
घनदाट अरण्यात जन्मलं बाळ
भर्तरीनाथांच्या जन्माची गोष्ट अंगावर काटा आणणारी आहे. अशी आख्य़ायिका सांगितली जाते की, एकदा गहिनीनाथांनी मच्छिंद्रनाथांना विचारलं गुरुवर्य भर्तरी कोण, त्याच्या जन्माचं रहस्य काय ? त्यावेळी मच्छिंद्रनाथ म्हणाले, भर्तरी हा सूर्य नारायणांचा अंश आहे. एका घनदाट अरण्यात एक पाण्याने भरलेलं पात्र होतं. त्या पात्रात सूर्य नारायणांचा अंश पडला आणि त्यातून एक बाळ जन्माला आलं. आजूबाजूला जंगल असल्याने मानवी वस्ती जवळ नव्हतीच. या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून तिथे असलेल्या हरीणीने या बाळाला तिचं दूध पाजून जगवलं.
पशु पक्षांची भाषा अवगत असलेले भर्तरीनाथ
इतर प्राण्यांनी देखील या बाळाची काळजी घेतली. त्या जंगलातून जात असलेल्या जयसिंग आणि रेणुका या दाम्पत्याने या बाळाला घरी आणलं. त्याला माणसांची भाषा शिकवली. तिथून भर्तरी लहानाचा मोठा झाला, असं मच्छिंद्रनाथांनी गहिनीनाथांना सांगितलं होतं. भर्तरीनाथांचा जन्म अरण्यात झाला त्यांना सुरुवातीचे काही दिवस प्राण्यांनी सांभाळलं. त्यामुळे भर्तरीनाथांना पशु पक्षांनी भाषा येत असे. नवनाथांपैकी भर्तरीनाथ हे असे होते की, त्यांचं निसर्गाशी असलेलं नातं जन्मापासूनचं होतं. पुढे वयात आल्यानंतर भर्तरीनाथांनी योग विद्येचं शिक्षण घेतलं आणि नाथसंप्रदायाचा प्रसार केला. भर्तरीनाथांनी पुढे घरादाराचा त्याग केला, त्यांनी गृहस्थाश्र सोडून संन्यासी जीवन पत्करलं.भर्तरीनाथ हे लहानपणी इतर मुलांच्या तुलनेत अगदी वेगळे होते. त्यांनी नाथसंप्रदायाचा वसा पुढे चालवला. मराठवाड्यातव भर्तरीनाथांनी बराच काळ घालवला त्यामुळे नाथसंप्रदायात मराठवाड्याचं महत्व देखील मोठं आहे.आजही परभणी जिल्ह्यात श्रावण महिन्यातील नागपंचमीला भर्तरीनाथांची पालखी निघते. श्राावण महिन्यात भर्तरीनाथांचा मोठा उत्सब राबवला जातो.