Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Avoid gifts on Raksha Bandhan: बहिणीसाठी राखीचं गिफ्ट घेताय? ‘या’ ५ वस्तू चुकूनही देऊ नका!

Avoid gifts on Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. मात्र काही जुन्या समजुती आणि वास्तुशास्त्राशी संबंधित मान्यतांनुसार या गोष्टी देणं टाळा. नाहीतर, बहीण-भावाच्या नात्यामध्ये अंतर येण्याची शक्यता असते. जाणून घ्या.. कोणत्या गोष्टी देणं टाळावे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 25, 2026 | 03:55 PM
Avoid gifts on Raksha Bandhan: बहिणीसाठी राखीचं गिफ्ट घेताय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Avoid gifts on Raksha Bandhan: बहिणीसाठी राखीचं गिफ्ट घेताय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • काही मान्यतांनुसार चाकू-कात्रीसारख्या धारदार वस्तू टाळल्या जातात.
  • रिकामी पर्स देण्याऐवजी त्यात थोडी रक्कम ठेवण्याची प्रथा आहे.
  • घड्याळ, रुमाल आणि काळ्या वस्तूंबाबतही काही श्रद्धा प्रचलित आहेत.
रक्षाबंधन म्हटलं की घरात वेगळीच लगबग सुरू होते. बहिणीच्या आवडीची राखी, गोडधोड आणि भावाकडून मिळणारी भेट याची उत्सुकता असते. यंदा 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या सुख-दुःखात कायम सोबत राहण्याचे आश्वासन देतो. भेटवस्तू ही या सणाचा एक सुंदर भाग आहे. बहिणीला तिच्या आवडीची वस्तू देऊन भाऊ आपले प्रेम व्यक्त करतो. मात्र काही जुन्या समजुती आणि वास्तुशास्त्राशी संबंधित मान्यतांनुसार, काही वस्तू भेट देताना टाळल्या जातात. अर्थात, या गोष्टी श्रद्धेवर आधारित आहेत. तरीही तुम्ही अशा परंपरा पाळत असाल, तर खालील वस्तूंचा विचार करूनच गिफ्ट निवडू शकता. Avoid gifts on Raksha Bandhan:

घड्याळ देणे टाळा

घड्याळ ही उपयोगी वस्तू असली तरी देणे टाळा. कारण घड्याळाला काळाच्या प्रवाहााशी जोडले गेले आहे. त्यामुळे भावा-बहीणीच्या गोड नात्यातील चांगली ऊर्जा कमी करण्याचे काम घड्याळ करते. शकतो घड्याळ देणे टाळावे,

रुमाल

रुमाल दिसायला छोटा असला, तरी तो देत नाही, कारण जुन्या समजुतीनुसार त्याचा संबंध अश्रुसोबत ते म्हणजे दु:खाशी जोडले जाते. त्यामुळे आनंदाच्या दिवशी बहिणीला रुमाल भेट देऊ नये.

चाकू-कात्रीसारख्या वस्तू

स्वयंपाकघरातील वस्तू किंवा इतर उपयोगी साहित्य भेट देण्याचा विचार असेल तर धारदार वस्तू निवडताना काळजी घ्या. चाकू, कात्री किंवा तत्सम वस्तूंना काही परंपरांमध्ये नातं तोडण्याचे किंवा वाद वाढण्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अशा वस्तूंपेक्षा दुसरा पर्याय निवडणे पसंत केले जाते.

काळ्या रंगाच्या वस्तूंबाबतही श्रद्धा

काळा रंग अनेकांना आवडतो आणि काळ्या रंगाचे कपडे किंवा वस्तू वापरण्यात काहीच गैर नाही. मात्र वास्तुशास्त्र आणि ज्योतिषाशी संबंधित काही मान्यतांमध्ये रक्षाबंधनाच्या भेटीसाठी काळ्या वस्तू शुभ मानल्या जात नाहीत. त्यामुळे श्रद्धा जपायची असेल तर दुसरा रंग निवडता येईल.

रिकामी पर्स देऊ नका

बहिणीला पर्स देण्याचा विचार करत असाल तर एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा. पर्स अगदी रिकामी देण्याऐवजी त्यात एखादी छोटी रक्कम ठेवण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. यामागे घरात पैसा आणि समृद्धी कायम राहावी, अशी भावना जोडली जाते. त्यामुळे पर्ससोबत थोडे पैसे ठेवून ती भेट देणे शुभ मानले जाते.

