Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri Special: डोंगरावरील महालक्ष्मी गड ते गुहेतील संतोषी मातेचे स्थान; डहाणूतील मंदिरांचा इतिहास

Navratri Special: नवरात्रीनिमित्त आपण प्रसिद्ध देवींच्या मंदिरांना भेट देतो मात्र तुम्हाला माहीत आहे का डहाणूमधील ही दोन जागृत प्रसिद्ध मंदिरे. जाणून घेऊया डहाणूतील महालक्ष्मी आणि संतोषी माता या मंदिरांविषयी..

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Oct 14, 2026 | 10:15 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात महालक्ष्मी आणि संतोषी मातेची प्रसिद्ध मंदिरे
  • विवळवेढे येथील महालक्ष्मी मंदिराची स्थापना १३०६ मध्ये झाल्याचे सांगितले जाते
  • महालक्ष्मी देवीला स्थानिक आदिवासी बांधव ‘कोळवणची महालक्ष्मी’ किंवा ‘आदिमाता’ मानतात
 

शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झालेली आहे. सर्वत्र भक्तीभावाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. यादरम्यान देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या पाहायला मिळतात. असेच जागृत आणि स्वयंभू असलेले पालघर जिल्ह्यातील धानो तालुक्यातील चारोटी गावाजवळ महालक्ष्मी आणि संतोषी माता देवीचे मंदिर आहे. या मंदिराला धार्मिक महत्त्व आणि इतिहास आहे. या मंदिरामध्ये नवरात्रोत्सवात गर्दी असते. जाणून घेऊया प्रसिद्ध मंदिराविषयी.

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी देवी आणि संतोषी माता यांची प्रसिद्ध मंदिर आहेत. हे मंदिर भाविकांसाठी महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. दोन्ही मंदिरांना भेट दिल्यास देवीचे दर्शन, स्थानिक आदिवासी संस्कृती आणि निसर्गरम्य परिसर यांचा अनुभव घेता येतो.

Navratri 2026: नवरात्रीचा चौथा दिवस देवी कुष्मांडाला समर्पित, कशी करावी देवीची पूजा जाणून घ्या

श्री महालक्ष्मी देवी मंदिर, विवळवेढे, डहाणू

डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विवळवेढे येथे असलेले हे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराची स्थापना इ.स. १३०६ मध्ये जव्हारचे राजे महाराजा जयबाजीराव मुकणे यांनी केली होती.

काय आहे या मंदिराचे वैशिष्ट्य

देवीला धन, समृद्धी, सुख आणि कल्याणाची अधिष्ठात्री मानले जाते. या देवीला आदिवासी बांधव ‘कोळवणची महालक्ष्मी’ किंवा ‘आदिमाता’ असे मानले जाते. येथील पुजारी पारंपरिक आदिवासी समाजातील (वाघमारे/सातवी कुटुंब) असतात.  या देवीच्या मंदिरात उत्सवादरम्यान वारली आणि इतर स्थानिक आदिवासी समाजाचा सहभाग असतो. तारपा नृत्य हे या भागातील सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे.

दरवर्षी हनुमान जयंतीपासून महालक्ष्मी देवीच्या यात्रेला सुरुवात होते हा उत्सव १५ दिवसांचा असून खूप प्रसिद्ध आहे. या काळात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. यात्रेच्या काळात गर्दी जास्त असते. तसेच शारदीय आणि चैत्र नवरात्र काळात देखील या मंदिरात खूप गर्दी असते.

Shardiya Navratri 2026: घटस्थापनेची रोपं हिरवीगार की खुंटलेली? धार्मिक महत्त्व, शुभ संकेत आणि विसर्जनाची परंपरा जाणून घ्या!

काय आहे कथा

असे सांगितले जाते की, कोल्हापूरची महालक्ष्मी माता गुजरातकडे जात असताना या भागात विसावली होती. येथे देवीची दोन मंदिरे आहेत: एक डोंगरावर (महालक्ष्मी गड) आणि दुसरे डोंगराच्या पायथ्याशी. गडावर जाण्यासाठी अंदाजे ९०० ते १००० पायऱ्या आहेत. गरोदर आणि वृद्ध भाविकांना वर चढणे शक्य व्हावे म्हणून माता स्वतः पायथ्याशी प्रकट झाली, ज्यामुळे पायथ्याचे मंदिर मुख्य मानले जाते.

श्री संतोषी माता मंदिर, आशागड, डहाणू

डहाणू परिसरातील आशागड येथील संतोषी माता मंदिर हे निसर्गरम्य वातावरणातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथे नवीन मंदिराबरोबरच जुने मंदिर आणि दगडांच्या कपारीतील गुहेसारखे स्थान असल्याची माहिती मिळते. स्थानिक पौराणिक कथेनुसार तेथे संतोषी मातेचे स्वयंभू स्थान आहे. त्यामुळे याला जागृत देवस्थान म्हटले जाते. या गुहेमध्ये जाताना खाली वाकून जावे लागते. एकावेळी एक व्यक्ती आत जाऊन देवीचे दर्शन घेऊन त्याच पाउली मागे यावे लागते.

धार्मिक महत्त्व

संतोषी मातेला समाधान, सुख, शांती आणि कौटुंबिक कल्याण देणारी देवी मानले जाते. भाविक देवीचे दर्शन घेऊन आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. संतोषी माता ही महालक्ष्मीचे रूप आणि गणपतीची कन्या असल्याची पौराणिक मान्यता काही परंपरांमध्ये सांगितली जाते.

काय आहे या मंदिराचा इतिहास

१९६० मध्ये ‘जेठ्या बाळा करमोडा’ यांना एका पिंपरीच्या झाडाखाली देवीचा दृष्टांत झाला होता. त्यानंतर शारदीय नवरात्रोत्सवात अष्टमीच्या दिवशी गुहेत स्वयंभू मूर्तीची स्थापना केली.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Navratri special history of mahalaxmi santoshi mata temple in dahanu pp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 10:15 AM

Topics:  

  • Navratri
  • navratri day
  • Navratri festival

संबंधित बातम्या

Exclusive Navarashtra-Navadurga: शाळेच्या चौकटीत न बसणाऱ्या मुलांसाठी उघडली प्रगतीची नवी दारं! ‘राशी पीओएस फाउंडेशन’ची कहाणी
1

Exclusive Navarashtra-Navadurga: शाळेच्या चौकटीत न बसणाऱ्या मुलांसाठी उघडली प्रगतीची नवी दारं! ‘राशी पीओएस फाउंडेशन’ची कहाणी

Navratri 2026: नवरात्रीचा चौथा दिवस देवी कुष्मांडाला समर्पित, कशी करावी देवीची पूजा जाणून घ्या
2

Navratri 2026: नवरात्रीचा चौथा दिवस देवी कुष्मांडाला समर्पित, कशी करावी देवीची पूजा जाणून घ्या

Exclusive Navarashtra-Navadurga: लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली अन् झाडांच्या प्रेमात पडली! माधुरीने उभारला ‘वृक्षवल्ली’चा डोलारा
3

Exclusive Navarashtra-Navadurga: लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली अन् झाडांच्या प्रेमात पडली! माधुरीने उभारला ‘वृक्षवल्ली’चा डोलारा

Navratri 2026: अष्टमीला देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
4

Navratri 2026: अष्टमीला देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.