Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadhi Wari 2026: वारकरी गोपीचंदन का लावतात, जाणून घ्या त्यामागील कारणे

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या कपाळावर लावलेले गोपीचंदन हे केवळ धार्मिक चिन्ह नसून वैष्णव भक्ती, शुद्धता आणि श्रीविठ्ठलावरील अखंड श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. वारकरी संप्रदायात गोपीचंदनाला विशेष आध्यात्मिक महत्त्व असून, ते धारण केल्याने मन शुद्ध राहते आणि भगवान विष्णू तसेच विठ्ठलाची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 19, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • वारकरी गोपीचंदन का लावतात
  • गोपीचंदनाची काय आहे कथा
  • वारकरी टिळा कसा लावतात
 

वारकरी संप्रदायातील भक्त कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावतात. हा केवळ धार्मिक अलंकार नसून भक्ती, वैराग्य आणि भगवान विठ्ठलांवरील अखंड श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं. गोपीचंदन ही अत्यंत पवित्र माती आहे. वैष्णव परंपरेनुसार ती विशेष पवित्र स्थळातील माती मानली जाते. या मातीपासून टिळा करून भगवान विष्णू आणि विठ्ठलाचं स्मरण केलं जातं. आता वारकरी गोपीचंदन का लावतात ते जाणून घेऊया

गोपीचंदनाचा टिळा म्हणजे मी विठ्ठलाचा भक्त आहे अशी ओळख. वारकरी हा टिळा लावून प्रत्येक क्षणी विठ्ठलाचं स्मरण करतो. वारकरी संप्रदाय हा वैष्णव परंपरेशी निगडित आहे त्यामुळे गोपीचंदनाचा उभा टिळा लावण्याची परंपरा वैष्णव परंपरेत आहे. उभ्या टिळ्याच्या दोन रेषा भगवान विष्णूंच्या चरणाचं प्रतीक मानलं जातं. कपाळ हे ईश्वराचं स्मरण करण्याचं स्थान असल्याने हा टिळा भक्ताला नम्रतेची जाणीव करून देतो. गोपीचंदन मातीची असल्यामुळे ती मनुष्याला आठवण करून देते की शरीर हे मातीचे आहे आणि एक दिवस मातीतच विलीन होणार. त्यामुळे अहंकरा सोडून भक्तीभावान जगावं हा संदेश त्यातून मिळतो. भूमध्यावरती टिळा लावल्याने पूजा, नामस्मरण किंवा ध्यान करताना मन अगदी केंद्रित होते. गोपीचंदनामागे एक कथा देखील सांगितली जाते.

Ashadhi Wari 2026: रुक्मिणी मातेची मानाची पालखी का आहे विशेष? जाणून घ्या ४०० वर्षांची गौरवशाली परंपरा

गोपीचंदनाची कथा

असं मानलं जातं, भगवान श्रीकृष्ण वृंदावन सोडून द्वारकेला गेल्यानंतर गोपी त्यांच्या विरहाने व्याकूळ झाल्या त्यांचे श्रीकृष्णावरील प्रेम सांसारिक नव्हते तर पूर्णतः निस्वार्थ, निष्पाप आणि ईश्वर भक्तीने ओतप्रोत भरलेले होते. श्रीकृष्णांच्या स्मरणात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केलं. लोकश्रद्धनेनुसार गोपीच्या या अखंड भक्तीने आणि प्रेरणेने पावन झालेली भूमी पुढे गोपीचंदन म्हणून प्रसिद्ध झाली म्हणूनच गोपीचंदनाचा टिळा हा कपाळावरील केवळ धार्मिक चिन्ह नसून तो श्रीकृष्णांवरील निस्सीम प्रेम, संपूर्ण समर्पण आणि अखंड नामस्मरणाचे प्रतीक मानला जातो.

Ashadhi Ekadashi Special: पंढरीचा पांडुरंग आणि तिरूमलाचा व्यंकटेश या दोन्ही रूपांमागील साम्य काय? जाणून घ्या

वारकरी टिळा कसा लावतात

गोपीचंदन पाण्यात उबाळलं जातं. कपाळावरती दोन उभ्या रेषा काढल्या जातात मध्ये काळा बुका किंवा कुंकू लावण्याची काही ठिकाणी परंपरा आहे. टिळा लावताना विठ्ठलाचं नामस्मरण केलं जातं. म्हणूनच पंढरपूरच्या वारीत हजारो वारकरी गळ्यात तुळशीची माळ आणि कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावून ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल असा गजर करत भक्तीचा अनोखा संदेश जगभर पोहोचवतात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वारकरी गोपीचंदन का लावतात?

    Ans: गोपीचंदन हे वैष्णव संप्रदायाचे पवित्र चिन्ह मानले जाते. ते भगवान विठ्ठल आणि श्रीविष्णूप्रती भक्ती, शुद्धता आणि समर्पण व्यक्त करण्यासाठी लावले जाते.

  • Que: गोपीचंदन म्हणजे काय?

    Ans: गोपीचंदन ही एक पवित्र माती असून, धार्मिक परंपरेनुसार ती द्वारका परिसराशी संबंधित मानली जाते. तिच्यापासून वैष्णव तिलक लावला जातो.

  • Que: गोपीचंदन लावण्याचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: गोपीचंदन धारण केल्याने मन शुद्ध राहते, सात्त्विकता वाढते आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.

Web Title: Ashadhi wari 2026 reasons why warkaris apply gopichandan on their foreheads

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Ashadhi Wari 2026
  • Warkari Sect

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.