: पाकिस्तानातील कटसराज मंदिर का आहे हिंदूंसाठी पवित्र? जाणून घ्या भगवान शंकरांच्या अश्रूंशी काय आहे संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.