
Vastu Tips OF Wall Colour(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दिवाळी जवळ आली की प्रत्येकाला वाटतं आपलं घर एकदम चकाचक दिसावं. मग सगळे घराला नवीन पेंट लावतात. पण रंग फक्त सुंदर दिसण्यासाठी नसतो, त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि घरातल्या वातावरणावर पण होतो. वास्तुशास्त्रात तर रंगाला खूप महत्व दिलेलं आहे. चुकीचा रंग लावला तर घराचं सगळं लुकच बिघडून जातं. त्यासाठी कोणत्या खोलीमध्ये कोणता रंग मारायचा तसेच कोणता रंग शुभ आणि अशुभ आहे हे जाणून घ्या… Diwali 2026:
हॉलमध्ये आपण दिवसभरात जास्त वेळ घालवतो. पाहुणे आले तरी तिथेच बसतात. त्यामुळे इथला रंग असा हवा की बघताच क्षणी प्रसन्न वाटेल. जास्त गडद किंवा भडक रंग इथे अजिबात लावू नका. पांढरा, दुधासारखा क्रीम, हलका तपकिरी आणि फिक्कट गुलाबी हे चार रंग हॉलसाठी एकदम परफेक्ट आहेत. हे रंग मारल्याने रुम मोठी वाटते तसेच शांतता राहते, तुम्ही भिंतीला असा रंग दिला तर पडदे आणि कुशन पण त्याच रंगाच्या छटेत घ्या, घर एकदम रिच दिसेल.
किचनमध्ये स्वच्छता सगळ्यात महत्वाची. वास्तूच्या मते किचनसाठी पांढरा रंगापेक्षा चांगला कोणताच रंग नाही. कारण पांढरा हा रंग शांतता आणि साफसफाई प्रतिक आहे. याशिवाय पांढऱ्या रंगामुळे आकाराने लहान असलेले किचन सुद्धा मोठे वाटते. डाग वैगेर पांढऱ्या रंगावर लगेच दिसतात.
Vastu Tips: भाड्याच्या घरात राहणाऱ्यांनी आवर्जून करावेत हे उपाय, घरातील नकारात्मकता होईल दूर
दिवसभराच्या थकाव्यानंतर आपला आरामची खोली म्हणजे बेडरुम आहे. या खोलीमध्य शांत झोप लागावी यासाठी जास्त भडक रंग मारु नये. त्यापेक्षा आकाशी निळा, हलका हिरवा, गुलाबी आणि क्रीम शेड बेडरूमसाठी उत्तम. हे सगळे रंग थंड आहेत, त्यामुळे मन शांत राहतं. तसेच नवरा- बायकोमधील वाद कमी होऊन प्रेम वाढते. यासाठी फिकट रंग मारावे.
बाथरुममध्ये विशेष:हा सफेद किंवा गुलाबी रंग मारावा. सफेद रंगामुळे स्वच्छता राहते आणि गुलाबी रंगामुळे एक वेगळा फ्रेशनेस राहतो. तसेच दोन्ही रंगानी बाथरूमला एक वेगळा लूक येतो.
घराची प्रत्येक दिशा वेगळी असते आणि प्रत्येक दिशेला वेगळा रंग सूट होतो.
उत्तरेची भिंत असेल तर तिथे हिरवा रंग लावा. हिरवा रंग म्हणजे झाडं, वाढ, पैसा. या दिशेला हिरवा लावल्याने घरात बरकत येते आणि धंद्यात फायदा होतो असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे.
दक्षिणेकडे लाल रंग लावा. लाल म्हणजे ताकद, एनर्जी. दक्षिणेला लाल असेल त्या घरात उत्साह वाढतो आणि नात्यामध्ये गोडवा राहतो.
पूर्वेकडे पांढरा आणि पश्चिमेकडे निळा रंग शुभ मानला जातो. कारण त्याठिकाणी सूर्यादय होतो तर पश्चिमेला निळा रंग लावल्याने मन स्थिर होते तसेच शांतता मिळते.
घरातील सगळ्याची महत्त्वाचा कोपरा हा ईशान्यकडे मानला जातो कारण या जागेला देवाची जागा म्हणतात. इथे पिवळा किंवा केशरी रंग लावा. पिवळा म्हणजे बुद्धी आणि केशरी म्हणजे नवी उमेद. या रंगांमुळे घरात पॉझिटिव्ह वातावरण राहतं.तर मित्रांनो, या दिवाळीत असाच विचार करून रंग लावा.
Ans: पांढरा, क्रीम, हलका तपकिरी आणि फिकट गुलाबी रंग सुचवले आहेत.
Ans: किचनसाठी पांढरा रंग योग्य मानला आहे.
Ans: उत्तर दिशेसाठी हिरवा रंग सुचवला आहे.