Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Ekadashi Special: भगवान विठ्ठलांच्या गळ्यात वैजयंती माळा का असते, जाणून घ्या त्यामागील कारणे

भगवान विठ्ठलांच्या गळ्यातील वैजयंती माळा ही श्रीविष्णूंचे दिव्य स्वरूप, विजय आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात त्यावेळी त्यांच्या गळ्यातील या पवित्र माळेकडे अनेकांचे लक्ष वेधले जाते. वैजयंती माळ का धारण केली जाते ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 22, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • भगवान विठ्ठलांच्या गळ्यात वैजयंती माळा का असते
  • वैजयंती माळा म्हणजे काय
  • आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व
 

 

भगवान विठ्ठलांच्या गळ्यातील वैजयंती माळा ही केवळ एक अलंकार नसून श्रीविष्णूंचे दिव्य स्वरूप, विजय आणि भक्तीचे प्रतीक मानली जाते.  आषाढी एकादशी शनिवार, 25 जुलै रोजी आहे.  आषाढी एकादशीच्या निमित्ताने जाणून घ्या विठ्ठलांच्या या पवित्र माळेमागील धार्मिक आणि पौराणिक महत्त्व.

वैजयंती माळा म्हणजे काय?

वैजयंती या शब्दाचा अर्थ विजय प्राप्त करून देणारी असा होतो. पुराणांनुसार ही माळ भगवान श्रीविष्णूंची अत्यंत प्रिय माळ मानली जाते. भगवान विठ्ठल हे श्रीविष्णूंचेच अवतार असल्यामुळे त्यांच्या गळ्यातही वैजयंती माळा धारण केलेली दाखवली जाते.

वैजयंती माळा विजय आणि भक्तीचे प्रतीक आहे

भगवान विठ्ठलांच्या गळ्यात दिसणारी वैजयंती माळ ही केवळ अलंकरा नसून विजय, भक्ती, पवित्रता आणि भगवान विष्णूंच्या पवित्र्याची ओळख मानली जाते. विठ्ठल हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जात असल्याने त्यांच्या गळ्यात वैजयंती माळ असते. वैजयंती या शब्दाचा अर्थ विजय मिळवून देणारी किंवा नेहमी विजयी असणारी. पुराणानुसार भगवान विष्णू नेहमी वैजयंती माळ धारण करतात त्यामुळेच विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये नेहमी ही माळ दाखवली जाते.

Ashadhi Wari 2026: वारीत पाय लागल्यानंतर ‘माऊली, चला पुढे’ का म्हणतात? जाणून घ्या वारकरी परंपरेचे तत्त्वज्ञान

ही माळ पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करते

धार्मिक परंपरेनुसार ही माळ पाच प्रकारचया पवित्र मण्यांपासून किंवा बियांपासून तयार केली जाते. या पाच मण्यांना पंचमहाभूताच प्रतीक मानलं जातं. पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश. याचा अर्थ भगवान संपूर्ण सृष्टीचे अधिपती आहेत आणि सर्व पंचमहाभूतावरती त्याचं अधिराज्य आहे. असं मानलं जातं की, भगवान विष्णूंनी असुरावरती विजय मिळवल्यानंतर वैजयंती माळ धारण केली. त्यामुळे ती धर्माच्या विजयाच आणि अधर्मावरती मात करण्याचं प्रतीक मानले जाते.

अहंकार, लोभ आणि क्रोधावर विजय मिळवण्याचा संदेश देते

वारकरी संप्रदायात वैजयंती माळ हा केवळ दागिना नसून ती भक्ताला सांगते अहंकारावरती विजय मिळवा. लोभ, क्रोध, मत्सर यावरती नियंत्रण ठेवा. भक्ती, प्रेम आणि नामस्मरण हेच काय ते वैभव आहे म्हणूनच विठ्ठलाच्या गळ्यातील वैजयंती माळ ही आत्मिक विजयाचं प्रतीक मानले जाते. लोकपरंपरेत सांगितलं जातं एकदा देवांनी भगवान विष्णूंना विचारलं, प्रभू तुमचा सर्वांत मोठा अलंकार कोणता? भगवान विष्णू म्हणाले, माझ्या भक्तांच प्रेम हीच खरी माझ्यासाठी वैजयंती माळ आहे. ही कथा पुराणातील शब्दशः घटना नसली तरी तिचा संदेश वारकरी परंपरेशी सुसंगत आहे.

Ashadhi Wari 2026: वारकरी गोपीचंदन का लावतात, जाणून घ्या त्यामागील कारणे

आत्मिक विजय आणि समर्पणाची प्रेरणा देते

भगवंताला दागिन्यापेक्षाही भक्ती अधिक प्रिय असते. विठ्ठलांच्या गळ्यातील वैजयंती माळ ही भगवान विष्णूंच्या स्वरुपाशी, धर्माच्या विजयाशी, पंचमहाभूतांच्या एकात्मतेची आणि भक्तीच्या श्रेष्ठत्वाची प्रतीक आहे. वारकरी परंपरेत ती भक्ताला बाह्य विजयांपेक्षा स्वतःच्या मनावरती विजय मिळविण्याची प्रेरणा देणारी मानली जाते.

आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व

आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरामध्ये येतात. या दिवशी भगवानांच्या गळ्यातील वैजयंती माळेचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. श्रद्धेनुसार, विठ्ठलाचे नामस्मरण आणि भक्तिभावाने दर्शन घेतल्यास जीवनात सुख, शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वारकऱ्यांच्या गळ्यात वैजयंती माळ का असते?

    Ans: भगवान विठ्ठलांप्रती भक्ती, समर्पण आणि नामस्मरणाचे प्रतीक म्हणून वारकरी वैजयंती माळ धारण करतात.

  • Que: वैजयंती माळेचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: ही माळ विजय, पवित्रता, पंचमहाभूतांचे संतुलन आणि भगवान विष्णूंचे प्रतीक मानली जाते.

  • Que: वैजयंती माळ आणि भगवान विठ्ठल यांचा संबंध काय आहे?

    Ans: विठ्ठल हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जात असल्याने त्यांच्या गळ्यात वैजयंती माळ दर्शवली जाते.

Web Title: Ashadhi ekadashi special why is there a vyjayanti mala around lord vitthal neck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Ashadhi Ekadashi
  • Ashadhi Wari
  • Warkari Sect

संबंधित बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेची मोठी भेट! दादर-पंढरपूर दरम्यान सुटणार २ विशेष गाड्या; पाहा पूर्ण वेळापत्रक
1

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेची मोठी भेट! दादर-पंढरपूर दरम्यान सुटणार २ विशेष गाड्या; पाहा पूर्ण वेळापत्रक

Ashadhi Wari 2026: पंढरपूरची चंद्रभागा इतकी पवित्र का मानली जाते? जाणून घ्या वारकरी परंपरेतील विशेष स्थान
2

Ashadhi Wari 2026: पंढरपूरची चंद्रभागा इतकी पवित्र का मानली जाते? जाणून घ्या वारकरी परंपरेतील विशेष स्थान

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम
3

Chaturmas 2026: २५ जुलैपासून सुरू होणार चातुर्मास; जाणून घ्या महत्त्व आणि धार्मिक नियम

Ashadhi Wari 2026 : वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हसवडमध्ये प्रतिपादन
4

Ashadhi Wari 2026 : वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हसवडमध्ये प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.