सौजन्य - नवराष्ट्र टीम
आळंदी येथील समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळेत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोर ही बैठक पार पडली. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सातारा, सांगली, चंद्रपूर यांसह राज्यातील विविध भागांतील संघटनांचे पदाधिकारी, कायदेशीर सल्लागार आणि हजारो चालक-मालक उपस्थित होते. कर्नाटकातील प्रतिनिधींनीही सहभाग घेतला.
या बैठकीत महाराष्ट्रात सुरू असलेल्या विनापरवाना बाईक टॅक्सी सेवांवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑनलाइन ॲप कंपन्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भूमिका मांडण्यात आली. तसेच शासनाने घोषित केलेल्या ऑटोरिक्षा-टॅक्सी-कॅब चालक-मालक कल्याणकारी महामंडळाची तातडीने स्थापना करून आवश्यक आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली.
परवाना नूतनीकरण, फिटनेस तपासणीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी आणि चालकांसाठी सुरक्षित पार्किंग स्टँड उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. ऑनलाइन कंपन्यांची मनमानी आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे चालक-मालक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या हक्कांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरला तीव्र आंदोलन करण्यात येणार असून, सर्व चालक-मालकांनी संपात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. कांबळे यांनी केले.
Ans: महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण राज्यात एक दिवसीय संप पुकारला आहे.
Ans: ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी संपाची अधिकृत घोषणा केली आहे.
Ans: विनापरवाना बाईक टॅक्सी सेवांवर बंदी, नियम मोडणाऱ्या ऑनलाइन ॲप कंपन्यांवर कारवाई, चालक-मालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना, परवाना नूतनीकरणातील अडचणी दूर करणे आणि सुरक्षित पार्किंग स्टँड उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्या आहेत.






