Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shardiya Navratri 2026: घटस्थापनेची रोपं हिरवीगार की खुंटलेली? धार्मिक महत्त्व, शुभ संकेत आणि विसर्जनाची परंपरा जाणून घ्या!

Shardiya Navratri 2026: शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या वेळी मातीच्या भांड्यात गहू, जव किंवा स्थानिक परंपरेनुसार इतर धान्य पेरले जाते. काही दिवसांत या धान्यांना हिरवे कोंब फुटतात, ज्यांना जवारे म्हणतात. हे जवारे नवीन जीवन, शक्ती, समृद्धी आणि सकारात्मक बदलांचे प्रतीक मानले जातात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 13, 2026 | 04:50 PM
Shardiya Navratri 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Shardiya Navratri 2026: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • घटस्थापनेची परंपरा
  • जवाऱ्यांचे महत्त्व
  • वाढीमागील श्रद्धा
  • वैज्ञानिक दृष्टिकोन
Shardiya Navratri 2026: नवरात्री सुरू झाली की घराघरात घट बसवला जातो. घटस्थापनेला खूप महत्व आहे. पहिल्याच दिवशी लोक घट बसवून देवीची पूजा करतात. यावेळी मातीच्या टोपल्यात गहू, जव असे धान्य पेरले जाते. काही दिवसांनी त्याला छोटे छोटे हिरवे कोंब येतात. यालाच जवारे म्हणतात. हे फक्त रोप नाही, तर आपल्या परंपरेत याला खूप मोठा अर्थ आहे. हे हिरवे रोप समृद्धीचे, नवीन जीवनाचे आणि चांगल्या बदलाचे लक्षण मानले जाते. Shardiya Navratri 2026:

जवारे का लावतात?

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवताना एका मातीच्या भांड्यात गहू पेरतात. कोणी जव पेरतो, कोणी आपल्या गावाकडच्या पद्धतीनुसार दुसरे धान्य पेरतो. रोज त्यावर थोडे पाणी शिंपडले जाते. 3-4 दिवसातच त्याला हिरवी रोपे फुटायला लागतात. काही ठिकाणी याला जवारे म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात या रोपांची वाढ बघणे हा एक विधीच आहे. ही हिरवळ बघितली की मन प्रसन्न होते. हे नव्या जीवनाचे आणि निसर्गाच्या ताकदीचे प्रतीक आहे.

याचा धार्मिक अर्थ काय आहे?

आपल्याकडे धान्याला अन्न मानतात. धान्य म्हणजे लक्ष्मी. त्यामुळे घटात पेरलेल्या धान्याला कोंब फुटणे म्हणजे देवीच्या कृपेने घरात सुख-समृद्धी येणार असे मानले जाते. नवरात्रीत आपण दुर्गा मातेची पूजा करतो जी शक्तीचे रूप आहे. आणि ही रोपे सुद्धा शक्ती आणि निर्मितीचेच प्रतीक आहेत. एक छोटे बी जमिनीतून वर येऊन रोप बनते. म्हणजे संपलेल्या गोष्टीतून परत नवीन सुरुवात होते. संकटानंतर पण माणसाने परत उभे राहावे, आशा सोडू नये, हा संदेश पण यातून मिळतो.

हिरवे रोप समृद्धीचे प्रतीक का?

आपली संस्कृती ही शेतीशी जोडलेली आहे. पूर्वीपासून पीक चांगले आले की घरात धान्य भरपूर, म्हणजे समृद्धी आली असे समजायचे. त्यामुळेच घटातले धान्य चांगले वाढले तर चांगले पीक येणार, घरात भरभराट होणार असा समज आहे.हे रोप वाढण्यासाठी पाणी, हवा, ऊन सगळे बरोबर लागते. निसर्गाची साथ असेल तरच बीज अंकुरते. त्यामुळे हा विधी फक्त धर्माशी नाही तर निसर्गाच्या चक्राशी पण जोडलेला आहे.

