Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prabhadevi Temple: नवसाला पावणारी प्रभादेवी! गिरणगावातील या मंदिराचा 310 वर्षांचा इतिहास जाणून घ्या

नवसाला पावणारी म्हणून ओळख असलेली आणि 310 वर्षांची परंपरा असलेलं प्रभादेवी मातेचं मंदिर आजही गिरणगावात आपलं पुरातन अस्तित्व ठेवून उभं आहे. या देवीला धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. देवीचा इतिहासजाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 17, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • नवसाला पावणारी प्रभादेवीतील देवीचे मंदिर
  • या मंदिराचा 310 वर्षांचा इतिहास
  • प्रभादेवीच्या मूर्तीचा इतिहास
 

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सात बेटांची ही मुंबापुरी दिवसरात्र धावत असते. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो लोक या मायानगरीत येतात. मुंबईचे स्वरुप हळहळू बदलत आहे. मात्र अजूनही काही भागात मुंबई तिच्या खुणा जपून आहे. मुंबईचे कितीही रुप पालटले तरी मुंबईतील देवस्थान अद्यापही त्याचे मूळ रूप धरुन आहेत. मुळात मुंबईचे नावच मुंबापुरीदेवीच्या नावावरुन पडले. आजही मुंबईतील काही परिसराची नावे त्या देवस्थानावरुन ओळखली जातात. त्याचपैकी एक म्हणजे गिरणगावातील प्रभादेवी मंदिर! हे मुंबईतील 310 वर्षांपूर्वीचं प्रभादेवी मंदिर हे श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपत आजही भक्तांसाठी शांततेचं आणि नवसाला पावणाऱ्या देवीचं स्थान आहे.

मुंबई ही केवळ आधुनिक गगनचुंबी इमारती, गजबजलेले बाजार आणि धावपळीचं जीवन, यासाठी ओळखली जात नाही. तर या शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा दडलेला आहे. त्यातीलच एक रत्न म्हणजे प्रभादेवी मंदिर. जे आजही परंपरेची, श्रद्धेची आणि भक्तीची साक्ष देत उभं आहे. सुमारे 310 वर्षांपूर्वीचे हे मंदिर आजही आपल्या मूळ स्वरूपात भक्तांच्या श्रद्धेचं स्थान म्हणून उभं आहे. या मंदिराच्या इतिहासात त्या-त्या वेळचं समाजजीवन, परंपरा आणि संस्कृतीचं प्रतिबिंब दिसतं. विशेष म्हणजे, मुंबई रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील पूर्वी एल्फिन्स्टन रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानकाला प्रभादेवी देवीच्या नावावरून प्रभादेवी रेल्वे स्थानक हे नाव देण्यात आलं आहे. प्रभावती देवीच्या नावाचा अपभ्रंश होऊन सध्या प्रभादेवी असा उल्लेख केला जातोय.

1715 साली मंदिराची उभारणी “प्रभादेवी देवीची मूर्ती मंदिरासमोरील विहिरीतून मिळाल्याची आख्यायिका आहे. श्रीमंत पठारे प्रभु समाजातील श्याम नायक यांना देवीनं दृष्टांत दिल्यानंतर 1715 साली मंदिराची उभारणी करण्यात आली. या देवीच्या नावावरूनच परिसराला ‘प्रभादेवी’ हे नाव मिळालं. आज जे आगरबाजार म्हणून ओळखलं जातं. तिथं पूर्वी मिठाची आगरे होती. त्या काळातील शिलोत्री लोक देवीला मीठ अर्पण करत. हे या मंदिराच्या इतिहासातील वैशिष्ट्य आहे.

प्रभादेवी मंदिरातील शिलालेख

मंदिर परिसरात 1850 आणि 1960 साली बांधलेले दीपस्तंभ आजही श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक म्हणून उभे आहेत. मंदिराचा कार्यभार जयानंद कृष्णनाथ किर्तिकर यांच्या काळापासून ‘दी कीर्तिकर फॅमिली प्रभादेवी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन’ या ट्रस्टद्वारे पाहिला जातो. आज या ट्रस्टकडे मंदिराचे व्यवस्थापन आहे, या मंदिरात प्रभादेवी देवीच्या शेजारी कालिका आणि चंडिकादेवीच्या मूर्ती असून शक्तीच्या तीन रूपांची साक्ष इथं पाहायला मिळते. याशिवाय, शंकर, गणपती-पार्वती, लक्ष्मी-नारायण, हनुमान, शीतला देवी आणि खोकला देवी यांच्या मंदिरेही इथं आहेत.

