
भजन क्लबिंग म्हणजे नक्की काय (फोटो सौजन्य - iStock)
अनेक ठिकाणी आजकाल, तरुण लोक हनुमान चालिसा आणि हरे राम हरे कृष्ण भजन गाताना दिसतात. कॉलेज कॅन्टीनपासून ते वसतिगृहांपर्यंत लोक भजन सादर करतात आणि Gen Z ने या गोष्टीला भजन क्लबिंग म्हटले आहे. जेन झी चा हा भजन क्लबिंग प्रकार सध्या ट्रेंड होतोय. याविषयी अधिक माहिती आपण या लेखातून घेऊया.
भजन क्लबिंग म्हणजे काय?
भजन क्लबिंग दरम्यान, तरुण लोक भक्तीगीतांवर नाचतात आणि टाळ्या वाजवतात. या गटांमध्ये बहुतेक लोक असतात ही सर्व मंडळी साधारण २० ते ३० गटातील अथवा त्याहीपेक्षा कमी वयाची दिसून येतात. जुने भजन आधुनिक संगीताच्या तालावर गायले जाते. भजन क्लबिंग आजकाल खूप लोकप्रिय होताना दिसून येत आहे. जुन्या संगीताला नवा तडका असं त्यांच्या भाषेत म्हटलं जातं. मात्र जुन्या भजनाला एका वेगळ्याच पद्धतीने सादर करण्यात येत असल्यामुळे याला भजन क्लबिंग असं म्हटलं जातं.
Gen Z शब्दांना मिळाला मान! WFH, Dashcam सारख्या तब्बल 5000 नवीन शब्दांचा ‘या’ डिक्शनरीत समावेश
सोशल मीडियावर भजन क्लबिंगचे व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर भजन क्लबिंगचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये, लोक एका मोठ्या हॉलमध्ये बसलेले आहेत, तर स्टेजवर, तरुणांचा एक गट गिटार आणि ढोलकी वाजवून “श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी” हे भजन गात असल्याचे दिसत आहे. हॉलमध्ये बसलेले लोकही हे भजन गात आहेत आणि त्यात समरसून गेलेले दिसून येत आहे.
पहा व्हिडिओ
Healing साठी सर्वोत्तम मार्ग
जेन झी च्या अस्तित्वावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते की, जेन झी ही पिढी अत्यंत तणावग्रस्त आणि नैराश्यात आहे. तथापि, भक्तीच्या बाबतीत, जेन झी अजिबात मागे नाहीत. त्यांचा भक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे, कारण ते भक्तीद्वारे स्वतःला बरे करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच भजन क्लबिंगसारखे उपक्रम आजकाल वाढत्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
Gen Z किड्समध्ये वाढतोय ‘टेलिफोनोफोबिया’! कॉल येताच वाटते भिती, नेमकं प्रकरण आहे तरी काय?