Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rama Raksha Stotra: चैत्र नवरात्रीत रामरक्षा स्तोत्र पठण केल्याने मिळते मानसिक शांतता आणि संकटांपासून संरक्षण

चैत्र नवरात्री हा भक्ती, साधना आणि आध्यात्मिक उर्जेचा पवित्र काळ मानला जातो. या काळात रामरक्षा स्तोत्र पठणाला विशेष महत्त्व आहे, कारण हे स्तोत्र भगवान श्रीराम यांचे दिव्य संरक्षण कवच मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 21, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • चैत्र नवरात्रीत रामरक्षा स्तोत्र पठण का करावे
  • रामरक्षा स्तोत्र पठण करण्याचे महत्त्व
  • रामरक्षा स्तोत्र कधी आणि कसे पठण करावे
 

रामरक्षास्तोत्र हे भगवान श्रीरामाचे संरक्षण कवच मानले जाते, जे मानसिक शांतता, भीतीपासून मुक्ती, संकट निवारण आणि शारीरिक आरोग्यासाठी दररोज किंवा विशेषतः मंगळवार-शनिवारी सकाळी/संध्याकाळी पूर्वेकडे तोंड करून वाचावे. चैत्र नवरात्रीत (गुढीपाडवा ते रामनवमी) दररोज पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते. रामरक्षास्तोत्र आणि इतरही धर्मशास्त्रातील बाबी याबद्दल समजून घेऊ या..

भगवान शिव वाल्मिकी ऋषींच्या स्वप्नात प्रकट झाले

​बुध कौशिक ऋषी वाल्मिकी यांनी रामरक्षा स्तोत्र लिहिले. दरम्यान पौराणिक मान्यतेनुसार, असे मानले जाते की भगवान शिव वाल्मिकी ऋषींच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्यांनी राम स्तोत्राचे पठण केले. वाल्मिकीजी पहाटे उठले आणि त्यांनी संपूर्ण रामरक्षा स्तोत्र लिहिले. देववाणी हा स्रोत संस्कृतमध्ये उपलब्ध आहे. शुभ परिणाम आणि भगवान रामाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी रामस्त्रोत जप केला जाऊ शकतो. रामस्त्रोतचे यशस्वी पठण जातकाच्या जीवनातील विविध पैलूंमध्ये यश आणि समृद्धी आणते. मात्र कामानुसार त्याच्या पद्धतीतही बदल दिसून येत आहेत. हे स्तोत्र 11 वेळा पठण करावे. श्री रामरक्षा स्तोत्राचे 11 वेळा पठण केल्यास त्याचा प्रभाव दिवसभर राहतो, असेही सांगितले जाते. राम स्तोत्राचा सतत 45 दिवस पठण केल्यास त्याचा प्रभाव दुप्पट होतो.

हिंदू धर्मात चैत्र नवरात्रीचं विशेष असं महत्त्व आहे. या नऊ दिवसांत केलेल्या पूजा विधीचं चांगलं फळ मिळतं. रामरक्षा स्त्रोत सिद्ध करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे.

Chaitra Navratri: चैत्र नवरात्रीच्या उपवासात हिरवी मिरची आणि लाल मिरचीतील फरक काय? जाणून घ्या नवरात्रीतील नियम

चैत्र शुद्ध प्रतिपदा ते रामनवमीपर्यंतच्या कालावधीला चैत्र नवरात्र किंवा रामनवरात्र असंही म्हंटलं जातं. रामरक्षा सर्वात प्रभावी स्तोत्र आहे. रामरक्षा पठणाने एक वेगळीच उर्जा आपल्याला मिळते. दररोज रामरक्षा म्हटल्याने प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग सङि‌गनौ ।रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रत: पथि सदैव गच्छताम् ॥ हा श्लोक म्हणताना वेगळाच अनुभव येतो. इतकंच रामरक्षा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्यास सिद्ध होते. रामरक्षा अनुष्ठानाकरता चैत्र नवरात्री सर्वात उत्तम काळ आहे. रामरक्षा सिद्ध करण्यास उत्तम काळ असल्याचं धर्मशास्त्रात सांगितलं गेलं आहे. यंदा चैत्र नवरात्र 19 मार्च ते 27 मार्च या कालावधीत आहे.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला सकाळी लवकर स्नान करू स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. कपाळाला टिळा लावावा. आराध्यदैवत गणपती, कुलदैवत, इष्ट देवता आणि आई वडिलांना नमस्कार करावा. त्यानंतर संकल्प सोडून रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं. रामरक्षा म्हणण्यापूर्वी एका जागी शांतपणे बसा. मनापासून श्रीरामांचं आव्हान करा. त्यानंतर रामरक्षा स्तोत्राचं पठण करा. नवरात्रीत नऊ दिवस देवाला नैवेद्य अर्पण करावा.

Ramayana: आदर्श बंधुप्रेम म्हणजे काय? जाणून घ्या राम, लक्ष्मण आणि भरत यांच्या बंधुप्रेमाची अनोखी कथा

रामरक्षा स्तोत्र का पठण करावे?

संरक्षण: हे स्तोत्र नकारात्मक ऊर्जा आणि संकटांपासून संरक्षण करते. नियमित वाचनाने जीवनातील अडथळे दूर होऊन सुख-समृद्धी लाभते. आपली मनोकामना पूर्ण होते. यामुळे मन शांत राहते आणि भक्तीने प्रभू रामाचे आशीर्वाद मिळतो. हे स्तोत्र वाचल्याने भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढतो. निर्भयता संचारते.

रामरक्षा स्तोत्र कधी आणि कसे पठण करावे?

सकाळी स्नान करून किंवा संध्याकाळी विशेषतः मंगळवारी आणि शनिवारी याचे पठण करावे. पूजेच्या ठिकाणी शक्यतो पूर्वेकडे तोंड करून बसावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून दिवा लावून, शुद्ध उच्चारात श्रद्धेने पठण करावे.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: चैत्र नवरात्रीत रामरक्षा स्तोत्र का म्हणावे?

    Ans: चैत्र नवरात्री हा साधना आणि भक्तीचा पवित्र काळ आहे. या काळात रामरक्षा स्तोत्र पठण केल्यास त्याचे फल अधिक मिळते असे मानले जाते.

  • Que: रामरक्षा स्तोत्र पठणाचे फायदे काय आहेत?

    Ans: मानसिक शांतता मिळते, भीती आणि नकारात्मकता दूर होते, संकटांपासून संरक्षण मिळते, आत्मविश्वास वाढतो, जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते

  • Que: रामरक्षा स्तोत्र कधी म्हणावे?

    Ans: दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पठण करता येते. विशेषतः मंगळवार आणि शनिवार शुभ मानले जातात.

Web Title: What are the benefits of reciting ram raksha stotra during chaitra navratri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Chaitra Navaratri
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: मूलांक ७ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
2

Weekly Horoscope: ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Venus Planet Astrology: कुंडलीमधील शुक्र कमजोर असल्यास दिसतात या सवयी, स्वच्छतेशी संबंधित सवयींकडे करू नका दुर्लक्ष
3

Venus Planet Astrology: कुंडलीमधील शुक्र कमजोर असल्यास दिसतात या सवयी, स्वच्छतेशी संबंधित सवयींकडे करू नका दुर्लक्ष

Hindu Ritual: देवपूजेआधी गोमूत्र शिंपडण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धर्मशास्त्रातील कारण
4

Hindu Ritual: देवपूजेआधी गोमूत्र शिंपडण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धर्मशास्त्रातील कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.