फोटो सौजन्य- pinterest
आज 30 जुलै रोजी बुधवार असल्याने सर्व राशीच्या लोकांवर बुध ग्रहाचे वर्चस्व राहील. चंद्र बुधाच्या कन्या राशीत दिवसरात्र संक्रमण करेल. त्याचसोबत मंगळासोबत युती करुन धन योग तयार करेल. तसेच सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य आणि रवी योग तयार होईल. त्याचबरोबर हस्त नक्षत्राच्या युतीने सिद्धी आणि सर्वार्थ सिद्धी योगही तयार होणार आहे. सर्वार्थ सिद्धी योगामुळे सिंह राशीसह या राशीच्या लोकांना आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांचे अडकलेली कामे आज पूर्ण होतील. तर कामात येणारे अडथळे देखील दूर होतील. कुटुंबात सुख आणि समृद्धी येईल. कोणत्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर आहे, जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांना अपेक्षेपेक्षा चांगला फायदा होईल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सर्जनशीलतेचा फायदा होईल. चित्रपट, मनोरंजन उद्योग, गायन, नृत्य या क्षेत्रांशी संबंधित लोकांना अतिरिक्त फायदे मिळू शकतात. तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत राहाल. शेअर बाजाराशी संबंधित असलेल्या लोकांना आज अनुकूल परिणाम मिळतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. तुम्ही तुमच्या संवाद कौशल्याने लोकांना प्रभावित करू शकता. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होईल. तुम्हाला व्यवसायाच्या संदर्भात जवळपास कुठेतरी प्रवास करण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील तुमच्या लहान भावंडांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहील. तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. व्यवसायात फायदा होऊ शकतो. तुम्हाला बाजारात अडकलेले तुमचे पैसे परत मिळण्याची अपेक्षा आहे. तुम्ही रेस्टॉरंट्स, फूड आउटलेट्स, हॉटेल उद्योगाशी संबंधित असलेल्यांना अधिक फायदा होईल. तुम्हाला कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला परदेशांशी संबंधित नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये गुंतवणूक केली असाल तर तम्हाला चांगला फायदा मिळेल. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या येत असल्यास त्या दूर होतील. रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स, लॅब इत्यादी व्यवसायात गुंतलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल.
मीन राशीच्या लोकांचा आजचा दिवस सकारात्मक असेल. जर तुम्ही नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तसेच तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी ते फायदेशीर राहील. नोकरी करणाऱ्या लोकांना सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)