Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sai Baba Story: साईबाबा भक्तांना कधीच विसरत नाहीत, काय आहे व्यापाऱ्याची कथा जाणून घ्या

साईबाबांच्या जीवनातील अनेक कथा आजही भक्तांमध्ये श्रद्धेने सांगितल्या जातात. साईबाबांच आपल्या भक्तांवर विशेष प्रेम होतं आणि ते कधीही आपल्या भक्तांना विसरत नसतं, अशीच एक व्यापाऱ्याची कथा आपण जाणून घेणार आहोत.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 13, 2026 | 08:45 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • काय आहे मुंबईतील व्यापाऱ्याची कथा
  • व्यापारी आणि त्याचा मुलगा काही दिवस शिर्डीत मुक्कामाला राहिले.
  • भक्त देवाला विसरला तरी देव भक्ताला विसरत नाही, अशी श्रद्धा या कथेत व्यक्त होते
 

शिर्डीचे साईबाबा हे श्रद्धा, सबुरी आणि मानवतेचा संदेश देणारे संत म्हणून भक्तांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. त्यांच्या जीवनातील अनेक कथा आजही भक्तांमध्ये सांगितल्या जातात. अशीच एक कथा मुंबईतील एका व्यापाऱ्याशी संबंधित आहे. या कथेत साईबाबांनी दिलेल्या तीन रुपयांमागील आध्यात्मिक संदेश विशेष महत्त्वाचा मानला जातो.

व्यापाऱ्याचा मुलगा गंभीर आजारी पडला होता

बाबांच्या भक्त समुदायामध्ये सर्व धर्माचे भक्त होते. बाबांचे अनेक चमत्कार सांगितले जातात, असाच प्रत्यय मुंबईतील एका व्यापाऱ्याला आला. मुंबईतील एका व्यापाऱ्यांचा मुलगा खूप आजारी होता त्याला नेमका कोणता आजार झाला आहे हेच कळतं नव्हतं. अखेर त्या मुलाला व्यापाऱ्याने साईबाबांच्या चरणी शिर्डीला आणलं आणि त्याच्या आजारांविषयी माहिती दिली. साईबाबांनी गोड हसून त्या मुलाला आशीर्वाद दिला आणि संध्याकाळनंतर त्या मुलाला बरं वाटू लागलं. बाबांनीच मुलाला बरं केलं आणि चमत्कार झाला असे तो व्यापारी बोलू लागला.

Sai Baba Story: दातोबांच्या दुःखामागील कारण काय होते? जाणून घ्या साईबाबांची प्रेरणादायी कथा

जीवनदान देणारा परमेश्वरच आहे असा संदेश दिला

त्यावर साईबाबांनी त्याला सांगितलं तो केवळ परमेश्वरच एखाद्याला जीवनदान देत असतो यामध्ये माझं कोणतंही सामर्थ्य नाही. यानंतर व्यापारी आणि त्याचा मुलगा काही दिवस शिर्डीतच मुक्कामाला राहिले आणि मुलाच्या आरोग्यात खूप फरकही पडला.

मुंबईला परतताना साईबाबांनी व्यापाऱ्याला तीन रुपये देऊन ते पूजेच्या ठिकाणी ठेवण्यास सांगितले

जेव्हा व्यापारी मुंबईला जायला निघाला तेव्हा साईबाबांनी त्याला तीन रुपये दिले आणि म्हणाले दोन रुपये मी आधीच तुला दिले आहेत आणि आता हे तीन रुपये घे आणि पुजेच्या स्थानावर ठेवं. देवाचं नामस्मरण कर आणि चांगलं कर्म करत जा. तुझ भलंच होईल.

दोन रुपये आशीर्वाद म्हणून दिले होते

साईबाबांनी आपल्याला दोन रुपये कधी दिले असाच विचार करत व्यापारी मुंबईत आला आणि त्याने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. तेव्हा आईने सांगितलं जेव्हा लहानपणी व्यापारी आजारी पडला होता तेव्हा त्याचे बाबा त्याला साईबाबांकडे घेऊन गेले आणि त्यावेळी साईबाबांनी त्याला दोन रुपये आशीर्वाद म्हणून दिले होते. यावरूनच देवाचं आणि भक्तांच नातं खूप मजबूत आहे हे सिद्ध झालं. भक्त जरी देवाला विसरला असला तरी देव त्याचं नेहमीच रक्षण करतो.

Sai Baba Story: साईंचा शिर्डीतील पहिला प्रवेश आणि कोणी ठेवले साई नाव

भक्ती आणि श्रद्धेचा संदेश

या कथेतून साईभक्तीतील श्रद्धा, ईश्वरावरील विश्वास आणि चांगले कर्म यांचा संदेश दिला जातो. भक्त आपल्या आयुष्यात देवाला विसरला तरी ईश्वर भक्ताला विसरत नाही, अशी श्रद्धा या कथेतून व्यक्त होते.

साईबाबांच्या शिकवणीत केवळ चमत्कारांपेक्षा श्रद्धा, सबुरी, नामस्मरण आणि सत्कर्म यांना अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे ही कथा भक्तांसाठी श्रद्धा आणि ईश्वराशी असलेल्या नात्याची आठवण करून देणारी मानली जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: साईबाबांनी व्यापाऱ्याला तीन रुपये का दिले?

    Ans: कथेनुसार, साईबाबांनी व्यापाऱ्याला तीन रुपये देऊन ते पूजेच्या ठिकाणी ठेवण्यास आणि देवाचे नामस्मरण करण्यास सांगितले.

  • Que: साईबाबांनी व्यापाऱ्याला कोणता संदेश दिला?

    Ans: देवाचे नामस्मरण करावे, चांगले कर्म करावे आणि श्रद्धा कायम ठेवावी, असा संदेश या कथेतून दिला जातो.

  • Que: साईबाबांच्या शिकवणीत श्रद्धेला काय महत्त्व आहे?

    Ans: साईबाबांच्या भक्तीपरंपरेत ‘श्रद्धा आणि सबुरी’ या दोन गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते.

Web Title: Sai baba story sai baba never forgets his devotees the story of a merchant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • shirdi

संबंधित बातम्या

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
1

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
2

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
3

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश
4

Surya Nakshatra Parivartan: सूर्याच्या नक्षत्र संक्रमणामुळे पुढील १४ दिवस या राशींची चांदी! नोकरी-व्यवसायात मिळणार यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.