फोटो सौजन्य - Pinterest
हिंदू धर्मात लग्न जमवण्याअगोदर मुलाची तसेच मुलीची कुंडली तपासली जाते. यामध्ये दोघांचे तारे, नक्षत्रांचा अभ्यास केला जातो आणि त्या अनुशंघाने लग्न झाल्यावर त्या नवजोडप्याचे आयुष्य कसे असेल याचा अनुमान लावला जातो. जर कुंडलीत काही दोष असतील ज्याने दोन्ही कुंडलीच्या मिलनात बाधा येत असेल तर ते लग्न जमू शकत नाही असा निर्णय पंडितांकडून घेतला जातो. हे दोष वेगेवेगळे असू शकतात. कालसर्प दोष, मंगल दोष असे अनेक दोष एखाद्याच्या कुंडलीत असू शकतात. जर पुरुषाच्या कुंडलीत मंगल दोष असला तर त्याचा विवाह हा मंगल दोष असणाऱ्या स्त्रीशीच झाला पाहिजे असे शास्त्राचे सांगणे आहे.
काय असते मंगळ दोष?
जेव्हा मंगळाची स्थिती पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा आठव्या भावात असते तेव्हा मंगळ दोष निर्माण होतो. याचा परिणाम त्या व्यक्तीच्या विवाह जीवनावर होतो. ज्योतिषशास्त्राच्या अनुसार, मंगळ दोष खतरनाक दोषांपैकी एक आहे. या दोषाचा परिणाम मुख्यतः व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावर होतो. जर विवाहित जोडप्यातील एका व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्या व्यक्तीच्या जोडीदाराला याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे मंगळ दोष असणाऱ्या व्यक्तीचा विवाह नेहमी मंगळ दोष असणाऱ्या व्यक्तीशीच केलं जाते.
कुंडलीत मंगळ दोष असणाऱ्या व्यक्तीचा विवाह मंगळ दोष असणाऱ्या व्यक्तीशीच केले गेले तर दोघांचे गुण मिळून दोष हटवला जाऊ शकतो. तसेच जर एखाद्या स्त्रीचा विवाह शाळिग्रामजींसोबत केले तर त्या स्त्रीच्या कुंडलीतील मंगळ दोष कमी होतो. तसेच जर एखाद्या पुरुषाच्या कुंडलीत मंगळ दोष असेल आणि त्याचे लग्न जर मंदाराच्या (रुई) झाडाशी लावून दिले तर पुरुषाच्या कुंडलीतील मंगल दोष कमी होतो. परिणामस्वरूपी, दोघे स्त्री-पुरुष गैर मांगलिक असणाऱ्या व्यक्तीशीही विवाह करू शकतात.
(ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)