Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalki Jayanti: कल्की जयंतीनिमित्त स्कंद षष्ठीचा योगायोग, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत

कल्की जयंती आणि श्रावण स्कंद षष्ठी व्रत आज बुधवार, 30 जुलै रोजी आहे. हा दिवस कल्की आणि कार्तिकेय यांना समर्पित आहे. आज 4 शुभ योग देखील तयार होत आहे. शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 30, 2025 | 11:09 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आज बुधवार 30 जुलै रोजी कल्की जयंती आणि श्रावण स्कंद षष्ठी व्रत आहे. यावेळी कल्की जयंतीला 4 शुभ योग तयार होत आहेत. कल्की जयंती आणि स्कंद षष्ठी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठीला आहेत. यावेळी सूर्य देव कर्क राशीत आणि चंद्र कन्या राशीत असेल. कल्की जयंतीच्या दिवशी भगवान विष्णूचा दहावा आणि शेवटचा अवतार म्हणजे कल्की यांची पूजा केली जाते. तर स्कंद षष्ठीच्या दिवशी कार्तिकेयची पूजा केली जाते.

कल्कि जयंती आणि स्कंद षष्ठी शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल षष्ठी तिथी आज 30 जुलै रोजी सकाळी 12:46 वाजता सुरू झाली आणि त्याची समाप्ती उद्या 31 जुलै रोजी पहाटे 2.41 वाजता होईल. उद्यतिथीनुसार कल्की जयंती आणि स्कंद षष्ठीचे व्रत आज पाळले जाणार आहे.

या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे 4.18 ते पहाटे 5 वाजेपर्यंत राहील. परंतु अभिजीत मुहूर्त नाही. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 2.43 ते 3.37 पर्यंत आहे, तर निशिता मुहूर्त 31 जुलै रोजी मध्यरात्री 12.07 ते 12.49 पर्यंत आहे.

Vastu Tips: घराच्या या दिशेला लावा माशाचे चित्र, तुमच्याकडे आकर्षित होईल संपत्ती आणि सौभाग्य

कल्की जयंती आणि स्कंद षष्ठी शुभ योग

कल्की जयंती आणि स्कंद षष्ठीच्या दिवशी, सर्वार्थ सिद्धि योग, रवी योग, सिद्ध योग आणि साध्य योग तयार होतील. यावेळी सर्वार्थ सिद्धि योग आणि रवि योग सकाळी 5.41 पासून रात्री 9.53 पर्यंत राहील. तर सिद्ध योग 31 जुलै रोजी पहाटे 3.40 पर्यंत राहील. त्यानंतर साध्य योग तयार होईल.

कल्कि जयंतीचे महत्त्व

श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी भगवान विष्णू कल्की अवतारात जन्म घेतला. श्रीमद्भागवत पुराणानुसार, ज्यावेळी गुरु, सूर्य आणि चंद्र पुष्य नक्षत्रात एकत्र प्रवेश करतात त्यावेळी भगवान विष्णू कल्की अवतारात जन्म घेतात, असे म्हटले जाते.

Zodiac Sign: सर्वार्थ सिद्धी योगामुळे सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होऊ शकतो अनपेक्षित लाभ

स्कंद षष्ठी व्रत केल्याने अपत्यप्राप्तीचे सुख

स्कंद षष्ठीचा दिवस भगवान कार्तिकेयेला समर्पित आहे. स्कंद षष्ठीच्या दिवशी उपवास केल्याने संततीच नाही तर आनंद, शांती आणि आजारांपासून सुटका देखील होते, अशी मान्यता आहे. या दिवशी विधिवत पूजा करुन उपवास केल्याने इच्छित लाभ मिळतात.

स्कंद पुराणात उल्लेख केल्यानुसार, महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला स्कंद षष्ठी साजरी केली जाते. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सहाव्या दिवशी भगवान कार्तिकेय यांनी तारकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला, त्यानंतर ही तारीख स्कंद षष्ठी म्हणून साजरी केली जाऊ लागली. या विजयाच्या आनंदात देवतांनी स्कंद षष्ठी साजरी केली.

स्कंद षष्ठी पूजा पद्धत

स्कंद षष्ठीच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्वच्छ कपडे परिधान करावे.

देव्हारा स्वच्छ करुन चौरंगावर लाल कापड पसरवा.

त्यानंतर त्यावर कार्तिकेयची मूर्ती स्थापन करा. त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा आणि नऊ ग्रहांची पूजा करा.

पूजेदरम्यान कार्तिकेयांना चंपा फुले, दागिने, दिवे, धूप आणि नैवेद्य अर्पण करा. चंपा हे भगवान कार्तिकेयांचे आवडते फूल आहे. स्कंद षष्ठीला कांड षष्ठी किंवा चंपा षष्ठी असेही म्हणतात. भगवान कार्तिकेयची आरती केल्यानंतर आणि तीन वेळा प्रदक्षिणा केल्यानंतर ‘ॐ स्कंद शिवाय नम:’ या मंत्रांचा जप करावा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Kalki jayanti and skanda shashti shubh muhurt method of worship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 11:09 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Budha Nakshatra Gochar: १९ मेपासून या राशींच्या लोकांचे सुरू होणार चांगले दिवस, करिअरमध्ये होतील मोठे बदल
1

Budha Nakshatra Gochar: १९ मेपासून या राशींच्या लोकांचे सुरू होणार चांगले दिवस, करिअरमध्ये होतील मोठे बदल

Vinayak Chaturthi: अधिक महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा पद्धत
2

Vinayak Chaturthi: अधिक महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा पद्धत

Babul Nath Temple: मुंबईतील प्राचीन शिवधाम बाबुलनाथ मंदिराचा काय आहे इतिहास, जाणून घेऊया धार्मिक महत्त्व
3

Babul Nath Temple: मुंबईतील प्राचीन शिवधाम बाबुलनाथ मंदिराचा काय आहे इतिहास, जाणून घेऊया धार्मिक महत्त्व

शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक का केला जातो? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
4

शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक का केला जातो? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.