Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shukra Gochar 2026: 29 जुलैनंतर शुक्राची चाल बदलणार! ‘या’ 4 राशींनी पैशांच्या बाबतीत घाई करू नका

Shukra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार 29 जुलै 2026 रोजी शुक्र ग्रह उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शुक्र हा सुख, वैभव, प्रेम आणि आर्थिक समृद्धीचा कारक मानला जातो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 28, 2026 | 01:15 PM
Shukra Gochar 2026: 29 जुलैनंतर शुक्राची चाल बदलणार! ( Photo सौजन्य- सोशलमीडिया)

Shukra Gochar 2026: 29 जुलैनंतर शुक्राची चाल बदलणार! ( Photo सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

Religion News: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे वेगळे महत्त्व सांगितले जाते. त्यापैंकी शुक्र हा ऐश्वर्य, सुख, प्रेम, वैभव आणि आर्थिक स्थितीशी जोडला गेलेला ग्रह मानला जातो. ग्रह जेव्हा आपली स्थिती किंवा नक्षत्र बदलतो, तेव्हा त्याचा काही ना काही परिणाम सर्व राशींवर होत असल्याचे मानले जाते.

यंदा 29 जुलै 2026 रोजी शुक्र उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हे नक्षत्र सूर्याच्या प्रभावाखाली असल्याने काही राशींसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. विशेषतः खर्च, नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक वातावरणात काही बदल जाणवू शकतात. त्यामुळे पुढील काही दिवस शांतपणे निर्णय घेणे अधिक फायदेशीर ठरेल.(Shukra Gochar 2026: )

मेष

मेष राशीच्या लोकांनी या काळात पैशांचा वापर जपून करणे गरजेचे आहे. अचानक काही खर्च समोर येऊ शकतात. हौसमौज किंवा गरज नसलेल्या वस्तूंवर पैसे खर्च करण्यापेक्षा बचतीवर भर द्या. कार्यालयात कोणाशीही वाद घालण्याचे टाळा. कोणालाही पैसे उधार देताना किंवा आर्थिक व्यवहार करताना पूर्ण विचार करूनच निर्णय घ्या.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींना घरातील वातावरणात थोडा तणाव जाणवू शकतो. छोट्या कारणांवरून गैरसमज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. आरोग्याचीही उपेक्षा करू नका. मोठी गुंतवणूक किंवा नवीन आर्थिक योजना सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेतल्यास भविष्यातील अडचणी टाळता येऊ शकतात.

सिंह

सिंह राशीसाठी हा काळ संयमाची परीक्षा घेणारा ठरू शकतो. स्वतःच्या मतावर ठाम राहणे चांगले असले तरी हट्टीपणा नुकसानकारक ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी किंवा सहकाऱ्यांसोबत चांगला संवाद ठेवा. प्रेमसंबंधांमध्येही छोट्या गोष्टींवरून दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मनात काही असेल तर ते स्पष्टपणे बोलून घ्या.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरी किंवा व्यवसायात काही अनपेक्षित बदलांचा सामना करावा लागू शकतो. भागीदारीत काम करणाऱ्यांनी प्रत्येक कागदपत्र नीट तपासूनच पुढे जावे. आर्थिक व्यवहारात निष्काळजीपणा टाळा. कामानिमित्त अचानक प्रवास होण्याची शक्यता असून त्यामुळे वेळ आणि पैशांचा अतिरिक्त खर्च होऊ शकतो.

Sawan 2026 Vastu Tips: श्रावण महिन्यात लावा ‘ही’ ५ चमत्कारी झाडे; वास्तूनुसार वाढेल पैशांचा ओघ

‘या’ काळात काय करावे?

ग्रहस्थिती प्रत्येकासाठी सारखी नसते. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी घाबरण्याऐवजी संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. खर्चाचे नियोजन करा, अनावश्यक खरेदी टाळा आणि मोठे निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. कुटुंबातील सदस्यांशी संवाद कायम ठेवा. अनेक वेळा शांतपणे घेतलेला निर्णय मोठे नुकसान टाळू शकतो.

श्रद्धेनुसार करता येतील काही सोपे उपाय

शुक्रवारी देवी लक्ष्मीची मनापासून पूजा करणे शुभ मानले जाते. शक्य असल्यास खीर किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करा. “ॐ शुं शुक्राय नमः” या मंत्राचा नियमित जप केल्याने मन शांत राहते, अशी श्रद्धा आहे. तसेच शुक्रवारी गरजू व्यक्तींना दूध, तांदूळ, साखर किंवा इतर पांढऱ्या वस्तूंचे दान केल्यास शुभ फळ मिळते, असे मानले जाते.

Chandra Gochar 2026: चंद्र शनीच्या राशीत करणार प्रवेश, या राशींच्या लोकांना मिळणार दिलासा

ग्रहांचे गोचर हे ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाचा भाग असला तरी प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य तिच्या कृती, मेहनत आणि योग्य निर्णयांवरही अवलंबून असते. त्यामुळे या काळात सावध राहा, आर्थिक नियोजन मजबूत ठेवा आणि कोणताही निर्णय घाईत घेणे टाळा. योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अनेक अडचणी सहज पार करता येऊ शकतात.

Web Title: Venus enters uttara phalguni nakshatra on july 29

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • daily vastu tips
  • Marathi News
  • vastu news

संबंधित बातम्या

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
1

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा
2

Russia Election Cyber Attack : रशियाच्या निवडणूक यंत्रणेवर सायबर हल्ल्यांचा मारा! AI वापरणाऱ्या गटांचा हात असल्याचा दावा

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय
4

Global Economy : अमेरिकेने वाढवले व्याजदर! महागाईला लगाम घालण्यासाठी फेडचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.