Navratri Horoscope: नवरात्रीत 100 वर्षांनंतर जुळून येताहेत 3 शुभ योग! ‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार?

रोपांची वाढ काय दर्शवते?

नवरात्रीत लोक रोज त्या रोपांकडे बघतात. रोपे हिरवीगार आणि उंच वाढली तर लोक त्याला शुभ मानतात. पण खरे तर रोपांची वाढ ही बियाणे चांगले होते की नाही, माती कशी आहे, पाणी किती घातले, ऊन मिळते का यावर अवलंबून असते. रोप उंच वाढले म्हणजे पैसा येणार किंवा कमी वाढले म्हणजे वाईट होणार असे काही वैज्ञानिक कारण नाही. त्यामुळे याकडे श्रद्धा आणि सकारात्मकतेचे प्रतीक म्हणून बघावे.

नवरात्री संपल्यावर या रोपांचे काय करतात?

नऊ दिवस झाल्यावर दहाव्या दिवशी घटाचे विसर्जन करतात. तेव्हा प्रत्येक घरात वेगळी पद्धत असते. काही लोक ही रोपे देवीला वाहतात. काही लोक ती टोपीवर किंवा डोक्यावर ठेवतात आणि प्रसाद म्हणून घेतात. काही ठिकाणी ती रोपे शेतात नेऊन मातीत मिसळतात. गावागावात ही पद्धत वेगळी असते.

Numerology Horoscope Today: राग आवरा, वाद टाळा! मूलांक 4 आणि 7 च्या व्यक्तींसाठी अंकशास्त्र काय सांगते?

श्रद्धा आणि निसर्गाचा संगम

एकंदरीत घटातील जवारे ही फक्त पूजा नाही. यातून देवीची शक्ती, भक्ती आणि निसर्गाचा संदेश मिळतो. देवीची पूजा केल्याने मनाला बळ मिळते आणि या हिरव्या रोपांकडे बघून नवीन सुरुवातीची प्रेरणा मिळते. म्हणूनच या परंपरेकडे फक्त विधी म्हणून नाही तर आपल्या निसर्गाशी असलेल्या नात्याचे प्रतीक म्हणून बघितले पाहिजे.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Shardiya navratri 2026 jaware significance ghatasthapana visarjan rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • hindu religion
  • Religion
  • religion news

संबंधित बातम्या

म्हसोबाचं देऊळ शेतातल्या बांधावरच का असतं? नेमका कोण आहे हा गावाकडचा म्हसोबा देव? जाणून घ्या
1

म्हसोबाचं देऊळ शेतातल्या बांधावरच का असतं? नेमका कोण आहे हा गावाकडचा म्हसोबा देव? जाणून घ्या

‘अयप्पा स्वामी’ होते महादेव आणि विष्णूंचे पुत्र! जाणून घ्या हरीहरपुत्र अपप्पांच्या जन्माची ही गुढ पौराणिक कथा
2

‘अयप्पा स्वामी’ होते महादेव आणि विष्णूंचे पुत्र! जाणून घ्या हरीहरपुत्र अपप्पांच्या जन्माची ही गुढ पौराणिक कथा

Durga Mahishasura War: दुर्गामाता आणि महिषासुराचे युद्ध 9 दिवस का चालले? जाणून घ्या संपूर्ण रंजक कथा
3

Durga Mahishasura War: दुर्गामाता आणि महिषासुराचे युद्ध 9 दिवस का चालले? जाणून घ्या संपूर्ण रंजक कथा

Crime News: मैत्री, लग्नाचे आमिष अन् लैंगिक शोषण; कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्यान्वये पहिला गुन्हा
4

Crime News: मैत्री, लग्नाचे आमिष अन् लैंगिक शोषण; कोल्हापुरात धर्मांतर विरोधी कायद्यान्वये पहिला गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.