Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashadha Month: आषाढ महिन्यात या कारणांसाठी टाळली जातात शुभकार्य, जाणून घ्या कारणे

हिंदू पंचांगानुसार आषाढ महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात चातुर्मासाची सुरुवात होत असल्याने विवाह, गृहप्रवेश, मुंज, नवीन व्यवसायाची सुरुवात यांसारखी अनेक शुभकार्ये पारंपरिक मान्यतेनुसार टाळली जातात. आषाढ महिन्यात शुभ कार्य का केली जात नाही, जाणून घ्या कारणे

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jul 15, 2026 | 09:40 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • आषाढ महिन्यात या कारणांसाठी टाळली जातात शुभकार्य
  • आषाढ महिन्याची सुरुवात कधीपासून होते
  • आषाढ महिना शुभ आहे की अशुभ
 

आषाढ महिन्याची सुरुवात म्हणजे आषाढ मासारंभ. हा भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यापासून पावसाची सुरुवात, शेतीची काम आणि अनेक धार्मिक व्रत उपवास सुरू होतात. मात्र या महिन्यात विवाह, ग्रहप्रवेश, मूंज, वास्तूशांती यांसारखे शुभ कार्य साधारणपणे टाळले जातात. यामागे धार्मिक आणि ऋतूमानाची संबंधित आणि सामाजिक देखील काही कारणे आहे. आषाढ महिन्यात शुभ कार्य का टाळली जातात, जाणून घ्या

देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात

आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात चार महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. या कालावधीला चातुर्मास असं म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार ते झोपेत असल्यामुळे नवीन शुभ कार्यांना त्यांचा आशीर्वाद लाभत नाही त्यामुळे विवाह, ग्रहप्रवेश, मुंज यांसारखे मंगल कार्य पुढे ढकलले जाते. आषाढ ते कार्तिक हा मास चातुर्मास म्हणून ओळखला जातो. या चार महिन्यांमध्ये संत, साधू आणि वारकरी अधिकाधिक पूजा, जप, तप या साधनेवर भर देतात म्हणून हा काळ उत्सव साजरे करण्यापेक्षा आत्मचिंतनासाठी योग्य मानला जातो, ही आहे धार्मिक मान्यता.

पावसाळ्यामुळे प्रवासातील अडचणी

असे देखील म्हटले जाते की, हा काळ पावसाचा असतो. पूर्वी वाहतूक व्यवस्था नव्हती. पावसामुळे रस्ते चिखलमच होईचे. नद्या दुथडी भरून वाहत असायच्या त्यामुळे प्रवास धोकादायक व्हायचा. अशावेळी विवाह किंवा इतर मोठ्या समारंभांसाठी दूरवर येणाऱ्या पाहुण्यांना अडचणी येऊ नये म्हणूनच या काळात शुभ कार्य टाळण्याची प्रथा ठरली. शिवाय आषाढ हा पेरणीचा महिना आहे. शेतकऱ्यांसाठी हा वर्षातील सर्वांत महत्त्वाचा काळ असतो.

Ashadha Gupt Navratri 2026: आषाढ गुप्त नवरात्रीची सुरुवात आजपासून, जाणून घ्या मुहूर्त, पूजा करण्याची पद्धत आणि नियम

आरोग्याची काळजी

जर या काळात विवाह किंवा मोठे समारंभ झाले तर शेतीची कामं मागे पडू शकतात. म्हणूनच समाजाने शेतीला प्राधान्य देण्यासाठी शुभ कार्य पुढे ढकलली. तर आरोग्याच्या दृष्टिकोनाने पावसाळ्यात संसर्गजन्य आजार, पचनाचे त्रास आणि हवामानातील बदल अधिक असतात. मोठ्या मेजवाण्या किंवा गर्दीचे कार्यक्रम आरोग्यासाठी जोखमीचे ठरू शकतात. यामुळेही या काळात मोठे समारंभ टाळण्याची परंपरा निर्माण झाली असावी.

Astrology Tips : मनातील तणाव कमी करण्यासाठी चांदी ठरते का उपयुक्त? वाचा चंद्र ग्रहाशी असलेला खास संबंध

आषाढ महिना अशुभ आहे का

मग प्रश्न उरतो तो आषाढ महिना अशुभ आहे का? तर नाही आषाढ महिना अशुभ मानला जात नाही उलट आषाढ महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यातच आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व असते. पंढरपूरची वारी पूर्ण होते. भगवान विष्णू, विठ्ठल आणि महादेवांची उपासना केली जाते. दान, जप, तप, व्रत, पारायण आणि नामस्मरणाला या काळात विशेष महत्त्व दिले जाते. म्हणजेच आषाढ महिना शुभ कार्यासाठी नव्हे तर शुभ विचार, भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी राखून ठेवलेला महिना आहे असं म्हणायला हरकत नाही.

 

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: आषाढ महिन्यात शुभकार्य का टाळली जातात?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. त्यामुळे विवाह, गृहप्रवेश, मुंज यांसारखी मंगलकार्ये चातुर्मास संपेपर्यंत टाळली जातात.

  • Que: चातुर्मास म्हणजे काय?

    Ans: आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंतचा चार महिन्यांचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. हा काळ जप, तप, व्रत आणि भक्तीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो.

  • Que: आषाढ महिना अशुभ मानला जातो का?

    Ans: नाही. आषाढ महिना अशुभ नसून अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णू, विठ्ठल आणि महादेव यांच्या उपासनेला विशेष महत्त्व असते.

Web Title: What are the reasons why auspicious work is not done in the month of ashadha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Hindu Festival
  • hindu religion
  • Religion

संबंधित बातम्या

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा! गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या सर्व तारखा एका क्लिकवर
1

Ganesh Chaturthi 2026: यंदा बाप्पांचा मुक्काम 12 दिवसांचा! गणेश चतुर्थी ते विसर्जनाच्या सर्व तारखा एका क्लिकवर

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय
2

Janmashtami 2026: नवरा-बायकोच्या नात्यात पुन्हा फुलेल प्रेम? जन्माष्टमीला करा ‘हे’ उपाय

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?
3

Krishna Janmashtami 2026: श्रीकृष्णांचं नाव नेमकं कोणी ठेवलं? जन्मानंतर गुपचूप झालं नामकरण; ‘कृष्ण’ नावाचा अर्थ काय?

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान!  या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी
4

September 2026 Rajyog: सप्टेंबर ठरणार भाग्यवान! या’ 5 राशींचं नशीब चमकणार, राजासारखं आयुष्य जगण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.