Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana: आजही जिवंत आहेत श्रीरामांच्या आठवणी, वनवासातील श्रीरामांचा अद्भुत प्रवास जाणून घेऊया

रामायण आणि महाभारत हे समस्त हिंदूंसाठी पवित्र धर्मग्रंथ आहेत. काही लोक म्हणतात की या फक्त कथा आहेत आणि हे काल्पनिक कथेवर आधारित ग्रंथ आहेत. पण बहुसंख्य लोकांची ही श्रद्धास्थाने आहेत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 23, 2026 | 11:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • वनवासातील श्रीरामांचा अद्भुत प्रवास
  • आजही जिवंत आहेत श्रीरामांच्या आठवणी
  • वनवसातील कोणती स्थळ आहेत
 

काही लोक तर याचे पुरावे शोधून नास्तिकांचे मत बदलण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करतात. प्रसिद्ध इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ अनुसंधानकर्ता डॉक्टर राम अवतार यांनी रामायणावर व श्रीराम आणि सीतेच्या आयुष्यातील घटनांचा अभ्यास करून त्या निगडित २०० पेक्षा जास्त जागा शोधून काढल्या आहेत. त्यातील प्रमुख काही ठिकाणे. या पाऊलखुणा आजही श्रीरामांची साक्ष देत आहेत.

श्रीराम व सीता यांना १४ वर्षांच्या वनवासाला जावे लागले आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मण सुद्धा वनवासाला गेले हे तर सर्वांनाच माहिती आहे. या वनवासादरम्यान या तिघांनी कुठल्या ठिकाणी वास्तव्य केले हे जाणून घेऊया.

शृंगवेरपूर

श्रीरामांना जेव्हा वनवासाची आज्ञा मिळाली तेव्हा संशोधक व वाल्मिकी रामायणानुसार ते सर्वात आधी अयोध्येहून २० किमी लांब असलेल्या तमसा नदीच्या किनारी गेले. त्यानंतर त्यांनी गोमती नदी पार केली आणि प्रयागराज (अलाहाबाद ) पासून २०-२२ किमी असलेल्या शृंगवेरपूरला गेले. या ठिकाणी निषादराज गुहाचे राज्य होते. याच ठिकाणी श्रीराम गंगानदीच्या किनारी गेले आणि तेथे त्यांनी नाविकाला गंगा नदी पार करून देण्यास सांगितले.

सिंगरौर

प्रयागराजपासून उत्तर -पश्चिमेच्या दिशेने ३५-३६ किमी लांब सिंगरौर नावाचे गाव होते. कदाचित हेच गाव श्रुंगवेरपूर असू शकते. रामायणात या गावाचा उल्लेख आला आहे. हे गाव गंगानदीच्या किनाऱ्यावर वसलेले होते. महाभारतात या स्थानाचा उल्लेख “तीर्थस्थळ” या नावाने झाला आहे.

कुरई

प्रयागराज जिल्ह्यातच कुरई नावाचे गाव आहे. हे गाव गंगा नदीच्या किनारी सिंगरौर गावाच्या जवळच आहे. गंगा नदीच्या ह्या तटावर कुरई तर पलीकडच्या तटावर सिंगरौर आहे. सिंगरौर गावातून नदी पार केल्यानंतर श्रीराम. सीता व लक्ष्मण ह्याच गावात उतरले होते. या गावात एक लहानसे मंदिर आहे. असे म्हणतात की गंगा नदी पार केल्यानंतर श्रीराम, सीता व लक्ष्मण थोड्या वेळासाठी आराम करण्यास थांबले होते. त्याच ठिकाणी आज हे मंदिर बांधलेले आहे.

चित्रकूटचा घाट

कुरई गावातून पुढे श्रीराम प्रयागला म्हणजे अलाहाबादला गेले. या ठिकाणी गंगा व यमुना या दोन नद्यांचा संगम आहे. हे ठिकाण सर्व हिंदूंसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी आल्यानंतर श्रीरामांनी यमुना नदी पार केली आणि ते चित्रकुटला पोहोचले. याच ठिकाणी भरताने श्रीरामांच्या पादुका घेतल्या व राजा दशरथाच्या पश्चात त्या पादुका सिंहासनावर ठेवून श्रीरामाच्या वतीने राज्यकारभार सांभाळला.

अत्री ऋषींचा आश्रम

चित्रकूटच्या जवळच मध्यप्रदेशातील सतना या ठिकाणी अत्रि ऋषींचा आश्रम होता. अत्रि ऋषी चित्रकूटच्या तपोवनात राहत होते.
याठिकाणी श्रीरामांनी काही काळ सीता व लक्ष्मण यांनी वास्तव्य केले.

Ramayana: निस्वार्थी आणि विश्वासू मैत्रीची कहाणी, रामायणातील मैत्रीचा आदर्श जाणून घ्या

दंडकारण्य

अत्रि ऋषींच्या आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्रीरामांनी मध्यप्रदेश व छत्तीसगढ येथील घनदाट जंगलांत काही काळ आश्रय घेतला. हे वन म्हणजेच दंडकारण्य होय.
याच ठिकाणी श्रीरामांनी वनवासातील बराच काळ व्यतीत केला. १४ वर्षांपैकी १० वर्षे ते या ठिकाणी वास्तव्यास होते.

