Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hanuman Jayanti 2026: रामनवमी ते हनुमान जयंती काय आहे, हनुमान चालिसाचे महत्त्व आणि श्रद्धा जाणून घ्या

रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंतचा काळ हा प्रभू रामचंद्र आणि हनुमान यांच्यातील अतूट नाते साजरे करण्यासाठी विशेष मानला जातो. हनुमान यांची जयंती येत असल्यामुळे या दिवसांना विशेष धार्मिक महत्त्व आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 28, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • हनुमान जयंती कधी आहे
  • रामनवमी ते हनुमान जयंती पवित्र काळ
  • हनुमान चालिसा का पठण करतात
 

राम नवमी ते हनुमान जयंती (चैत्र पौर्णिमा) हा काळ प्रभू रामचंद्र आणि त्यांचे परम भक्त हनुमान यांच्यातील अतूट नाते साजरे करण्यासाठी पवित्र मानला जातो. राम जन्मानंतर (नवमी) लगेचच हनुमान जयंती येत असल्याने या दिवसांत हनुमान चालिसाचे पठण करून रामभक्त हनुमानजींकडून शक्ती, संरक्षण आणि भक्तीचा आशीर्वाद मागतात. यावेळी हनुमान जयंती गुरुवार, 2 एप्रिल रोजी आहे.

भारतात विशेषतः उत्तर भारतात हनुमान चालिसा मोठ्या भक्तिभावाने पठण करण्यात येत आहे. महाराष्ट्रात मात्र हनुमान चालिसाऐवजी समर्थ रामदासांनी रचलेल्या मारूती स्तोत्र पठण करण्यात येते. यामध्ये भाषांचा फरक आहे. हनुमान चालिसा अवधी भाषेत असल्यामुळे ती महाराष्ट्रातील लोकांना उच्चार करणे अवघड जाते. इतर वेळी हनुमान चालिसाही मंगळवारी आणि शनिवारी पठण करावी.  त्यामुळे हनुमान मारुती स्तोत्रला अधिक पसंती दिली जाते. नक्की हनुमान चालिसा कोणी लिहिली, त्यात किती श्लोक आहेत ते जाणून घेऊया

हनुमान चालिसामध्ये भक्तीभाव आहे, तर समर्थ रामदास स्वामींच्या मारुती स्तोत्रमध्ये शक्तीची उपासना आहे. हनुमान चालिसा चालिसा अवधी भाषेत लिहिली गेलीय. तिच्या उच्चारात एक लयबधता आहे..

हनुमान चालिसा

हनुमान चालिसा संत तुलसीदासांनी लिहिली आहे. हिंदीची बोलीभाषा असलेल्या अवधी भाषेत हनुमान चालिसाचं मूळ लेखन करण्यात आले आहे. तुलसीदास जन्मस्थान हे आताच्या उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात आहे. जेथे प्रभू श्रीरामांचा बराच काळ वनवासात असताना सहवास होता‌. तर तुलसीदासांनी भारतभर भ्रमंती केल्याचे सांगितले जाते.

Hanuman katha: हनुमानाला शेंदुर का लावला जातो? काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या

श्रीरामरचितमानस ही त्यांच्या नावावरील प्रसिद्ध रचना आहे. त्यामुळे हनुमानावरही त्यांनी लिहीलं आहे. जे आज प्रत्येक हनुमान भक्ताच्या ओठांवर असतं पण भारतातील इतर भाषेतही भाषांतरीत झाली आहेत. त्यामुळे सर्वत्रच बोलली जाते. महाराष्ट्रात मात्र हनुमान चालिसाऐवजी मारुती स्तोत्रालाच प्राधान्य दिलं जात आहे, असं दिसून येतं. कारण मारुती स्तोत्र मराठीत असून अगदी सोप्या मराठी भाषेत आहे. कुठलीही भीती वाटल्यास हनुमान चालिसा म्हटली जाते. हनुमान चालिसा म्हटल्यास मनातली भीती निघून जाते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

हनुमान चालिसाची सुरुवात दोह्यांनी होते आणि नंतर चौपाई आहेत. हे एकूण 40 चौपाई किंवा श्लोक आहेत. म्हणूनच हनुमान चालिसा म्हटलं जातं, असंही अनेकांचं म्हणणं आहे.

जय हनुमान ज्ञान गुन सागर

जय कपीस तिहुँ लोक उजागर॥१॥

अशी हनुमान चालिसाची सुरुवात आहे. या सुरुवातीआधी दोन दोहे आहेत.

Vastu tips: घरामध्ये कासव ठेवताना या नियमांचे करा पालन, नाहीतर येऊ शकतात अडचणी

एकूणच मारुती स्तोत्र 17 व्या शतकात, तर हनुमान चालिसा 16 व्या शतकात लिहिली गेलीय. उत्तर भारतातील लोकांच्या हनुमान चालिसा तोंडपाठ असते. असं म्हणतात की जेव्हा कोणतेही संकट येते तेव्हा हनुमान चालिसा म्हणावी, संकट दूर होते. रामनवमी ते हनुमान जयंतीनिमित्ताने देशभरात घरोघरी, मंदिरात हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले जाते. या दिवसांत हनुमान चालिसाचे पठण करून रामभक्त हनुमानजींकडून शक्ती, संरक्षण आणि भक्तीचा आशीर्वाद मागतात.

संत तुलसीदासांच्या हनुमान चालिसामध्ये भक्तीभाव आहे, तर समर्थ रामदास स्वामींच्या मारुती स्तोत्रमध्ये शक्तीची उपासना आहे. त्यामुळेच ज्याला जे सोपं वाटेल ते रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत नक्कीच पठण करावे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: राम नवमी ते हनुमान जयंती हा काळ पवित्र का मानला जातो?

    Ans: राम नवमी ते हनुमान जयंती हा काळ प्रभू श्रीराम आणि त्यांचे परम भक्त हनुमान यांच्या नात्याचे प्रतीक आहे. या काळात भक्ती, साधना आणि पूजा विशेष फलदायी मानली जाते.

  • Que: हनुमान चालीसा पठणाचे महत्त्व काय आहे?

    Ans: हनुमान चालीसा पठण केल्याने मन शांत होते, भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. तसेच नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते, अशी श्रद्धा आहे.

  • Que: हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र यात काय फरक आहे?

    Ans: हनुमान चालीसा ही भक्तीभाव व्यक्त करणारी रचना आहे, तर मारुती स्तोत्र (समर्थ रामदास स्वामी) हे शक्ती आणि पराक्रमाची उपासना दर्शवते.

Web Title: Hanuman jayanti 2026 importance and beliefs of hanuman chalisa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Hanuman Chalisa
  • Hanuman Jayanti
  • hindu religion

संबंधित बातम्या

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या
2

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या

Vinayak Chaturthi: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Vinayak Chaturthi: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Shravan 2026: श्रावणातील पहिल्या शुक्रवारी केली जाते जिवतीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि धार्मिक महत्त्व
4

Shravan 2026: श्रावणातील पहिल्या शुक्रवारी केली जाते जिवतीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.