परफ्यूमही काहीजण टाळतात

परफ्यूम, बॉडी स्प्रे किंवा सुगंधी वस्तू तरुणांमध्ये लोकप्रिय भेट आहेत. मात्र काही धार्मिक समजुतींनुसार सुगंध हळूहळू कमी होतो, म्हणून त्याचा संबंध नात्यातील दुराव्याशी जोडला जातो. त्यामुळे श्रद्धेनुसार भेटवस्तू निवडणाऱ्यांनी हा पर्याय टाळण्याचे सांगितले जाते.

काचेच्या वस्तूंचाही विचार करा

काचेची वस्तू दिसायला सुंदर असते, पण ती सहज तुटू शकते. याच कारणामुळे काही परंपरांमध्ये काचेच्या वस्तूंना नात्यातील नाजूकपणाचे प्रतीक मानले जाते. रक्षाबंधनासाठी भेट घेताना अशा वस्तूंऐवजी टिकणारी आणि उपयोगी गोष्ट देणे अधिक चांगले मानले जाते.

Raksha Bandhan 2026 During Panchak: रक्षाबंधनापूर्वीच्या पंचक काळात राखी विकत कुरियर करणे शुभ की अशुभ? जाणून घ्या..

चप्पल, बूट किंवा बेल्ट?

चामड्याच्या वस्तूंबाबतही काही धार्मिक आणि वास्तुशी संबंधित समजुती आहेत. बूट, चप्पल किंवा बेल्ट यांसारख्या वस्तू भेट देणे काहीजण टाळतात. यामागे नात्यात अंतर निर्माण होण्याची श्रद्धा जोडली जाते.

शेवटी, भेटवस्तूची खरी किंमत तिच्या किमतीत नसते. भावाने बहिणीसाठी मनापासून निवडलेली छोटीशी वस्तूही तिच्यासाठी खास असू शकते. त्यामुळे कोणतीही भेट देण्यापूर्वी बहिणीची आवड, गरज आणि तुमचे नाते यांचा विचार करणे सर्वात महत्त्वाचे आहे.

Raksha Bandhan 2026: सोन्याची वा चांदीची राखी बांंधण्याचे नियम, करू नका ‘ही’ चूक

टीप : वरील माहिती विविध धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि वास्तुशास्त्रातील मान्यतांवर आधारित आहे. या दाव्यांना वैज्ञानिक आधार असल्याचे येथे सांगितलेले नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा उद्देश नाही. कोणताही निर्णय घेताना स्वतःचा विवेक वापरावा.

Web Title: Avoid gifts on raksha bandhan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Marathi News
  • Rakhi Pournima
  • Raksha Bandhan

संबंधित बातम्या

Raksha Bandhan Gift Ideas: राखीला यंदा चॉकलेट्स नको! भावाला आवडतील असे ‘हे’ ५ हटके गिफ्ट आयडिया
1

Raksha Bandhan Gift Ideas: राखीला यंदा चॉकलेट्स नको! भावाला आवडतील असे ‘हे’ ५ हटके गिफ्ट आयडिया

भाऊ असावा तर असा! रक्षाबंधनासाठी boAt-ब्लिंकिटची भन्नाट डिजिटल मोहीम, अरबाज खानने सांगितला ‘अच्छा भैया’ होण्याचा फंडा!
2

भाऊ असावा तर असा! रक्षाबंधनासाठी boAt-ब्लिंकिटची भन्नाट डिजिटल मोहीम, अरबाज खानने सांगितला ‘अच्छा भैया’ होण्याचा फंडा!

Mira Bhayandar News: शाळा पूर्ण होण्याआधीच भेगा, मिरा-भाईंदरमध्ये शाळेच्या बांधकामाचा भोंगळ कारभार
3

Mira Bhayandar News: शाळा पूर्ण होण्याआधीच भेगा, मिरा-भाईंदरमध्ये शाळेच्या बांधकामाचा भोंगळ कारभार

Yavatmal News: बोगस बियाण्याचा फटका! साडेसहा एकरातील सोयाबीन उगवलंच नाही, संतप्त शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर
4

Yavatmal News: बोगस बियाण्याचा फटका! साडेसहा एकरातील सोयाबीन उगवलंच नाही, संतप्त शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.