Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2026: नवरात्रीचा नववा दिवस सिद्धीदात्री देवीला समर्पित, कशी करावी पूजा जाणून घ्या

Navratri 2026: आज सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा नववा दिवस आहे. महानवमीचा दिवस देवी सिद्धीदात्रीला समर्पित आहे. या दिवशी काही ठिकाणी कन्या पूजन देखील केले जाते. सिद्धीदात्री देवीची पूजा कशी करावी, देवीला कोणता नैवेद्य दाखवावा जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 19, 2026 | 07:05 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • नवरात्रीचा नववा दिवस सिद्धीदात्री देवीला समर्पित
  • सिद्धीदात्री देवीची पूजा करण्याची पद्धत आणि महत्त्व
  • मोरपिसी रंगांचे काय आहे महत्त्व
 

आज सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्रीचा नववा दिवस असून सिद्धीदात्री देवीला समर्पित आहे. नवदुर्गेच्या नऊरुपांपैकी हे शेवटचे रुप मानले जाते. या दिवशी काही ठिकाणी कन्या पूजन देखील केले जाते. या दिवशी देवीला विविध गोष्टींचा नैवेद्य देखील दाखवला जातो. सिद्धीदात्री देवीची पूजा कशी करावी, देवीला कोणता नैवेद्य दाखवावा जाणून घ्या

नवरात्रीचा नववा दिवस देवी सिद्धीदात्रीला समर्पित

आज सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा नववा दिवस आहे. नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धीदात्रीची पूजा केली जाते. सिद्धीदात्री हे दुर्गेचे नववे आणि अंतिम स्वरुप मानले जाते. देवीला सिद्धी, ज्ञान, बुद्धी आणि अध्यात्मिक शक्ती प्रदान करणारी देवी मानली जाते. देवीच्या या शेवटच्या दिवशी देवीची मनोभावे पूजा करून नऊ दिवसांच्या उपासनेची सांगता करता येते.

Dussehra 2026: दसऱ्याला शमीपूजन आणि आपट्याची पाने सोनं म्हणून का वाटतात? पांडव आणि कौत्साची रंजक कथा

मोरपिसी रंगांचे महत्त्व

यंदा नवमीच्या दिवशी मोरपिसी रंग आहे. हा रंग शांतता, सौदर्यं, सकारात्मकता आणि आध्यात्मिक उर्जेचं ते प्रतीक मानलं जातं. मोरपिसी रंगांमध्ये हिरवा आणि निळा अशा दोन्ही रंगांचा सुंदर असा मिलाफ असल्यामुळे तो निसर्ग, संतुलन, स्थैर्य आणि प्रसन्नतेशी देखील जोडला जातो. या दिवशी मोरपिसी रंगांचे कपडे परिधान करून देवीची पूजा करण्याची परंपरा तुमच्या नवरात्रीच्या रंगक्रमानुसार पाळता येते.

देवी सिद्धीदात्रीला कोणता नैवेद्य अर्पण करावा?

मात्र देवी सिद्धीदात्रीला तीळ अर्पण करण्याची परंपरा आहे. तिळाचे लाडू, तिळापासून तयार केलेला सात्विक पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करता येतो या दिवशी खीर, हलवा, पुरी, नारळाचे पदार्थ आणि फळ सुद्धा नैवेद्य म्हणून ठेवता येतात.

नवमीला कन्या पूजनाचे महत्त्व

नवमीच्या दिवशीसुद्धा अनेक ठिकाणी कन्या पूजन केले जाते. अनेक ठिकाणी कन्यांना देवीचे रुप मानून त्यांना भोजन, फळ, मिठाई आणि भेटवस्तू देण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. ओम देवी सिद्धीदात्रेय नमः या मंत्रांचा श्रद्धेने जप करून देवीकडे सुख शांती, आरोग्य, समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी.

Navratri 2026: नवरात्रीमध्ये देवीचे कुंकुमार्चन का करतात? कोणी करावा हा विधी, जाणून घ्या महत्त्व

सिद्धीदात्री देवीचे कसे आहे स्वरुप

नवदुर्गांपैकी शेवटचे रुप असलेली देवी म्हणजे सिद्धीदात्री देवी. देवी सिद्धीदात्री भक्तांना सिद्धी, ज्ञान, बुद्धी आणि आध्यात्मिक शक्ती प्रदान करते. ‘सिद्धी’ म्हणजे विशेष आध्यात्मिक क्षमता आणि ‘दात्री’ म्हणजे देणारी. त्यामुळे सिद्धीदात्री या नावाचा अर्थ सिद्धी प्रदान करणारी देवी असा होतो. देवी सिद्धीदात्री कमळावर विराजमान आहे. तिला चार हात असून हातांमध्ये शंख, चक्र, गदा आहे. कमळ हे पवित्रता आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: सिद्धीदात्री देवी कोण आहे?

    Ans: सिद्धीदात्री देवी ही देवी दुर्गेच्या नवदुर्गा स्वरूपांपैकी नववे आणि अंतिम रूप मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, ती भक्तांना सिद्धी, ज्ञान, बुद्धी आणि आध्यात्मिक शक्ती प्रदान करते.

  • Que: सिद्धीदात्री देवीची पूजा कशी करावी?

    Ans: सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. पूजास्थान स्वच्छ करून देवीसमोर दिवा लावावा. फुले, अक्षता, धूप आणि नैवेद्य अर्पण करून देवीची आरती करावी. आपल्या घरातील परंपरेनुसार पूजा करता येते.

  • Que: सिद्धीदात्री देवीच्या पूजेचे महत्त्व काय आहे?

    Ans: धार्मिक श्रद्धेनुसार, देवी सिद्धीदात्रीची पूजा केल्याने ज्ञान, विवेक, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देवीचा आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे.

Web Title: Navratri 2026 siddhidatri goddess worship method imporant pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 07:05 AM

Topics:  

  • Navratri
  • navratri day
  • Navratri festival

संबंधित बातम्या

Navratri 2026: दक्षिण भारतातील बोम्मई गोलू उत्सव काय आहे? नवरात्रीत बाहुल्यांची आकर्षक मांडणी करण्यामागील परंपरा जाणून घ्या
1

Navratri 2026: दक्षिण भारतातील बोम्मई गोलू उत्सव काय आहे? नवरात्रीत बाहुल्यांची आकर्षक मांडणी करण्यामागील परंपरा जाणून घ्या

Akola Navratri: नवरात्रीच्या उत्सवात बळीराजाच्या वेदनांना वाचा! अकोल्यातील जिवंत देखाव्याने काळीज हेलावलं
2

Akola Navratri: नवरात्रीच्या उत्सवात बळीराजाच्या वेदनांना वाचा! अकोल्यातील जिवंत देखाव्याने काळीज हेलावलं

Navratri 2026: नवरात्रीमध्ये देवीचे कुंकुमार्चन का करतात? कोणी करावा हा विधी, जाणून घ्या महत्त्व
3

Navratri 2026: नवरात्रीमध्ये देवीचे कुंकुमार्चन का करतात? कोणी करावा हा विधी, जाणून घ्या महत्त्व

Dombivli Navratri: डोंबिवलीत ‘श्रीदेवी महिषासुरमर्दिनी’ नाट्याविष्काराने जिंकली रसिकांची मने; भारतीय संस्कृतीचे घडले दर्शन
4

Dombivli Navratri: डोंबिवलीत ‘श्रीदेवी महिषासुरमर्दिनी’ नाट्याविष्काराने जिंकली रसिकांची मने; भारतीय संस्कृतीचे घडले दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.