
Durga Mahishasura War: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Durga Mahishasura War : नवरात्र म्हणजे नवशक्तीचा जागर सण. या नऊ दिवसात आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, देवीने महिषासुराला मारायला 9 दिवस का घेतले? ती तर इतकी शक्तिशाली होती की एका क्षणात त्याला संपवू शकली असती. मग 9 दिवस युद्ध करण्यामागे कारण काय होते? चला जाणून घेऊया. Durga Mahishasura War:
महिषासुर हा एक खूपच खतरनाक राक्षस होता. त्याचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालला होता. तो खूपच गर्विष्ठ झाला होता. त्याला एक वरदान मिळाले होते की कोणताही पुरुष त्याला मारू शकणार नाही. त्यामुळे तो देवांनाही त्रास देऊ लागला. सगळे देव त्याला घाबरले होते.शेवटी सगळे देव एकत्र आले – ब्रह्मा, विष्णू, महेश.
त्यांच्या सगळ्यांच्या तेजातून एका देवीचा जन्म झाला. तीच आपली दुर्गा माता. सगळ्या देवांनी आपापली सगळ्यात भारी शस्त्रे देवीला दिली. देवीकडे दहा हात होते आणि प्रत्येक हातात वेगळे शस्त्र होते.
9 दिवसांचे युद्धदेवी दुर्गा आणि महिषासुर यांच्यात युद्ध सुरु झाले. महिषासुर खूपच चलाख होता. तो सारखे रूप बदलायचा. कधी तो रेडा बनायचा, कधी हत्ती बनायचा, कधी माणूस बनायचा. त्यामुळे त्याला मारणे सोपे नव्हते.
देवीने त्याच्या प्रत्येक रूपाचा सामना केला. दुर्गा सप्तशतीमध्ये सांगितले आहे की देवीने नऊ दिवसात त्याच्या वेगवेगळ्या वाईट शक्तींना मारले आणि दहाव्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी त्याचा वध केला. म्हणूनच आपण तो दिवस दसरा म्हणून साजरा करतो. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून मानला जातो.पण हे फक्त एक युद्ध नव्हते. यामागे एक मोठा संदेश आहे.
देवीने 9 दिवस युद्ध केले कारण हे युद्ध बाहेरचे नव्हते तर आपल्या मनातले होते. आपल्या मनात पण महिषासुरासारख्या अनेक वाईट गोष्टी असतात – अहंकार, लोभ, राग, मत्सर.महिषासुराचा सगळ्यात मोठा शत्रू होता त्याचा अहंकार. तो सारखा वाढतच होता. देवीचा प्रत्येक वार त्याचा अहंकार तोडण्यासाठी होता. कारण अहंकार एका दिवसात जात नाही.
देवीची नऊ रूपे ही आपल्यातल्या नऊ शक्ती आहेत. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा अशी प्रत्येक रूप आपल्याला जीवनातल्या वेगवेगळ्या अडचणींशी लढायला शिकवते.जोपर्यंत आपण आपल्यातला अहंकार संपवत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही. हा अहंकारच आपल्याला खाली घेऊन जातो. हाच धडा देवीने या युद्धातून दिला आहे.
महिषासुर म्हणजे आपल्या मनातला गोंधळ आणि अज्ञान. तो सारखे रूप बदलायचा तसेच आपल्या मनात पण सारखे वेगवेगळे विचार येतात आणि आपल्याला भटकवतात.या भटक्या विचारांना रोखण्यासाठी ज्ञानाची गरज असते. देवीचे दहा हात म्हणजे दहा दिशांचे रक्षण. तिचा सिंह म्हणजे धाडस. म्हणजे जेव्हा आपण धाडसाने आणि योग्य मार्गाने चालतो तेव्हाच आपण आपल्यातल्या महिषासुराला मारू शकतो.
नवरात्र आपल्याला हेच शिकवते. फक्त उपवास करणे, पूजा करणे म्हणजे नवरात्र नाही. तर आपल्यातल्या रागावर, लोभावर, अहंकारावर नियंत्रण मिळवणे हीच खरी देवीची पूजा आहे.आपले विचार नेहमी स्वच्छ ठेवा. चांगल्या मार्गाने जगा. हीच खरी भक्ती आहे. दरवर्षी येणारी नवरात्र आपल्याला हाच संदेश देते की आपण चांगले वागले पाहिजे.