Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Baba: साईबाबा शिर्डीत कसे आले? जाणून घ्या साईबाबांच्या द्वारकामाईचे महत्त्व

साईबाबा हे महाराष्ट्रातील शिर्डीचे एक महान संत मानले जातात. त्यांच्या जीवनाभोवती अनेक चमत्कार, श्रद्धा आणि भक्तीच्या कथा जोडलेल्या आहेत. पण साईबाबा शिर्डीत प्रथम कसे आले, द्वारकामाई या नावामागचा अर्थ काय आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 07, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • साईबाबा शिर्डीत कसे आले
  • साईबाबांच्या द्वारकामाईचे महत्त्व
  • द्वारकामाईंचा काय आहे अर्थ
 

साईबाबा हे महाराष्ट्रातील शिर्डीचे महान संत मानले जातात. आज देशभरातून लाखो भक्त शिर्डीत दर्शनासाठी येतात. साईबाबांच्या जीवनाशी संबंधित अनेक कथा, चमत्कार आणि दंतकथा प्रसिद्ध आहेत. मात्र साईबाबा प्रथम शिर्डीत कसे आले आणि “द्वारकामाई” या नावामागचा अर्थ काय आहे, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. श्रद्धा आणि सबुरी आणि सबका मालिक एक ही दोन वाक्य ऐकली की आठवतात साईबाबा. शिर्डी हे साईबाबांचे प्रमुख स्थान मानलं जातं. पण याच शिर्डीमध्ये साईबाबा कसे प्रकटले हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया

साईबाबा शिर्डीत कसे आले

साईबाबा फक्त हे साधे फकीर नाही तर त्यांच्यात एक दैवी शक्ती होती. साईंच्या जन्माबद्दल अनेक दंतकथा सांगितल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे एकदा शिर्डीगावात एक मुलगा आला. हा मुलगा कोण, त्याचा धर्म काय, त्याचे आई वडील कोण याची गावकऱ्यांना काहीच माहिती नव्हती. हा मुलगा कित्येक वर्ष कडूलिंबाच्या झाडाखाली तपश्चर्येला बसायचा. एकदा जेव्हा तो तपश्चर्येला बसला तेव्हा कडुलिंबाच्या झाडाभोवती एक तेज निर्माण झालं. त्यावेळी गावकऱ्यांना असं वाटलं हा कोणी साधा मुलगा नाही, याच्यात काहीतरी दैवी शक्ती असावी. काही दिवसांनी हा मुलगा शिर्डीतून गायब झाला. एव्हाना गावकरी त्याला विसरले देखील होते.

Garuda Purana: लहान बालकांच्या अत्यंसंस्काराचे नियम वेगळे का? काय सांगते गरुड पुराण

द्वारकामाईंचा अर्थ

कालांतराने शिर्डीत एका फकिराचं आगमन झालं. पांढरे कपडे, हातात काठी असा त्याचा वेश होता आणि हेच होते साईबाबा. जेव्हा साई शिर्डीतल्या खंडोबा मंदिराकडे जायला निघाले तेव्हा मंदिराजवळ असलेल्या पुजारींना या फकिरामध्ये दैवी शक्ती दिसली. साईंनी शिर्डीत जेव्हा पुन्हा पाऊल ठेवलं तेव्हा ते एका मोडकळीला आलेल्या मशिदीत राहू लागले त्यांनी त्या जागेला द्वारकामाई असं नावं दिलं. द्वारका म्हणजे कृष्णाचं स्थान आणि माई म्हणजे आई.

Budh Nakshatra Gochar: बुध करणार नक्षत्र संक्रमण, 7 मेपासून या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश

त्याकाळी हिंदू मुस्लिम वाद खूप मोठा होता. पण त्याच काळात साईंनी दोन्ही धर्मांना समानतेचा संदेश दिला. त्या काळात हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये मोठे मतभेद होते. मात्र साईबाबांनी दोन्ही धर्मांना समान मानले. ते “सबका मालिक एक” हा संदेश देत असत.द्वारकामाईमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांचे लोक एकत्र येऊन प्रार्थना करत असत. त्यामुळे साईबाबा हे धार्मिक ऐक्य आणि मानवतेचे प्रतीक मानले जातात.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: साईबाबा प्रथम शिर्डीत कसे आले?

    Ans: दंतकथेनुसार, साईबाबा प्रथम तरुण वयात शिर्डीत आले होते. काही काळ त्यांनी कडुलिंबाच्या झाडाखाली तपश्चर्या केली आणि नंतर काही वर्षांनी फकिराच्या वेशात पुन्हा शिर्डीत परतले.

  • Que: द्वारकामाई म्हणजे काय?

    Ans: साईबाबा ज्या जुन्या मशिदीत राहत होते, त्या जागेला त्यांनी “द्वारकामाई” असे नाव दिले. हे आज शिर्डीतील अत्यंत पवित्र स्थळ मानले जाते.

  • Que: “द्वारकामाई” या नावाचा अर्थ काय?

    Ans: “द्वारका” म्हणजे श्रीकृष्ण यांचे पवित्र स्थान आणि “माई” म्हणजे आई. भक्तांना आधार देणारी आणि संरक्षण करणारी जागा असा याचा अर्थ मानला जातो.

Web Title: How did sai baba come to shirdi what is the meaning of sai baba dwarkamai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • hindu religion
  • Sai Baba Temple
  • shirdi

संबंधित बातम्या

Hindu Ritual: देवपूजेआधी गोमूत्र शिंपडण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धर्मशास्त्रातील कारण
1

Hindu Ritual: देवपूजेआधी गोमूत्र शिंपडण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धर्मशास्त्रातील कारण

Gorakhnath Temple: गिरनार पर्वतावरील गोरखनाथ मंदिराचा इतिहास आणि त्याची माहिती जाणून घ्या
2

Gorakhnath Temple: गिरनार पर्वतावरील गोरखनाथ मंदिराचा इतिहास आणि त्याची माहिती जाणून घ्या

Kamika Ekadashi: कामिका एकादशीला भगवान विष्णूची पूजा का केली जाते? जाणून घ्या व्रताचे महत्त्व आणि कथा
3

Kamika Ekadashi: कामिका एकादशीला भगवान विष्णूची पूजा का केली जाते? जाणून घ्या व्रताचे महत्त्व आणि कथा

Shravan 2026: श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी घरी आणा या वस्तू; शिवकृपेने दूर होतील अडचणी
4

Shravan 2026: श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी घरी आणा या वस्तू; शिवकृपेने दूर होतील अडचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.