Gen Z किड्समध्ये वाढतोय 'टेलिफोनोफोबिया'! कॉल येताच वाटते भिती, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपला स्मार्टफोन आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कोणाला कॉल किंवा मॅसेज करायचा असेल तर आपल्याला स्मार्टफोनची गरज असते. स्मार्टफोनच्या मदतीने आपण आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक या सर्वांसोबत संवाद साधू शकतो. आपल्या स्मार्टफोनवर रोज अनेक कॉल्स आणि मॅसेज येतात. काही कामाचे असतात तर काही बिनकामाचे. तुम्ही देखील दिवसभरात अनेकांना कॉल आणि मॅसेज करत असाल.
WhatsApp सिक्योरिटीचा दावा खोटा? मार्क झुकरबर्गच्या या उत्तराने वाढलं करोडो यूजर्सचं टेंशन
तुमच्यासोबत कधी असं घडलं आहे की, असं कधी झालंय का की तुम्ही कोणाला फोन केला असेल किंवा मेसेज केला असेल, पण अशावेळी तुमच्या मनात विचार आला असेल की समोरच्या व्यक्तिने आपल्या मॅसेजला किंवा फोनला उत्तर देऊ नये? असे झाल्यास, तुम्हाला “टेलिफोनोफोबिया” होऊ शकतो. याला “टेलीफोबिया” किंवा “फोन फोबिया” असेही म्हणतात. सध्याच्या Gen Z मुलांमध्ये टेलिफोनोफोबिया झपाट्याने वाढत आहे. तुम्हाला देखील असं वाटत असेल की तुम्ही या आजाराचे शिकार झाला आहात, तर घाबरण्याची गरज नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही लोकांशी संवाद साधून, त्यांच्यासोबत बोलून तुमचा हा आजार दूर करू शकता. एका ब्रिटन कॉलेजमध्ये हा आजार दूर करण्यासाठी ट्रेनिंग देखील सुरु करण्यात आली आहे. ब्रिटनच्या नॉटिंगहॅम कॉलेजने विद्यार्थ्यांना टेलिफोनोफोबियावर मात करण्यासाठी प्रशिक्षण सत्र सुरू केले आहे. यामध्ये मुलांना इतरांसोबत कशा प्रकारे संवाद साधला जाऊ शकतो, याबद्दल प्रशिक्षण दिलं जात आहे. जेणेकरून त्यांच्या मनातील भिती कमी होईल, आणि ही मुलं फोनवर किंवा मॅसेजवर मनमोकळेपणाने बोलू शकतील.
“टेलिफोनोफोबिया” हा शब्द पहिल्यांदा 1992 मध्ये वापरण्यात आला होता. टेलिफोनोफोबिया म्हणजे फोन कॉल करण्याची किंवा उत्तर देण्याची भीती. संशोधनानुसार ही एक प्रकारची सामाजिक भीती आहे. WebMD च्या मते, ‘टेलीफोनोफोबियाची तुलना ग्लोसोफोबिया (स्टेजवर बोलण्याची भीती) शी केली जाते कारण दोघांनाही लोकांसमोर काहीतरी करण्याची भिती असते.’
हे ऍगोराफोबिया (खुल्या जागेची भीती) शी देखील संबंधित असू शकते. काही लोक फोनवर बोलणे टाळतात, मॅसेज पाठवण्यास प्राधान्य देतात. अशी लोकं सामाजिक चिंता विकाराने ग्रस्त असतात किंवा त्यांना फोनवर वाईट बातमी मिळण्याची भिती असते.
ब्रिटनच्या नॉटिंगहॅम कॉलेजमध्ये करिअर मार्गदर्शन करणाऱ्या लिझ बॅक्स्टर यांनी एका आघाडीच्या ब्रिटीश मीडिया संस्थेला सांगितले की, फोन कॉल करण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये मोठी समस्या बनत आहे. बॅक्स्टर म्हणाले, ‘तरुणांमध्ये फोन वापरण्यात फारच कमी आत्मविश्वास असतो. त्यांच्या मनातील ही भिती कमी करण्यासाठी आता नवीन उपक्रम सुरु करण्यात आला आहे.’
ब्रिटनच्या नॉटिंगहॅम कॉलेजमध्ये सुरू झालेला हा नवीन अभ्यासक्रम वर्गातील व्यावहारिक व्यायामांवर भर देणार आहे. बॅक्स्टरने एका प्रमुख ब्रिटिश मीडिया आउटलेटला सांगितले की विद्यार्थी भूमिका बजावतील. ते म्हणाले, ‘या व्यायामामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भीतीतून हळूहळू बाहेर येण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे हा या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आजच्या काळात जिथे सर्व काही अतिशय वेगाने घडते, तिथे या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना फोनवर बोलण्याची कला शिकवली जाईल.