स्वयंपाक घरात असलेला आणि आयुर्वेदात देखील ज्याला महत्व जास्त आहे आहे असा मसाल्यातील पदार्थांपैकी एक म्हणजे लवंग. आयुर्वेदात लवंगाला जितकं महत्व आहे तेवढंच महत्व ज्योतिषशास्त्रात देखील आहे. लवंगाचा उपयोग फक्त मसाल्यांमध्येच नव्हे, तर धार्मिक विधींमध्ये, आरतीमध्ये, पूजेमध्ये देखील केला जातो. लवंगाचं धार्मिक महत्त्व केवळ परंपरेपुरतं मर्यादित नाही, तर त्यामागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणं देखील आहेत. प्राचीन ऋषी-मुनींनी निसर्गातील अनेक घटकांचं सूक्ष्म निरीक्षण करून त्यांचा उपयोग धर्मशास्त्रात आणि आयुर्वेदात केला आहे. त्यापैकीच एक घटक म्हणजे लवंग.
लवंगामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे तिचा वापर पूजेमध्ये केल्यास वातावरणात सात्विकता वाढते, असं मानलं जातं. त्यामुळेच अनेक पूजांमध्ये आणि विशेषतः हवन, देवतांची पूजा, किंवा नजर दोष निवारण विधी यामध्ये लवंगाचा वापर केला जातो. घराच्या दरवाज्याजवळ लवंग जाळल्यास नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत, अशी देखील मान्यता आहे.लवंगाचा सुवास मनःशांती निर्माण करतो, आणि ध्यानधारणेसाठी आवश्यक वातावरण बनवतो. त्यामुळे तुम्ही जर मेडीटेशन करत असाल तर लवंग आणि धूप जाळा. यामुळे मन एकाग्र होण्यास मदत मिळते.
काही ठिकाणी, लवंग आणि विड्याचं पान एकत्र देवाला अर्पण केलं जातंय देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी तसंच मांगल्याचं प्रतीक देखील लवंगाला मानलं जातं. विशेषतः नवग्रह शांती, किंवा संतोषी माता व्रत यासारख्या धार्मिक विधींमध्ये लवंग अत्यंत पूज्य मानली जाते. थोडक्यात, लवंग हे केवळ मसाल्याचं घटक नसून, ते एक धार्मिक, अध्यात्मिक आणि आरोग्यवर्धक द्रव्य आहे. त्याचा योग्य प्रकारे आणि श्रद्धेने उपयोग केल्यास अनेक पातळ्यांवर लाभ मिळतो.
असं म्हणतात की, काळभैरव, दुर्गा, शिव यांसारख्या उग्र देवतांच्या पूजेत लवंग वापरली जाते.या देवतांना लवंग अर्पण केल्याने भक्ताला संरक्षण व नकारात्मकतेपासून मुक्ती मिळते, असं मानलं जातं.लवंग हे सात्विक घटक आहे आणि त्यामुळे ते पूजेमध्ये योग्य असतं.लवंग फक्त एक मसाला नसून, त्याला धार्मिक, आध्यात्मिक आणि औषधी दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्व आहे. आरतीत लावलेली लवंग आपलं मन, शरीर आणि घर यांना शुद्ध करत असल्याचं मानलं जातं.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)