फोटो सौजन्य- pinterest
हल्ली बरेच लोक नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणामुळे आपल्या घरापासून दूर म्हणजे भाड्याच्या घरात राहतात. भाड्याच्या घरात राहिल्याने अनेकदा नकारात्मक भावना निर्माण होऊ शकतात. वास्तूचे असे काही उपाय आहेत ते केल्याने तुम्हाला भाड्याच्या घरात राहतानाही सकारात्मक वाटण्यास मदत करतील. या उपायांसाठी कोणतेही घर पाडण्याची किंवा स्थलांतर करण्याची आवश्यकता नाही. भाड्याच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तूचे कोणते उपाय करावे ते जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तर मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा आणि त्यावर स्वस्तिक चिन्ह काढा. उपवास आणि सणांच्या वेळी मुख्य दरवाजावर दिवा लावा. वास्तुशास्त्रानुसार, असे केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते.
जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि तुम्हाला नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल, तर तुम्ही रोज मीठ मिसळलेल्या पाण्याने घर पुसून घ्यावे. असे केल्याने नकारात्मकता हळूहळू नाहीशी होईल. याव्यतिरिक्त, तुमच्या घराच्या एका कोपऱ्यात काचेच्या भांड्यात तुरटीचे काही तुकडे ठेवून त्यात थोडे मीठ टाकल्यास तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल. तुम्ही दर १५ दिवसांनी तुरटी आणि मीठ बदलले पाहिजे.
ईशान्य दिशा ही देवदेवतांचे निवासस्थान मानली जाते आणि तुमच्या प्रार्थना कक्षात याच ठिकाणी देवतांची स्थापना केली जाते. त्यामुळे, तुम्ही ईशान्य कोपरा आणि प्रार्थना कक्ष नेहमी स्वच्छ ठेवावा. दररोज नाही, पण एक दिवसाआड स्वच्छता करावी. असे केल्याने वास्तुदोष दूर होतात आणि तुमच्यावर देवदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
वास्तुशास्त्रानुसार, रंगांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तर भिंतींना गडद रंग देणे टाळावे. असे केल्याने तणाव निर्माण होऊ शकतो. तुमच्या भिंतींसाठी फिकट पिवळा, पांढरा किंवा क्रीम रंग आदर्श आहेत. हलक्या रंगाचे पडदे लावणे देखील फायदेशीर ठरते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे, सूर्यप्रकाश व हवा येऊ देणे आणि अनावश्यक वस्तू काढून टाकणे असे सोपे उपाय करता येतात.
Ans: पारंपरिक मान्यतेनुसार, घरात नियमित स्वच्छता ठेवणे, दिवा लावणे आणि प्रसन्न वातावरण राखणे शुभ मानले जाते.
Ans: वास्तुशास्त्रानुसार घराची दिशा आणि रचना महत्त्वाची मानली जाते. मात्र, वास्तुदोषामुळे प्रत्यक्ष आयुष्यात समस्या निर्माण होतात, याचे ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत.