Chaitra Amavasya: चैत्र अमावस्येच्या दिवशी या गोष्टींचे करा दान, पूर्वज होतील प्रसन्न

नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख

प्रभादेवी मंदिराचा वार्षिक पौष उत्सव हा भाविकांसाठी विशेष आकर्षण आहे. पूर्वी फक्त तीन दिवसांचा असलेला हा उत्सव सध्या दहा दिवसांचा झाला आहे. मंदिराच्या समोरील वाळूत मेथी लावण्याची प्रथा या उत्सवाला अनोखी ओळख देते. या काळात मंदिर प्रांगणात हजारो भाविकांची गर्दी होत असते. ‘नवसाला पावणारी देवी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभादेवीसमोर नवस बोलण्यासाठी आणि तो फेडण्यासाठी भाविक कुटुंबासह हजेरी लावतात. आजच्या धावपळीच्या काळातही हे मंदिर भक्तांना शांततेचा आणि अध्यात्माचा अनुभव घेण्याची संधी देते.

खोकला देवी मंदिर आणि चमत्कार

प्रभादेवीच्या या मंदिरात आणखी एक छोटे मंदिर आहे ते म्हणजे खोकलादेवीचे मंदिर अख्यायिका सांगितली जाते. या देवीची पीठ-मीठाने ओटी भरल्यास खोकला बरा होतो, असं भक्त सांगतात. देवीची ओटी भरल्यास जुन्यातील जुना खोकला बरा होतो. या देवीची कोणतीही पूजा-अर्चा केली जात नाही. तसेच या देवीला नवससुद्धा केले जात नाही. कितीही जुन्यातला जुना खोकला असो खूप औषधोपचार करुनही खोकला बरा होत नसेल तर देवीची मीठ-पिठाने ओटी भरल्यास खोकला बरा, होतो असं भक्तगण सांगतात. अनेक नवीन आलेल्या भाविकांना या देवीबद्दल ऐकून आश्चर्य व्यक्त करतात. मात्र भाविक त्यांना याबाबत अनुभव सांगतात.

Yelamma Devi: कोण आहेत येलम्मा देवी? काय आहे या देवीचा महिमा जाणून घ्या

प्रभादेवीच्या मूर्तीचा इतिहास

प्रभादेवीच्या मंदिरात असलेली शाकंबरीची मूर्ती 12 व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येते. प्रभादेवी ही मुळची शाकंबरी देवी असल्याचे सांगण्यात येते. 15व्या शतकाच्या अखेरीत जेव्हा पोर्तुगीज भारतात आले तेव्हा त्यांनी मुंबईतील अनेक भागांवर आपले अधिपत्य स्थापित केले. पोर्तुगीजांनी स्थानिकांचे धर्मांतर करण्यास सुरुवात केली. मंदिरे लुटून त्यांचा विध्वंसही केला. त्यावेळी या मंदिरातील मूर्ती वांद्रे येथील एका विहिरीत लपवण्यात आली.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रभादेवी मंदिर किती जुने आहे?

    Ans: हे मंदिर सुमारे 310 वर्षे जुने असून 1715 साली त्याची स्थापना करण्यात आली होती.

  • Que: प्रभादेवी देवीला “नवसाला पावणारी” का म्हणतात?

    Ans: भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असा विश्वास असल्यामुळे प्रभादेवीला “नवसाला पावणारी देवी” म्हणतात.

  • Que: प्रभादेवी मंदिराचा इतिहास काय आहे?

    Ans: आख्यायिकेनुसार देवीची मूर्ती मंदिराजवळील विहिरीत सापडली. त्यानंतर भक्त श्याम नायक यांना दृष्टांत झाल्यावर मंदिराची उभारणी करण्यात आली.

Web Title: Prabhadevi temple 310 year history of the temple of the goddess navsala pavanari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Gochar: तूळ राशीत शुक्राचा प्रवेश; या राशींनी राहावे सावध, ज्योतिषांनी सांगितले उपाय
1

Shukra Gochar: तूळ राशीत शुक्राचा प्रवेश; या राशींनी राहावे सावध, ज्योतिषांनी सांगितले उपाय

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!
3

Panchamrit: पंचामृत ला ‘अमृत’ का मानतात? पूजेत त्याचं महत्त्व जाणून घ्या, कारण फार कमी जणांना माहित!

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
4

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.