Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Makar Sankranti 2026: हिंदू सणांमध्ये काळा रंग अशुभ, पण मकरसंक्रांतीला का मानला जातो शुभ

कोणत्याही सणात किंवा धार्मिक समारंभात काळे कपडे घालणे अशुभ मानले जाते. मात्र मकरसंक्रांत हा एक असा सण आहे तिथे काळे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. काय आहे यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jan 11, 2026 | 02:37 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • मकरसंक्रांतीला काळा रंग का शुभ मानला जातो
  • हिंदू सणांमध्ये काळा रंग अशुभ
  • धार्मिक आणि वैज्ञानिक कारण
 

भारतात सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. कारण प्रत्येक उत्सव जीवनात उत्साह निर्माण करतात. आळस, मरगळ झटकून नवचैतन्य देतात. प्रत्येक सणात विशिष्ट पोषकाची परंपरा आहे. हल्ली नवरात्रोत्सवात तर विविध रंगांचे कपडे घालण्याची नवीन परंपरा रूजू झाली आहे. त्यात काही गैर नाही. पण त्यातही कुठेही काळा रंग येत नाही. तसं म्हटलं तर हिंदू धर्मात काळा रंग निषेधार्थच किंवा अशुभच मानला आहे. पण मकरसंक्रांतीच्या दिवशी मात्र काळ्या रंगाची साडी, वस्त्र परिधान करण्याची परंपरा आहे. ही नेमकी काय आहे. यामागे काय शास्त्र आहे. हिंदू सणांमध्ये काळा रंग अशुभ, पण मकरसंक्रांतीला का मानला जातो शुभ काय आहे यामागील कारण जाणून घ्या

सामान्यतः हिंदू धर्मात कोणतेही सण-उत्सव, व्रत किंवा पूजा-पाठाच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते. काळा रंग दुःख, नकारात्मकता आणि अडथळ्यांचे प्रतीक मानला जातो. मात्र, मकरसंक्रांती हा असा एकमेव सण आहे, ज्यादिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणे सांगितली जातात.

मकरसंक्रांतीचे धार्मिक महत्त्व

सनातन धर्मात मकरसंक्रांतीचा सण अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात. सूर्यदेवांच्या या संक्रमणामुळे उत्तरायणास सुरुवात होते. या दिवशी सूर्यपूजा, गंगा व इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान तसेच दानधर्माला विशेष महत्त्व असते. यंदा बुधवार, 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण करा या गोष्टी, जीवनात येईल सुख समृद्धी

देशभरात हा सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. उत्तर भारतात याला खिचडी, पंजाबमध्ये लोहडी तर दक्षिण भारतात पोंगल म्हणून ओळखले जाते. या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे.

मकरसंक्रांतीला काळा रंग का शुभ मानला जातो?

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनि देवाच्या मकर राशीत प्रवेश करतात. ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग हा शनि देवाशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास शनि देवाची कृपा प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात मकरसंक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालण्याची परंपरा आहे.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रांतीला तीळगूळ का दिला जातो? काय आहे यामागील धार्मिक आणि सामाजिक कारणे

काय आहेत वैज्ञानिक कारणे

मकरसंक्रांती हा ऋतूबदलाचा सण मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी थंडी अधिक असते. काळा रंग उष्णता अधिक प्रमाणात शोषून घेतो, त्यामुळे शरीराला उब मिळते. म्हणूनच थंडीपासून संरक्षणासाठीही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मग मकरसंक्रांतीला काळा रंग शुभ का मानला जातो?

    Ans: मकरसंक्रांती हा सूर्यदेवाच्या उत्तरायण प्रवासाची सुरुवात दर्शवणारा सण आहे. या काळात हिवाळा तीव्र असतो. काळा रंग उष्णता शोषून घेतो, त्यामुळे शरीर उबदार राहते. म्हणून मकरसंक्रांतीला काळ्या कपड्यांना शुभ मानले जाते.

  • Que: मकरसंक्रांतीला काळे कपडे घालण्यामागे धार्मिक कारण काय आहे?

    Ans: मान्यतेनुसार काळा रंग नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी काळे कपडे परिधान केल्याने वाईट ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते, असे मानले जाते.

  • Que: मकरसंक्रांतीला काळ्या कपड्यांसोबत आणखी काय परिधान केले जाते?

    Ans: काळ्या साडी किंवा ड्रेससोबत सोनेरी दागिने, हिरवी बांगडी, हळदी-कुंकू लावणे शुभ मानले जाते. यामुळे सौभाग्य आणि समृद्धी वाढते अशी श्रद्धा आहे.

Web Title: Makar sankranti 2026 why is it auspicious to wear black clothes on makar sankranti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Hindu Festival
  • hindu religion
  • Makar Sankranti

संबंधित बातम्या

Shattila Ekadashi 2026: षटतिला एकादशी का मानली जाते पुण्यदायी? जाणून घ्या सहा तीळ उपायांचे महत्त्व
1

Shattila Ekadashi 2026: षटतिला एकादशी का मानली जाते पुण्यदायी? जाणून घ्या सहा तीळ उपायांचे महत्त्व

Bhogi 2026 Astrology: भोगीच्या दिवशी ग्रहांची होणार दुर्मिळ युती, सूर्य मंगळ आणि शुक्र एकत्रितपणे करणार धनाचा वर्षाव
2

Bhogi 2026 Astrology: भोगीच्या दिवशी ग्रहांची होणार दुर्मिळ युती, सूर्य मंगळ आणि शुक्र एकत्रितपणे करणार धनाचा वर्षाव

पोटच्या मुलानेच केला आईचा शिरच्छेद अन्…; देवी रेणुका माता आणि परशुरामाची ‘ही’ आख्यायिका तुम्हाला माहितेय का ?
3

पोटच्या मुलानेच केला आईचा शिरच्छेद अन्…; देवी रेणुका माता आणि परशुरामाची ‘ही’ आख्यायिका तुम्हाला माहितेय का ?

‘हिंदूंनो Makar Sankranti साजरी केल्यास…’; बांगलादेशच्या जमात-ए-इस्लामी कट्टर संघटनेची धमकी
4

‘हिंदूंनो Makar Sankranti साजरी केल्यास…’; बांगलादेशच्या जमात-ए-इस्लामी कट्टर संघटनेची धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.