Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला धणे पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व आणि योग्य विधी

Dhanteras 2026: दिवाळीतील महत्त्वाचा सण असलेल्या धनत्रयोदशीला सोन्या-चांदीच्या खरेदीसोबतच लक्ष्मी, कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. अनेक घरांमध्ये या दिवशी धण्यांचेही पूजन करण्याची परंपरा आहे. धणे हे धन-धान्य, भरभराट आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 27, 2026 | 04:36 PM
Dhanteras 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Dhanteras 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • धनत्रयोदशीला धण्यांची पूजा का करतात?
  • धणे मानले जातात धन-धान्य आणि भरभराटीचे प्रतीक
  • जाणून घ्या धणे पूजनाची सोपी पद्धत आणि परंपरा

     

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. बाजारात कंदील, रांगोळ्या, दिवे, पूजेचे साहित्य येण्यास सुरुवात झाली. हिंदू धर्मात या सणाला सर्वात जास्त महत्त्व आहे. या पाच दिवसांच्या सणामध्ये ते म्हणजे धनत्रयोदशी यालाच धनतेरस असे म्हणतात. यादिवशी सोनं- चांदीची खरेदी केली जाते. लक्ष्मी, कुबेराची आणि धन्वंतरी देवाची पूजा करतात. पण बऱ्याच घरांमध्ये या दिवशी धणे पण पुजतात, ते अनेकदा आपण पाहिलं आहे. धण्याचा नैवैद्य दाखवला जातो, पण तुम्हाला माहिती आहे का? धणे का पुजले जातात. यामध्ये एक कथा सांगितली जाते, चला जाणून घेऊया.. Dhanteras 2026:

धने म्हणजे काय?

आपण धने म्हटलं की आपल्याला फक्त स्वयंपाकातला मसाला आठवतो. पण आपल्या जुन्या परंपरेत धने हे फक्त मसाला नसून धने म्हणजे धन-धान्याचं प्रतीक आहे. धण्याच्या एका दाण्यातून खूप जास्त दाणे तयार होतात. म्हणून धने हे भरभराटीचं, वाढीचं प्रतीक मानतात. जसं धने वाढतं, तसंच घरातलं धन, धान्य पण वाढावं, हीच त्यामागची भावना आहे. तसेच धनत्रयोदशीला जेव्हा लोक लक्ष्मीची पूजा करतात, तेव्हा धणे पण ठेवतात.

Karwa Chauth 2026: करवा चौथला द्रौपदीनेही केलं होतं व्रत? भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली कथा जाणून घ्या

देवाला सांगतात की, आमच्या घरात कधीही धान्याला, पैशाला कमी पडू नये. घरात सुख-समृद्धी राहू दे. काही घरांमध्ये तर पूजलेले धणे दिवाळी संपेपर्यंत जपून ठेवतात आणि नंतरच्या पूजांमध्ये वापरतात.

2026 ची दिवाळी कधी आहे?

यावर्षीची दिवाळी नोव्हेंबरमध्ये आहे. वेळापत्रक असं आहे –
5 नोव्हेंबर, गुरुवार – वसुबारस
6 नोव्हेंबर, शुक्रवार – धनत्रयोदशी
7 नोव्हेंबर, शनिवार – काळी चौदस
8 नोव्हेंबर, रविवार – नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन
9 नोव्हेंबर, सोमवार – गोवर्धन पूजा
10 नोव्हेंबर, मंगळवार – पाडवा
11 नोव्हेंबर, बुधवार – भाऊबीज

धण्याची पूजा कशी करायची?

ही पूजा करायला खूप अवघड काही नाही. अगदी साधी आणि सोपी पूजा आहे.पहिल्यांदा देवघर स्वच्छ पुसून घ्या. पाटावर देवी लक्ष्मी आणि धन्वंतरी देवाचा फोटो ठेवा. एका छोट्या ताटात थोडे धणे घ्या. त्यासोबत हळद-कुंकू, थोड्या अक्षता, फुलं आणि गूळ ठेवा. समोर दिवा लावा.आता मनातून प्रार्थना करा की आमच्या कुटुंबाला आरोग्य चांगलं राहू दे, घरात भांडणं होऊ नयेत, पैसा टिकून राहू दे. जसं धण्याचं रोप वाढतं तशी आमची पण भरभराट होऊ दे.

