फोटो सौजन्य- pinterest
शिर्डीचे साईबाबा यांचे जीवन अनेक अद्भुत घटनांनी भरलेले आहे. त्यांच्या भक्तांमध्ये आजही श्रद्धेने सांगितली जाणारी एक घटना म्हणजे साईबाबांनी तीन दिवसांसाठी देहत्याग केल्याची. ही घटना केवळ चमत्कार म्हणून नव्हे, तर त्यांच्या उच्च आध्यात्मिक सामर्थ्याचे प्रतीक मानली जाते.
शिर्डीच्या साईंबाबाचे महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात भक्त आहेत. सबका मालिक एक ही साईंची शिकवण ही सर्वांना माहिती आहे. साईंनी जात, धर्म, पंत आणि गरिबी असा कोणताही भेदभाव न करता गरजूंना नेहमीच मदत केली. अनेकांना संकटांतून आणि अंधकारातून प्रकाशाची वाट दाखवली. अनेकांना आपल्या शिकवणीनेे आणि ज्ञानप्रबोधनाने मार्ग दाखवणाऱ्या साईंबाबाचे अनेक चमत्काराच्या कथा प्रचलित आहे. यातीलच साईंबाबाच्या काही कथा ऐकून तुम्ही हैराण व्हाल. यापैकी सलग तीन दिवस साईंनी आपल्या शरीराचाही त्याग केला याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? साईंनी 3 दिवस त्यागले होते शरीर काय आहे कथा जाणून घेऊया
साईबाबांनी तीन दिवसांसाठी शरीर सोडलं होतं. साईबाबांनी त्यांचे भक्त असलेल्या महाळसापती बोलवून घेतलं, जर मी तीन दिवसांत परत आलो नाही तर माझं शरीर अमुक ठिकाणी दफण कर असं त्यांनी महाळसापतींना सांगून ठेवलं. तीन दिवस तुला माझ्या शरीराचं रक्षण करायचं आहे, असं त्यांनी महाळसापतींना सांगितलं आणि त्यांनी डोळे मिटले. हळूहळू त्यांची श्वसनक्रिया बंद झाली, शरीराची हालचाल ही थांबली. साईंच निधन झालं असं अनेकांना वाटलं. वैद्य आणि डॉक्टरांनी देखील त्यांना तपासलं. मात्र साईंनी दिलेल्या आदेशानुसार महाळसापतीनी सर्वांना साईंबाबापासून दूर राहण्यास सांगितलं.
साईंच्या शरीराचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याचं त्यांनी सांगितलं. यावर गावकरी महाळसापतींवर नाराजही झाले. तीन दिवस महाळसापतींनी साईबाबाचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन जागरण केलं. तीन दिवस शरीराचा त्याग करून झाल्यावर साईंबाबांनी पुन्हा शरीर धारण केलं आणि सगळे गावकरी थक्क झाले आणि भक्तांमध्ये पुन्हा एकदा आनंद संचारला.
या घटनेकडे केवळ चमत्कार म्हणून पाहिले जात नाही. योगशास्त्रानुसार उच्च कोटीचे योगी आपल्या प्राणशक्तीवर नियंत्रण ठेवू शकतात, असे मानले जाते. साईबाबांच्या या कृतीतून शरीर आणि आत्मा वेगळे असल्याचा आध्यात्मिक संदेश दिला जातो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: भक्तांच्या श्रद्धेनुसार साईबाबांनी आपल्या योगसामर्थ्याची प्रचीती देण्यासाठी आणि आत्म्याचे स्वरूप समजावून सांगण्यासाठी तीन दिवस देहत्याग केला होता.
Ans: साईबाबांनी आपल्या निकटवर्तीय भक्त महालसापती यांना तीन दिवस शरीराची काळजी घेण्यास सांगितले होते.
Ans: गुरूवरील श्रद्धा, संयम आणि विश्वास यांचे महत्त्व या कथेतून अधोरेखित होते.






