फोटो सौजन्य- pinterest
वास्तुशास्त्रामध्ये दिशांना महत्त्व देण्यात आलेले आहे. अनेकदा लोक घरामध्ये माशांचे चित्र लावतात. त्यामुळे घराचे सौदर्यं तर वाढतेच. त्याचबरोबर वास्तुशास्त्रातही याला शुभ मानले जाते. मान्यतेनुसार, घरामध्ये माशाचे चित्र लावल्याने आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. हे चित्र घराच्या उजव्या भिंतीवर लावल्याने व्यक्तीला घरातील समस्यांपासून सुटका होते. मात्र हे चित्र चुकीच्या दिशेने लावल्यास त्याचा आपल्या घरावर विपरित परिणाम होतो. घरामध्ये कोणत्या दिशेला माशांचे चित्र लावणे शुभ आणि फायदेशीर मानले जाते, जाणून घ्या
वास्तुशास्त्रानुसार, माशांचे चित्र घरामध्ये योग्य दिशेने लावल्यास आर्थिक समस्यांपासून सुटका होते आणि हळूहळू आर्थिक लाभाच्या शक्यता निर्माण होऊ लागतात. जर तुम्ही वास्तुशास्त्राच्या सर्व नियमांचे पालन करून माशाचे चित्र घरामध्ये लावले तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये नेहमीच सुख, शांती आणि समृद्धी राहते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना जीवनात आणि करिअरमध्ये प्रगती करण्यास मदत होते. तसेच कुटुंबातील वातावरण आनंदी राहते.
घरामध्ये माशांचे चित्र योग्य दिशेला लावणे शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. घरामध्ये हे चित्र ईशान्य दिशेला लावणे शुभ मानले जाते. तसेच उत्तर दिशेला लावणे देखील शुभ मानले जाते. या दिशांना चित्र लावणे शुभ मानले जाते. या दिशेला माशाचे चित्र ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि नकारात्मकता दूर होते.
घरामध्ये अशा ठिकाणी कधीही माशांचे चित्र लावू नये ज्या ठिकाणी अस्वच्छता असेल. त्याचा तुम्हाला अशुभ परिणाम मिळतात.
त्याचप्रमाणे स्वयंपाकघर, बाथरूम किंवा शौचालयाजवळील भिंतीवर माशांचे चित्र लावू नये त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करु शकते.
घरामध्ये कधीही माशांचे अस्पष्ट असलेले किंवा फाटलेले असे फोटो लावू नये.
असे मानले जाते की, घरात माशांचे असे चित्र लावावेत ज्यामध्ये ते फिरताना दिसतात आणि मागची पार्श्वभूमी देखील सकारात्मक असावी. वास्तुशास्त्रानुसार, घरात कोई आणि सोनेरी माशांचे चित्र लावणे खूप शुभ मानले जाते. घरामध्ये अशा प्रकारचे माशांचे चित्र लावल्याने आर्थिक संकटातूनही सुटका होण्यास मदत होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)