Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2026: नवरात्रीचा चौथा दिवस देवी कुष्मांडाला समर्पित, कशी करावी देवीची पूजा जाणून घ्या

Navratri 2026: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडाची पूजा केली जाते. या दिवशी देवीला नैवेद्य अर्पण करून विशेष मंत्रांचा जप केला जातो. जाणून घ्या पूजेची विधी, नैवेद्य आणि निळ्या रंगाचे महत्त्व.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 14, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नवरात्रीचा चौथा दिवस देवी कुष्मांडाला समर्पित
  • कुष्मांडाला देवीची पूजा करण्याची पद्धत
  • निळ्या रंगांचे काय आहे महत्त्व
 

 

बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा चौथा दिवस आहे. या दिवशी देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. देवीच्या नऊ रुपांपैकी हे चौथे रुप मानले जाते. कुष्मांडा म्हणजे आपल्या दिव्य हास्याने सृष्टीची निर्मिती करणारी शक्ती. त्यामुळे माता कुष्मांडा यांना सृष्टीची आदीशक्ती, ऊर्जा आणि आरोग्य देणारी देवी म्हणून पूजलं जातं.

निळा रंगांचे महत्त्व

आजचा रंग आहे निळा. निळा रंग शांतता, स्थैर्य, विश्वास, संयम आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं म्हणून या दिवशी निळा रंगांचे कपडे परिधान करून देवीचं दर्शन किंवा पूजा करण्याची प्रथा आहे.

या गोष्टींचा दाखवा नैवेद्य

मातेला मालपोआ, पेठा किंवा गोड पदार्थ याशिवाय पांढरा भोपळा म्हणजेच पृष्पांड, फळ आणि पंचामृत अर्पण करण्याची परंपरा काही ठिकाणी आहे. विशेषतः पृष्पांड भोपळा या नावांशी संबंधित असल्याने भोपळ्याचा नैवेद्य काही भक्त अर्पण करतात. मात्र नैवेद्याची पद्धत कुटुंब आणि प्रदेशानुसार वेगळी नक्कीच असू शकते.

Shardiya Navratri 2026: घटस्थापनेची रोपं हिरवीगार की खुंटलेली? धार्मिक महत्त्व, शुभ संकेत आणि विसर्जनाची परंपरा जाणून घ्या!

या दिवशी काय करावे

सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवीसमोर दिवा लावून फुल, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करावा. शक्य असल्यास निळ्या रंगांचे वस्त्र परिधान करून माता कुष्मांडाचे स्मरण करून आरती आणि नामस्मरण करावं. माता कुष्मांडेला प्रसन्न करण्यासाठी ओम देवी कुष्मांडेय नमः या मंत्रांचा जप करावा. आपल्या श्रद्धेनुसार, दुर्गा शक्ती स्त्रोत, देवी स्त्रोत किंवा नवरात्रीची आरती देखील म्हणता येते.

Durga Mahishasura War: दुर्गामाता आणि महिषासुराचे युद्ध 9 दिवस का चालले? जाणून घ्या संपूर्ण रंजक कथा

धार्मिक मान्यता

धार्मिक मान्यतेनुसार, माता कुष्मांडा भक्तांना आरोग्य, सुख समृद्धी, ऊर्जा आणि सकारात्मकता प्रदान करते त्यामुळे चौथ्या दिवशी या देवी शक्तीचं स्मरण करून सकारात्मकतेने स्मरण करून साधना करावी.

कोण आहे देवी कुष्मांडा?

दुर्गा मातेच्या नऊ रूपांपैकी देवी कुष्मांडा हे चौथे रूप आहे. धार्मिक कथांनुसार, जेव्हा सर्वत्र अंधार होता, तेव्हा देवीने आपल्या दिव्य हास्याने सृष्टीची निर्मिती केली. म्हणूनच तिला विश्वाची आदिशक्ती असेही म्हटले जाते. देवी कुष्मांडा भक्तांना ऊर्जा, धैर्य आणि सकारात्मक विचारांची प्रेरणा देते, अशी श्रद्धा आहे.

देवी कुष्मांडाचे स्वरूप तेजस्वी असून, तिला आठ हात असल्याचे वर्णन आढळते. तिच्या हातांमध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृतकलश, चक्र आणि गदा यांसारखी आयुधे व वस्तू दाखविल्या जातात. तिचे वाहन सिंह आहे. देवीच्या या रूपाची पूजा केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होऊन मनाला बळ मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Navratri 2026 goddess kushmanda puja method on the fourth day of navratri pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • Navratri
  • navratri day
  • Navratri festival

संबंधित बातम्या

Exclusive Navarashtra-Navadurga: लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली अन् झाडांच्या प्रेमात पडली! माधुरीने उभारला ‘वृक्षवल्ली’चा डोलारा
1

Exclusive Navarashtra-Navadurga: लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली अन् झाडांच्या प्रेमात पडली! माधुरीने उभारला ‘वृक्षवल्ली’चा डोलारा

Navratri 2026: अष्टमीला देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Navratri 2026: अष्टमीला देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Exclusive Navarashtra-Navadurga: वडिलांची शेवटची इच्छा अन् एका ऑडिशनने बदललं कृतीचे नशीब! भन्सालींची पहिली संधी हुकली पण….
3

Exclusive Navarashtra-Navadurga: वडिलांची शेवटची इच्छा अन् एका ऑडिशनने बदललं कृतीचे नशीब! भन्सालींची पहिली संधी हुकली पण….

Navratri 2026: नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित, अशा पद्धतीने करा देवीची पूजा
4

Navratri 2026: नवरात्रीचा पहिला दिवस देवी शैलपुत्रीला समर्पित, अशा पद्धतीने करा देवीची पूजा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.