पंचवटी, नाशिक

दंडकारण्यामध्ये अनेक मुनींच्या आश्रमात वास्तव्य केल्यानंतर श्रीराम अनेक नद्या, सरोवरे, पर्वत, आणि वने पार करून नाशिकात अगस्त्य ऋषींच्या आश्रमात गेले. अगस्त्य ऋषींचा आश्रम नाशिकमधील पंचवटी येथे होता. श्रीरामांनी लक्ष्मण व सीतेसह या आश्रमात काही काळ व्यतीत केला. अगस्त्य मुनींनी श्रीरामांना त्यांच्या अग्निशाळेत तयार केलेली शस्त्रे भेट दिली. श्रीराम पंचवटीत राहिले आणि त्यांनी गोदावरीच्या तटावर स्नान आणि ध्यान केले . नाशिकमध्ये गोदावरीच्या तटावर पाच वृक्षांचे स्थान हे पंचवटी म्हणून ओळखले जाते.

Pradosh Vrat 2026: मार्च महिन्यामधील तिसरे प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

मारिच राक्षसाचा वध पंचवटीच्या जवळच मृगव्याधेश्वर येथे झाला होता. याच ठिकाणी जटायू व श्रीरामांची मैत्री देखील झाली होती. वाल्मिकी रामायणात अरण्यकांडात पंचवटीचे अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे.

सीताहरण झाले ते स्थान (सर्वतीर्थ)

नाशिकमध्ये मारीच, खर व दूषण यांच्या वधानंतर रावणाने सीतेचे हरण केले आणि रावणाला विरोध करताना जटायूचाही मृत्यू झाला.
या घटनेचे स्मारक नाशिकपासून ५६ किमी लांब असलेल्या ताकेड गावात “सर्वतीर्थ” नावाच्या ठिकाणी आहे. जटायूचा मृत्यू याच ठिकाणी झाला. हे ठिकाण इगतपुरीमध्ये आहे. या ठिकाणाला “सर्वतीर्थ” असे म्हणतात कारण याच ठिकाणी मरणासन्न अवस्थेत जटायूने सीता मातेविषयी श्रीरामांना सांगितले.

पर्णशाला, भद्राचलम

पर्णशाला हे ठिकाण आंध्रप्रदेशातील खम्माम जिल्ह्यातील भद्राचलम येथे स्थित आहे. हे ठिकाण रामालयहून १ तासाच्या अंतरावर आहे. या ठिकाणाला पनसाला किंवा पनशाला असेही म्हणतात.

याच ठिकाणी रावणाने सीतामातेला पुष्पक विमानात बसवले होते म्हणूनच ह्या ठिकाणाला सीतामातेचे हरण स्थळ मानतात. याच प्रदेशात राम सीतेचे प्राचीन देऊळ आहे

सीतेचा शोध (तुंगभद्रा व कावेरी नदीचे क्षेत्र)

सीतेच्या शोधाचे प्रथम स्थान म्हणजे जेथे जटायूचा मृत्यू झाला (सर्वतीर्थ) ते होय. त्यानंतर श्रीराम व लक्ष्मणाने तुंगभद्रा व कावेरी नदीच्या क्षेत्रात अनेक ठिकाणी सीतेचा शोध घेतला.

शबरीचा आश्रम (पम्पा सरोवर)

तुंगभद्रा व कावेरी नदी पार केल्यानंतर श्रीराम व लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ विविध ठिकाणी गेले. जटायू व कबंधची भेट झाल्यानंतर ते दोघे ऋष्यमूक पर्वतावर गेले. त्या ठिकाणी जाताना ते पम्पा नदीच्याजवळ असलेल्या शबरी या रामभक्त स्त्रीच्या आश्रमात गेले.

भगवान श्रीराम वनवासात जाताना व पुढे सीतामाईचा शोध घेताना अनेक भागात गेले. आज हे स्थान श्रीरामाच्या पदस्पर्शाने पुनित झालेले आहेत. श्रीराम यावेळी सर्वचस्थरातील लोकांना भेटले. आजही या पाऊलखुणा अस्तित्वात आहेत. त्यामुळे जनमानसात आजही असलेले श्रीरामाचे स्थान देव म्हणून तर आहेच. माझ्या पूर्वजांना राम भेटला. माझ्या भागात राम येऊन गेले. याचाही अवर्णनीय आनंद असतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: रामायणात श्रीराम यांना वनवास का मिळाला?

    Ans: राजा दशरथांनी कैकयीला दिलेल्या वचनामुळे श्रीराम यांना १४ वर्षांचा वनवास स्वीकारावा लागला.

  • Que: श्रीरामांनी वनवासात कोणकोणत्या ठिकाणी वास्तव्य केले?

    Ans: वनवासात श्रीराम यांनी शृंगवेरपूर, चित्रकूट, दंडकारण्य, पंचवटी (नाशिक), पर्णशाला (भद्राचलम) अशा अनेक ठिकाणी वास्तव्य केले.

  • Que: श्रीरामांच्या वनवासातील प्रवासाचे महत्त्व काय आहे?

    Ans: हा प्रवास त्याग, धर्मपालन, कर्तव्य आणि आदर्श जीवनाचे प्रतीक मानला जातो.

Web Title: Ramayana memories of shree ram the amazing journey of shree ram in exile

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • dharm
  • Ramayana
  • Religion

संबंधित बातम्या

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश
1

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy:  अनंत चतुर्दशीच्या दिवशी या मुलांकांच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम
3

Pitru Paksha: पितरांचे श्राद्ध ‘या’ तिथी वेळी करू नये, अकाली मृत्यूपासून पहिल्या वर्षापर्यंत जाणून घ्या नियम

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध
4

Bhadrapad Purnima 2026: भाद्रपद पौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि पितृपक्षाशी संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.