Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navnath Gatha : गायीच्या शेणातून जन्माला दिव्य योगी ; नाथसंप्रदायातील गोरखनाथांच्या जन्माची अद्भुत गोष्ट

नाथसंप्रदायातील आद्यगुरु कोण तर ते मच्छिंद्रनाथ. याच मच्छिंद्रनाथांचा शिष्य म्हणजे गोरखनाथ.या गोरखनाथांचा जन्म देखील सरळ सोपा नव्हता. काय आहे गोरखनाथांच्या जन्माचं रहस्य, जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 12, 2026 | 12:51 PM
Navnath Gatha : गायीच्या शेणातून जन्माला दिव्य योगी ; नाथसंप्रदायातील गोरखनाथांच्या जन्माची अद्भुत गोष्ट
Follow Us
Follow Us:
  • गायीच्या शेणातून जन्माला तेजस्वी बालक;
  • नाथसंप्रदायातील गोरखनाथांच्या जन्माची अद्भुत गोष्ट
नवनाथ असो की दत्तसंप्रदाय या दोन्हीतील सारखेपण म्हणजे गुरुंनी दिलेल्या मार्गावर चालणं. तर मच्छिंद्रनाथांच्या याशिष्याचा जन्म चक्क गायीच्या शेणातून झाला आहे. नाथसंप्रदायातील आद्यगुरु कोण तर ते मच्छिंद्रनाथ. याच मच्छिंद्रनाथांचा शिष्य म्हणजे गोरखनाथ.या गोरखनाथांचा जन्म देखील सरळ सोपा नव्हता. काय आहे गोरखनाथांच्या जन्माचं रहस्य, जाणून घेऊयात. गोष्ट अशी की, एकदा मच्छिंद्रनाथ बंगाल प्रांतात फिरत होते. त्यावेळी ते एका घराजवळ भिक्षा मागायला थांबले. ते घर एका गौड ब्राम्हणाचं होतं.
या ब्राम्हणाची पत्नी सरस्वतीबाई अत्यंत सद्गुणी आणि सात्विक स्त्री होती. तिला मुलबाळ नसल्याने ती दु:खी होती. मच्छिंद्रनाथांना तिने आपली गोष्ट सांगितली. नाथांना तिची दया आली. . तेव्हा मच्छिंद्रनाथांनी तिला प्रसाद म्हणून पवित्र भस्म (विभूती) दिले आणि ते खाल्ल्यास तिला पुत्रप्राप्ती होईल असे सांगितले. त्यावेळी मच्छिंद्रनाथ म्हणाले की, हे भस्म साधं सुदं नाही तर हा सूर्य नारायणांचा प्रसाद आहे. तुझ्या पोटी येणारा बालक हा सूर्यासारखा तेजस्वी असेल. तो बारा वर्षांचा झाला की त्याला उपदेश करायला मी स्वत: येईल, असं सांगून नाथ तिथून निघून गेले. काही वेळानी सरस्वतीबाईच्या शेजारच्या बायका आल्या आणि तिची चेष्टा करु लागल्या. भस्म दिल्याने कधी मुलबाळ होतं का ? तिने रागाने ते भस्म गायीच्या गोठ्यात फेकलं.

बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ पुन्हा त्या ठिकाणी आले आणि त्या स्त्रीला विचारले की, तुझा मुलगा कुठे आहे? तेव्हा सरस्वतीने सांगितलं की मला मुलगा झालाच नाही. त्यावर नाथ चिडले. ते म्हणाले तू खोट बोेलतेस. नाथांचा चिडलेला चेहरा पाहून सरस्वतीबाई घाबरली आणि तिने घडलेला सगळा प्रकार नाथांच्या कानावर घातला. त्यानंतर नाथ गायीच्या गोठ्यात गेले.

Navnath Gatha : माशाच्या गर्भातून जन्मला तेजस्वी बालक, मच्छिंद्रनाथांच्या जन्माचं रहस्य

गायीच्या गोठ्यात गेल्यावर नाथ म्हणाले की, हे सूर्यसूता तू कुठे आहेस ? जर तू या शेणाच्या ढिगाऱ्यात असशील तर माझ्या हाकेला प्रतिसाद दे. त्यावर आवाज आला की, गुरुवर्य मी इथेच आहे शेणाच्या ढिगाऱ्याखाली अडकलो आहे तुम्ही मला बाहेर काढा. मच्छिंद्रनाथांनी शेण बाजूला सारलं आणि त्या ढिगाऱ्यातून एक तेजस्वी बालक बाहेर आला.  शेण म्हणजे गोबर आणि त्यातून जन्मलेला हा योगी पुढे गोरखनाथ म्हणून ओळखला जाऊ लागला. गोरखनाथ यांनी नाथ संप्रदायाचा प्रसार भारतभर केला. योग, साधना, हठयोग आणि अध्यात्म यांचा प्रचार करून त्यांनी अनेक शिष्य घडवले. त्यांचे नाव गोरखपूर या शहराशीही जोडले जाते, कारण तेथे त्यांचे प्रसिद्ध मंदिर आहे.नाथ संप्रदायात गोरखनाथांना महान योगी आणि सिद्ध पुरुष मानले जाते. त्यांच्या अध्यात्मिक प्रवासावर कथा, परंपरा आणि धार्मिक श्रद्धा आजही प्रचलित आहेत.

Navnath Gatha : गाथा नवनाथांची; दत्तसंप्रदायात नवनाथांचं महत्व काय

Web Title: How was gorakhnath of the nathsampradaya born

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • hindu religion
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला चुकूनही नेसू नका या रंगांची साडी, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक नियम
1

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेला चुकूनही नेसू नका या रंगांची साडी, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक नियम

Sant Eknath Maharaj: ‘वासुदेव आला रे…’ या परंपरेमागे कोण होते? जाणून घ्या संत एकनाथ महाराजांचे योगदान
2

Sant Eknath Maharaj: ‘वासुदेव आला रे…’ या परंपरेमागे कोण होते? जाणून घ्या संत एकनाथ महाराजांचे योगदान

Dattatreya Paduka: दत्तसंप्रदायातील पादुकांचे महत्त्व काय? जाणून घ्या श्रद्धा आणि परंपरा
3

Dattatreya Paduka: दत्तसंप्रदायातील पादुकांचे महत्त्व काय? जाणून घ्या श्रद्धा आणि परंपरा

Nirjala Ekadashi 2026: निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी या दिशेला लावा दिवा, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ
4

Nirjala Ekadashi 2026: निर्जला एकादशीच्या दिवशी संध्याकाळी या दिशेला लावा दिवा, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.