Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raksha Bandhan 2026 Date: चंद्रग्रहण, भद्रा अन् राहुकाळ… रक्षाबंधनाच्या दिवशी मुहूर्ताचा मोठा पेच! जाणून घ्या योग्य वेळ

Raksha Bandhan 2026 Date यंदाचे रक्षाबंधन २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरे केले जाणार असल्याचे दिलेल्या पंचांग माहितीनुसार सांगण्यात आले आहे. श्रावण पौर्णिमा २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०८ वाजता सुरू होऊन २८ ऑगस्ट रोजी सकाळी ९:४७ वाजेपर्यंत राहणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 25, 2026 | 11:25 AM
Raksha Bandhan 2026 Date: चंद्रग्रहण, भद्रा अन् राहुकाळ… (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Raksha Bandhan 2026 Date: चंद्रग्रहण, भद्रा अन् राहुकाळ… (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • रक्षाबंधन २८ ऑगस्ट २०२६ रोजी साजरे होणार
  • श्रावण पौर्णिमा २७ ऑगस्ट सकाळी ९:०८ वाजता सुरू
  • पौर्णिमा २८ ऑगस्ट सकाळी ९:४७ वाजेपर्यंत राहणार
Rakhi Purnima 2026: राखी पौर्णिमा काही दिवसांवर ठेपली आहे. भावा बहीण यांच्या नात्याचा पवित्र सण म्हणून रक्षाबंधनकडे पाहिले जाते. रक्षाबंधन म्हणजे फक्त हातावर राखी बांधण्याचा दिवस नाही, तर भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम व्यक्त करण्याचा खास प्रसंग आहे. बहिण भावाला राखी बांधून त्याच्या सुख, निरोगी आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करते.

भाऊही तुझ्यावर कोणतंही संकंट आले तरी मी तुझ्या पाठीशी उभा राहिण, असे वचन आपल्या बहिणीला देतो. यंदांचं रक्षाबंधन मात्र काही कारणांमुळे खास ठरणार आहे. कारण श्रावण पौर्णिमेची तारीख, चंद्रग्रहण, भद्राकाळ आणि राहुकाळ हे सर्वत्र आल्यामुळे राखीपौर्णिमा कधी साजरी करायची असा प्रश्न येऊन उभा आहे.तर जाणून घेऊया रक्षाबंधनाची तारीख आणि शुभ वेळ काय आहे ते? Raksha Bandhan 2026 Date

श्रावण पौर्णिमा कधी आहे?

पंचांगानुसार यंदाची श्रावण पौर्णिमा २७ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजून ८ मिनिटांनी सुरू होईल ते २८ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांपर्यंत राहील. हिंदू सणांची तारीख ठरवताना उदय तिथीला महत्त्व दिलं जातं. त्यामुळे रक्षाबंधन २८ ऑगस्टला साजरं केलं जाणार आहे. २७ ऑगस्टला नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल, तर दुसऱ्या दिवशी भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा रक्षाबंधनाचा सण असेल.

रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण

यंदाच्या रक्षाबंधनाला आणखी एक विशेष योग आहे. २८ ऑगस्ट २०२६ रोजी वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण होणार असल्याचं पंचांगात सांगितलं आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी सुरू होऊन ११ वाजून २२ मिनिटांपर्यंत राहणार आहे. ग्रहण आणि राखी बांधण्याची वेळ यामुळे काहीजण संभ्रमात आहेत. त्यामुळे आपल्या भागातील पंचांग आणि स्थानिक वेळ लक्षात घेऊन धार्मिक विधी करण्याचा सल्ला दिला जातो.

भद्राकाळाचा अडथळा आहे का?

रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ असू नये, अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा मात्र भद्राकाळ २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजून ८ मिनिटांपासून ९ वाजून ३२ मिनिटांपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच २८ ऑगस्टला राखी बांधताना भद्राकाळाचा अडथळा राहणार नाही. त्यामुळे या बाबतीत भावंडांनी फारशी चिंता करण्याची गरज नाही.

राहुकाळ किती वाजता?

२८ ऑगस्ट हा शुक्रवार आहे. या दिवशी राहुकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटांपासून दुपारी १२ वाजेपर्यंत असल्याचं पंचांगानुसार नमूद करण्यात आलं आहे. धार्मिक विधी करताना अनेकजण राहुकाळ टाळण्याला प्राधान्य देतात. मात्र शहर आणि ठिकाणानुसार वेळेत थोडा फरक पडू शकतो. त्यामुळे घराजवळच्या दिनदर्शिकेतील वेळ तपासणं अधिक योग्य ठरेल.

Mangalagauri Vrat: दुसऱ्या श्रावण मंगळवारी असे करा मंगळागौरीचे व्रत, जाणून घ्या कथा

राखी बांधण्यासाठी शुभ वेळ कोणती?

पंचांगानुसार २८ ऑगस्ट रोजी राखी बांधण्यासाठी सकाळची वेळ चांगली मानली जात आहे. सकाळी ५ वाजून ५७ मिनिटांपासून ९ वाजून ४८ मिनिटांपर्यंत राखी बांधता येईल. हा कालावधी साधारण ३ तास ५१ मिनिटांचा आहे.

Garuda Purana: गरुड पुराणातील यमलोक आणि नरकाची कथा काय सांगते? जाणून घ्या या ग्रंथाचे महत्त्व

पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण यांच्या माहितीनुसार, रक्षाबंधनासाठी २८ ऑगस्टचा दिवस शुभ आहे. मात्र शुभ वेळेत स्थानानुसार काही मिनिटांचा फरक पडू शकतो. त्यामुळे आपल्या शहरातील किंवा गावातील स्थानिक पंचांगाला प्राधान्य देणं चांगलं राहील. एकंदरीत पाहता, यंदाचं रक्षाबंधन ग्रहण आणि विविध पंचांगातील वेळांमुळे चर्चेत आहे. मात्र भावंडांनी गोंधळून न जाता स्थानिक पंचांग तपासून योग्य वेळी हा सुंदर सण साजरा करावा. शेवटी राखीचा धागा किती महाग आहे यापेक्षा त्यामागची भावना आणि भाऊ-बहिणीचं नातं अधिक महत्त्वाचं आहे.

Web Title: Raksha bandhan 2026 shravan purnima bhadra and auspicious time explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 11:25 AM

Topics:  

  • Marathi News
  • Rakhi Pournima
  • Raksha Bandhan

संबंधित बातम्या

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय
1

America Breaking :ट्रम्प यांच्या जाहिरातींवर सरकारी पैसा; दोन्ही पक्षांचा विरोध होताच घेतला मोठा निर्णय

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट
2

World News : घरांच्या वाढत्या किमतीविरोधात बार्सिलोनात हजारोंचा उद्रेक; पोलिसांशी निदर्शकांची झटापट

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी
3

Pakistan Breaking :मक्का करारानंतर पाकिस्तान सौदीच्या मदतीला; हुतीविरोधात लष्करी कारवाईची तयारी

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा
4

Nagpur Crime : चार ट्रकांना एकच नंबर; कर्जाच्या जाळ्यातून वाचण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा फंडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.