पूजा झाली की ते धणे लगेच फेकून देऊ नका. ते एका डब्यात जपून ठेवा. काही लोक ते दुसऱ्या दिवशीच्या लक्ष्मीपूजनात वापरतात, तर काही लोक त्याचा प्रसाद म्हणून थोडं थोडं घरात वाटतात किंवा तुळशीजवळ टाकतात.

Shukra uday: शुक्राच्या उदयामुळे या राशींच्या लोकांचे नशीब पालटणार, करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता

एक गोष्ट लक्षात ठेवा, ही प्रथा प्रत्येक ठिकाणी सारखी नाही. कोकणात वेगळी पद्धत असेल, खानदेशात वेगळी, विदर्भात वेगळी. कोण गुळासोबत धणे ठेवतं, कोण नुसतेच धणे ठेवतं. त्यामुळे तुमच्या घरात आधीपासून कशी पद्धत आहे, तुमचे आई-वडील कशी पूजा करतात, त्याप्रमाणेच करा. कुलाचार पाळणं हेच सगळ्यात महत्वाचं.

धनत्रयोदशी म्हणजे फक्त दागिने घेणं नाही, तर घरात धन-धान्य टिकावं यासाठी केलेली एक छोटीशी प्रार्थना पण आहे. आणि धण्याची पूजा हे त्याचंच एक सुंदर उदाहरण आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: धनत्रयोदशीला धण्यांची पूजा का केली जाते?

    Ans: धणे हे धन-धान्य, भरभराट आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. घरात सुख-समृद्धी नांदावी आणि धन-धान्याची कमतरता भासू नये, या भावनेतून धण्यांचे पूजन केले जाते.

  • Que: धणे पूजनासाठी कोणते साहित्य लागते?

    Ans: धणे, हळद-कुंकू, अक्षता, फुले, गूळ, दिवा आणि लक्ष्मी व धन्वंतरी देवाची प्रतिमा पूजेसाठी वापरली जाते.

  • Que: पूजेनंतर धण्यांचे काय करतात?

    Ans: काही घरांमध्ये पूजलेले धणे जपून ठेवले जातात, तर काही ठिकाणी ते लक्ष्मीपूजनात वापरले जातात किंवा प्रसाद म्हणून वाटले जातात.

Web Title: Dhanteras 2026 coriander seeds puja significance rituals rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Dhanteras festival
  • Dhanteras Puja
  • Dhanteras rituals
  • hindu religion
  • Marathi News
  • religion news

संबंधित बातम्या

Skills on Wheels Initiative: कौशल्य शिक्षण आता थेट शाळेच्या दारात! ‘हा’ अभिनव उपक्रम ठरतोय विद्यार्थ्यांसाठी वरदान
1

Skills on Wheels Initiative: कौशल्य शिक्षण आता थेट शाळेच्या दारात! ‘हा’ अभिनव उपक्रम ठरतोय विद्यार्थ्यांसाठी वरदान

Sayaji Shinde’s Son: वडिलांच्या पावलांवर चालत सिद्धार्थची सिनेसृष्टीत एन्ट्री; ‘विष्णूबाळा’ ठरणार खास
2

Sayaji Shinde’s Son: वडिलांच्या पावलांवर चालत सिद्धार्थची सिनेसृष्टीत एन्ट्री; ‘विष्णूबाळा’ ठरणार खास

Karwa Chauth 2026: करवा चौथला द्रौपदीनेही केलं होतं व्रत? भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली कथा जाणून घ्या
3

Karwa Chauth 2026: करवा चौथला द्रौपदीनेही केलं होतं व्रत? भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली कथा जाणून घ्या

Jalgaon News: वय फक्त आकडा! एरंडोलमध्ये २ हजार आजी-आजोबांची साक्षरता परीक्षा, ३० जण गैरहजर
4

Jalgaon News: वय फक्त आकडा! एरंडोलमध्ये २ हजार आजी-आजोबांची साक्षरता परीक्षा, ३० जण गैरहजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.