Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sant Janabai: जात्यावरच्या ओव्यातून उमटलेली भक्ती, जाणून घ्या जनाबाईंचे अद्वितीय जीवन

संत जनाबाई या वारकरी संप्रदायातील एक थोर संत-कवयित्री होत्या, ज्यांच्या अभंगांमध्ये विठ्ठलभक्ती, समर्पण आणि साधेपणाची गोड अनुभूती मिळते. संत जनाबाईंच्या जीवनातील काय आहे प्रेरणादायी कथा, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 06, 2026 | 11:30 AM
फोटो सौजन्य- chatgpt

फोटो सौजन्य- chatgpt

Follow Us
Follow Us:
  • संत जनाबाईंचे कसे होते अद्वितीय जीवन
  • जात्यावरच्या ओव्यातून उमटलेली भक्ती
  • संत साहित्यामधील जनाबाईंचे योगदान
 

 

संत जनाबाईंचे अभंग विठ्ठल भक्ती, समर्पण आणि घरगुती कामांमधील देवाचा शोध या भावनेने ओतप्रोत भरलेले आहेत. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’, ‘विठू माझा लेकुरवाळा’ आणि ‘झाडलोट करी जनी’ हे त्यांचे अत्यंत लोकप्रिय अभंग आहेत. त्यांनी सुमारे ३५० हून अधिक अभंग रचले आहेत, ज्यातून त्यांचा विठ्ठलाशी असलेला दासीभाव व्यक्त होतो.

संत नामदेव यांच्या घरी राहून विठ्ठलभक्ती

संत जनाबाई जन्म गंगाखेड, १२५८ मध्ये झाल्याचे काही समकालीन पुराव्यानिशी दिसून येते. त्या वारकरी संप्रदायातील थोर संत-कवयित्री होत्या, ज्यांनी नामदेवांच्या घरी राहून विठ्ठलभक्ती केली. त्यांचे अभंग, ओव्या आणि ‘थालीपाक’ सारख्या रचनांमधून प्रेम, आर्तता आणि भक्तीचा सुगंध दरवळतो. दासी म्हणून जगतानाही त्यांनी काव्याच्या माध्यमातून परमेश्वराशी संवाद साधला.‌ त्यांचे विठ्ठलप्रती असलेले प्रेम आणि निस्सीम भक्ती यामुळेच त्या संत झाल्या.

Apara Ekadashi 2026: अपरा एकादशीला राशींनुसार करा या वस्तूंचे दान, तुम्हाला अनेक पटींनी मिळेल पुण्य

संत जनाबाई यांचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे दमा आणि करुंड या विठ्ठलभक्त जोडप्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. वडील दमा यांनी जनाबाईला पंढरपुरातील संत नामदेवांचे वडील दामाशेट शिंपी यांच्याकडे नोकरीसाठी पाठवले. तेव्हापासून त्या नामदेव कुटुंबाचा एक भाग बनल्या आणि त्यांना ‘नामयाची दासी जनी’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

संत साहित्यिक म्हणून योगदान

संत साहित्यिक म्हणून योगदान जनाबाईंनी सुमारे ३००-३५० हून अधिक अभंग रचले आहेत. त्यांच्या काव्यात कृष्णजन्म, बाललीला, गोपाळकाला आणि भक्तीचे सोपे मार्ग वर्णन केले आहेत. विठ्ठल समर्पित भक्ती केली. त्यांच्या अभंगात विठ्ठलाविषयी लडिवाळपणा आहे. ‘जात्यावरच्या ओव्या’ किंवा ‘दळण-कांडण’ करताना त्या अभंग गात, ज्यामुळे त्यांच्या जीवनात भक्ती आणि कर्म यांचा सुंदर संगम दिसून येतो यातील प्रमुख रचना या हरिश्चंद्राख्यान, थालीपाक, कृष्णजन्म, द्रौपदीवस्त्रहरण यांसारख्या आख्यान काव्यांमुळे त्यांचे साहित्य समृद्ध आहे.

Visfotak Yoga: मंगळ आणि शनिच्या युतीने तयार होणार स्फोटक योग, या राशींच्या लोकांना सामोरे जावे आव्हानांना

प्रसिद्ध ओव्या

संत जनाबाईंनी जात्यावर दळण दळताना विठ्ठलाच्या भेटीची ओढ आणि भक्ती व्यक्त करणाऱ्या अनेक ओव्या रचल्या आहेत. त्यांची “सुंदर माझे जाते गं” ही ओवी अत्यंत प्रसिद्ध आहे.

“सुंदर माझे जाते गं फिरते बहु मोला ।
दळण दळिते जनी, शेजारी उभा विठ्ठला ॥”

“पहिली ओवी गौराबाईला, दुसरी ओवी विठ्ठला ।
तिसरी ओवी माझ्या नामदेवाला, चौथी ओवी पंढरीला ॥”
कष्टाचे काम करताना त्या देव आणि आपल्या गुरूंच्या स्मरणाने सुरुवात करतात.

पुण्यदिवस

इ.स. १३५० मध्ये नामदेवांसोबतच त्यांनी पंढरपुरात समाधी घेतली. तेव्हाच संत जनाबाईंनी आपल्या साध्या आणि सरळ भाषेतील अभंगातून स्त्रीभक्तीची एक वेगळी उंची गाठली आहे, त्यामुळे आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या ओव्या गायल्या जातात.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: संत जनाबाई कोण होत्या?

    Ans: संत जनाबाई या वारकरी संप्रदायातील थोर संत-कवयित्री होत्या. त्यांनी साध्या जीवनातून विठ्ठलभक्तीचा अनोखा संदेश दिला.

  • Que: जनाबाईंच्या अभंगांचे वैशिष्ट्य काय आहे?

    Ans: साधी आणि सरळ भाषा, दैनंदिन जीवनातील उदाहरणे, विठ्ठलप्रती प्रेम आणि समर्पण, त्यांच्या अभंगांमध्ये भक्ती आणि जीवनाचा सुंदर संगम दिसतो.

  • Que: जात्यावरच्या ओव्या” म्हणजे काय?

    Ans: जनाबाई दळण-कांडण करताना विठ्ठलाचे स्मरण करत ओव्या गात असत. या ओव्यांमधून त्यांची भक्ती आणि देवाशी असलेले नाते स्पष्ट होते.

Web Title: Sant janabai devotion through grinding songs know the unique life of sant janabai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे राहूच्या राशीत आगमन; तूळ-कुंभसह ‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा
2

Chanakya Niti: मुलांना मेहनती आणि जबाबदार बनवायचंय? चाणक्यांचे पैशांबाबतचे ‘हे’ ५ धडे शिकवा

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ
3

Navpancham Yog: पौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांच्यात जुळून येणार नवपंचम योग, या राशींच्य लोकांना होणार आर्थिक लाभ

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम
4

Pitru Paksha 2026: पितृपक्षामध्ये श्राद्धाचे जेवण देताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.