Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“देवा तुझा मी सोनार” अभंग रचणारे संत नरहरी सोनार; शिवभक्तीपासून विठ्ठलभक्तीपर्यंतचा प्रवास जाणून घ्या

देवा तुझा मी सोनार असे अभंग रचना करणारे  संत नरहरी सोनार हे पंढरपूरात असूनही पांडुरंगाचे दर्शन घेत नव्हते. ते शिवभक्त होते. पण एक देवाचा चमत्कार झाला.‌ आणि नरहरी सोनार पांडुरंगाचे परम भक्त झाले. जाणून घेऊया त्यांचे जीवनचरित्र

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 27, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • देवा तुझा मी सोनार अभंग रचणारे संत नरहरी सोनार
  • शिवभक्तीपासून विठ्ठलभक्तीपर्यंतचा प्रवास
  • शिव आणि विठ्ठल एकच असल्याचा साक्षात्कार
 

संत नरहरी सोनार हे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील महान संत आणि परम शिवभक्त होते. त्यांचा जन्म पंढरपूर येथे शके १११५ मध्ये श्रावण शुक्ल त्रयोदशीला झाला, असे मानले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव अच्युतबाबा तर आईचे नाव सावित्रीबाई होते. पत्नीचे नाव गंगाबाई असून नारायण आणि मालू अशी मुलांची नावे होती. त्यांचा व्यवसाय सोनारकामाचा होता. दागिने बनविण्याच्या कलेत ते अत्यंत निपुण होते.

लहानपणापासूनच त्यांच्यावर शिवभक्तीचे संस्कार झाले होते. ते कट्टर शैवपंथी होते. रोज पहाटे उठून भगवान शंकराची पूजा, जप आणि बेलपत्र अर्पण करणे हा त्यांचा नित्यक्रम होता. ते इतके एकनिष्ठ शिवभक्त होते की पंढरपुरात राहूनही विठ्ठल मंदिराकडे पाहत नसत.

शिव आणि विठ्ठल एकच असल्याचा साक्षात्कार

एकदा एका सावकाराने नवस फेडण्यासाठी विठ्ठलाला सोन्याची साखळी अर्पण करण्याचे ठरविले. पंढरपुरातील प्रसिद्ध कारागीर म्हणून त्याने संत नरहरींना साखळी तयार करण्यास सांगितले. परंतु इतर देवतेचे दर्शन घेणार नाही, या निश्चयामुळे त्यांनी सुरुवातीला नकार दिला. नंतर सावकाराने विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिल्यावर त्यांनी सुंदर सोनसाखळी तयार केली. मात्र मंदिरात साखळी घातल्यावर ती मोठी ठरली. पुन्हा माप घेऊन दुरुस्ती केली तरी ती योग्य बसत नव्हती.

शेवटी संत नरहरी स्वतः मंदिरात गेले. त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून विठ्ठलाच्या मूर्तीला साखळी घालण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांच्या हाताला व्याघ्रचर्म, गळ्यातील नाग आणि शिवस्वरूप जाणवले. पट्टी काढल्यावर समोर विठ्ठलाची मूर्ती होती. पुन्हा पट्टी बांधली तरी त्यांना भगवान शंकरच जाणवले. त्या क्षणी त्यांना “शिव आणि विठ्ठल एकच आहेत” असा साक्षात्कार झाला. त्यानंतर ते विठ्ठलभक्तीत पूर्णपणे रंगून गेले.

Vastu Tips : घरात नकारात्मक शक्ती आहे हे कसं ओळखावं ? काय करावे वास्तुमध्ये बदल ?

संत नरहरी सोनाराचे अभंग

संत नरहरी सोनार यांच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत; परंतु “देवा तुझा मी सोनार”, “शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा”, “माझे प्रेम तुझे पायी” हे अभंग अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अभंगांतून अद्वैत, भक्ती आणि समतेचा संदेश मिळतो.

पुण्यतिथी

परळी वैजनाथ येथे आणि अन्य ठिकाणी माघ कृष्ण तृतीयेला श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी महोत्सव होतो. संत जीवन संत नरहरी सोनार यांनी समाधी घेतल. वंशपरंपरेनुसार नरहरी महाराजांचा समाधी शके पार्थिव नाम संवस्तर शके १२३५ माघ वद त्रुतिया सोमवार इसवी सन १२८५ पुण्यतिथी असते.

Numberlogy: पद्मिनी एकादशीच्या दिवशी या मुलांकाच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

असे मानले जाते की, वारकरी संप्रदायात त्यांचे स्थान अत्यंत मानाचे असून त्यांनी “हरि आणि हर एकच” हा संदेश समाजाला दिला. त्यांच्या जीवनातून भक्ती, समर्पण आणि अद्वैत तत्त्वज्ञानाची महान शिकवण मिळते.

महाराजांच्या शिव-भक्ती विषयी थोडक्यात

विविध अठरापगड जाती जमातीच्या संतांनी एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंढरपूरमधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. संत नरहरी सोनार यांचा व्यवसाय दागिने बनवण्याचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्ध होती. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर पंढरपुरात व्यवसायाचा चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिवभक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव-आराधना करीत असे. रोज पहाटे जोतिर्लिंगावर ते बेलपत्र वाहत असतं..

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: “देवा तुझा मी सोनार” हा अभंग का प्रसिद्ध आहे?

    Ans: या अभंगातून संत नरहरी सोनार यांनी भक्ती, समर्पण आणि ईश्वराशी असलेले नाते अत्यंत सुंदर शब्दांत व्यक्त केले आहे.

  • Que: संत नरहरी सोनारांना विठ्ठलभक्तीचा साक्षात्कार कसा झाला?

    Ans: विठ्ठलासाठी बनवलेल्या सोनसाखळीच्या प्रसंगात त्यांना शिव आणि विठ्ठल एकच असल्याचा अनुभव आला, असे सांगितले जाते.

  • Que: “हरि आणि हर एकच” या संदेशाचा अर्थ काय?

    Ans: भगवान शिव आणि भगवान विष्णू हे एकाच परम तत्वाचे रूप आहेत, असा अद्वैताचा संदेश यातून दिला जातो.

Web Title: The amazing journey of saint narahari sonar from shiva devotion to vitthal devotion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Padmini Ekadashi 2026: पद्मिनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब
1

Padmini Ekadashi 2026: पद्मिनी एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, या राशींच्या लोकांचे चमकणार नशीब

Numberlogy: पद्मिनी एकादशीच्या दिवशी या मुलांकाच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
2

Numberlogy: पद्मिनी एकादशीच्या दिवशी या मुलांकाच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Vastu Tips : घरात नकारात्मक शक्ती आहे हे कसं ओळखावं ? काय करावे वास्तुमध्ये बदल ?
3

Vastu Tips : घरात नकारात्मक शक्ती आहे हे कसं ओळखावं ? काय करावे वास्तुमध्ये बदल ?

Jupitor Transit 2026 : गुरु बदलाचा सकारात्मक परिणाम; 2 जून नंतर 12 राशींवर काय होणार परिणाम ?
4

Jupitor Transit 2026 : गुरु बदलाचा सकारात्मक परिणाम; 2 जून नंतर 12 राशींवर काय होणार परिणाम ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.