Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gudi Padwa 2026: गुढी पाडव्याच्या दिवशी काय करावे? गुढी उभारण्याची पद्धत जाणून घ्या

दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. गुढी उभारण्याची पद्धत काय आहे आणि या दिवशी काय करावे जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 16, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • गुढी उभारण्याची काय आहे पद्धत
  • गुढी पाडव्याच्या दिवशी काय करावे
  • गुढीपाडव्याची धार्मिक महत्त्व आणि कथा
हिंदू नववर्षांची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते. गुढीपाडवा नेमका कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त, याबाबत जाणून घेऊया.

तिथी आणि शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, चैत्र शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी १९ मार्च रोजी सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी २० मार्च रोजी पहाटे ४ वाजून ५२ मिनिटांपर्यंत संपणार आहे. त्यामुळे उदयतिथीनुसार १९ मार्च रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. या दिवशी सकाळी ६ वाजून २६ मिनिटांनी सूर्योदय होईल, तर दुपारी १२ वाजून ०४ मिनिटांपासून ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंतचा अभिजित मुहूर्त पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जात आहे.

Chaitra Navratri 2026: चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापना कशी करावी? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

धार्मिक महत्त्व आणि कथा

वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवसाचे ब्रह्म पुराणात विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. ब्रह्मपुराणात सांगितल्याप्रमाणे महहालयानंतर जेव्हा ब्रम्हदेवाने विश्वाची उत्पत्ती केली तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, या दिवशी पृथ्वीतलावर नवजीवनाची निर्मिती करण्यात आली. तसेच एका पौराणिक कथेनुसार श्री रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून नकारात्मकतेवर विजय मिळवला आणि १४ वर्षाचा वनवास संपवून माता सीतेसह अयोध्येत परतले. म्हणून या दिवशी विजयोत्स्व साजरा करण्याहेतू गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली.

गुढी उभारण्याची पद्धत

गुढी उभारण्यासाठी मोठी काठी, साडी किवा वस्त्र, फुले, फुलांचा हार, कडुलिंबाची पाने, आंब्याची डहाळी, रांगोळी, हळदीकुंकू अक्षता, नैवेद्य, कलश या गोष्टी वापरल्या जातात.

Gudi Padwa 2026: नववर्ष स्वागतयात्रेची सुरुवात कधी आणि कशी झाली तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या इतिहास

सर्वात आधी गुढी उभारण्यासाठी एक लाख काठी घ्यावी, तुम्हाला जेवढी उंच गुढी उभारायची आहे त्याप्रमाणे उंचीची काठी घ्यावी. यानंतर काठी स्वच्छ करून घ्यावी.

काठी स्वच्छ केल्यानंतर काठीला साडी किंवा कापड बांधा. साडीप्रमाणे कापडाला निऱ्या घातल्यात तर गुढी खूपच सुंदर दिसेल.

यानंतर काठीला कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, फुलाचा हार, साखरेची माळ बांधावी. सर्वात शेवटी काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या तुम्ही ठेवू शकता.

ज्या ठिकाणी गुढी उभारणार आहात तेथील जागा स्वच्छ करून घ्या. छोटासा पाट ठेवून सभोवताली सुंदर रंगांची रांगोळी काढा. आता त्यावर काठी ठेवून गुढी उभारावी.

गुढी उभारल्यानंतर फुले, अगरबत्ती किंवा धुप लावून गुढीची पूजा करावी. पुजा झाल्यानंतर गुढीला नैवैद्य दाखवावा.

‘या’ दिवशी काय करावे?

गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. प्रथम गणेशाची पूजा करावी. यानंतर विधीनुसार भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाची पूजा करावी. ओम ब्रह्मणे नमः मंत्राचा १०८ वेळा जप करावा. तसेच दुर्गा मातेचे ध्यान करावे. पूजेपूर्वी, पूजेनंतर, संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे, कडुलिंबाच्या पानांची पावडर करून त्यात मीठ, हिंग, जिरे, काळी मिरी, सेलेरी आणि साखर घालून खावे. दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला हरिद्राचे काही दाणे टाकावेत, गुढी नावाचा ध्वज या दिवशी फडकवावा.

या दिवशी काय करु नये?

गुढीपाडव्याच्या दिवशी नखे कापू नयेत. तसेच दाढी, मिशा आणि केस कापू नयेत. पूजा करताना चुका करू नयेत. दिवसा झोपू नये, या दिवशी मांसाहार आणि मद्य सेवन करू नये, गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतीही वस्तू उधारीवर घेणे टाळावे. यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात असे मानले जाते. या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी करण्याचे टाळावे, कारण लोखंड नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: गुढी पाडव्याच्या दिवशी काय करावे?

    Ans: या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, घर स्वच्छ करून रांगोळी काढावी, गुढी उभारावी आणि देवपूजा करावी. तसेच कुटुंबासोबत सण साजरा करून गोड पदार्थांचा आस्वाद घ्यावा.

  • Que: गुढी उभारण्याची पद्धत काय आहे?

    Ans: गुढीसाठी एक लांब बांबू घ्यावा. त्यावर रेशमी किंवा नवीन कापड बांधावे. त्यावर कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, फुलांची माळ आणि साखरेच्या गाठी लावाव्यात. शेवटी त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवून गुढी घराच्या प्रवेशद्वाराजवळ उभी करावी.

  • Que: गुढी उभारण्याचे धार्मिक महत्त्व काय आहे?

    Ans: गुढी विजय, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानली जाते. घरासमोर गुढी उभारल्याने सुख-समृद्धी येते आणि नकारात्मक शक्ती दूर राहतात अशी श्रद्धा आहे.

Web Title: Gudi padwa 2026 what to do on gudi padwa know the traditional method of hoisting the gudi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Gudi Padwa
  • Hindu Festival
  • hindu religion

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
1

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
2

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध
3

Pitru paksha: अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृपक्षाची सुरुवात का होते? गणेशोत्सव आणि पितृपक्षाचा काय आहे संबंध

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ
4

Dream Meaning: स्वप्नात दूध किंवा दही दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या स्वप्नशास्त्रातील अर्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.