फोटो सौजन्य- pinterest
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शकिनुसार, नवरात्र वर्षातून चार वेळा येते, त्यापैकी एक शारदीय नवरात्री, एक चैत्र आणि दोन गुप्त नवरात्री आहेत. चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत २०२६ मध्ये चैत्र नवरात्री कधी सुरू होत हे जाणून घेऊया.
चैत्र नवरात्र ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात येते आणि या सणाला वसंत नवरात्री असेही म्हणतात. चैत्र नवरात्रोत्सव मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. हा शुभ सण हिंदू नऊ दिवस मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करतात. नवरात्रीचा प्रत्येक दिवस दुर्गेच्या नऊ रूपांना समर्पित असतो आणि त्यानुसार पूजा केली जाते. चैत्र नवरात्रीचे पर्व १९ मार्च ते २७ मार्च असे नऊ दिवस साजरे होईल. १९ मार्चपासून सुरू होऊन २७ मार्च रोजी रामनवमीला चैत्र नवरात्र संपेल.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. त्यासाठी शुभ मुहूर्त हा १९ मार्च रोजी सकाळी ०६ वाजून ५२ मिनिटांपासून ते सकाळी ०७ वाजून ४३ मिनिटांपर्यंत असेल. तर कलश स्थापनेसाठी दुपारी १२ वाजून ०५ मिनिटांपासून ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असेल.
नवरात्रीत कन्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे. अष्टमी आणि नवमी या तिथी विशेष महत्त्वाच्या आहेत. कन्यापूजन दोन्ही तिथीना केले जाते. २०२६ मध्ये चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी २६ मार्च रोजी असेल आणि नवमी २७ मार्च रोजी असेल. या दोन्ही दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता.
नवरात्रोत्सवात दररोज सकाळी लवकर उठले पाहिजे. त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी पूजास्थानावी स्वच्छता करावी. नंतर तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी भरावे. कलशावर रोळी घालून स्वस्तिक बनवावे, त्यानंतर कलशावर आंब्याची पाने व नारळ ठेवावा. नऊ दिवसांचा उपवास आणि उपासना कोणत्याही समस्येशिवाय पूर्ण करण्यासाठी तुम्ही श्री गणेशाची प्रार्थना केली पाहिजे. नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला फळे, फुले, मिठाई आणि प्रसाद अर्पण करावा. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दुर्गा देवीची आरती करावी.
शैलपुत्री, ब्रह्मचारिणी माता, चंद्रघंटा माता, कुष्मांडा, स्कंद माता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: कलश स्थापना किंवा घटस्थापना ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाणारी विशेष पूजा आहे. यात पवित्र कलश ठेवून देवी शक्तीचे आवाहन केले जाते.
Ans: प्रथम स्वच्छ जागी मातीचा किंवा तांब्याचा कलश ठेवला जातो. त्यात पाणी, सुपारी, नाणे आणि आंब्याची पाने ठेवली जातात. त्यावर नारळ ठेवून देवीचे आवाहन केले जाते आणि पूजा केली जाते.
Ans: कलश हा समृद्धी, शक्ती आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो. नवरात्रीत कलश स्थापना केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे.






