
फोटो सौजन्य- pinterest
आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीच्या रुपाची पूजा केली जाते. देवी कात्यायनी ही शक्ती, धैर्य आणि विजयाचं प्रतीक मानली जाते. भक्तीभावाने देवीची पूजा करून सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी पूजा केली जाते. कात्यायनी देवी ही नवदुर्गेमधील सहावी देवी मानली गेली आहे. या देवीचं वाहन सिंह असून देवीला चार हात आहे. तिच्या एका हातात तलवार, एका हातात कमळ आणि इतर हातांमध्य अभय आणि वरदमुद्रा असल्याचं वर्णन आढळतं.
यंदा नवरात्रीच्या सहाव्या दिवशी हिरवा रंग परिधान केला जाणार आहे. हिरवा रंग निसर्ग, समृद्धी आणि नवचैतन्याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी हिरव्या रंगांचे वस्त्र परिधान करून देवीची आराधना करण्याची प्रथा आहे.
या दिवशी सकाळी लवकर उठून घराची आणि देवघराची स्वच्छता करून देवीसमोर दिवा लावावा. माता कात्यायनीची पूजा करून फुल अर्पण करावी. देवीला दूध, साखर किंवा साखरीत पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावा. आपल्या घरातील परंपरेनुसार एखादा पदार्थ अर्पण करावा. कात्यायनी देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. पण मध उपलब्ध नसेल तर आपल्या परंपरेनुसार खीर, पेढे इतर गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करता येऊ शकतात.
पूजेच्या वेळी ओम देवी कात्यायनी नमः या मंत्रांचा जप करावा. शक्य असल्यास दुर्गा सप्तशक्ती आणि देवीची आरती किंवा नवरात्रीतील संबंधित स्तोत्राचा पठण करावं.
देवी दुर्गेच्या नवदुर्गांपैकी सहावे रुप असलेली देवी कात्यायनी. पौराणिक कथेनुसार, महर्षी कात्यायन यांनी देवीची कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन देवीने त्यांच्या घरी कन्यारूपात जन्म घेतला. त्यामुळे देवीला कात्यायनी हे नाव पडले, अशी मान्यता आहे. माता कात्यायनी यांना आदिशक्तीचे तेजस्वी आणि पराक्रमी रूप मानले जाते. त्या अन्यायाचा नाश करून धर्माचे रक्षण करतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. देवीचे हे रूप शक्ती, निर्भयता आणि दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचा संदेश देते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायनीची पूजा केली जाते. त्या नवदुर्गांच्या सहाव्या रूप मानल्या जातात.
Ans: माता कात्यायनी या देवी दुर्गेचे पराक्रमी रूप आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, त्यांनी महिषासुराचा वध करून देवतांना त्याच्या अत्याचारांतून मुक्त केले.
Ans: अनेक धार्मिक परंपरांमध्ये माता कात्यायनीला मध अर्पण केला जातो. याशिवाय आपल्या घरातील प्रथा आणि श्रद्धेनुसार सात्त्विक नैवेद्य दाखवता येतो.