Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalashtami 2026: 9 की 10 एप्रिल कधी आहे मासिक कालाष्टमी, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

हिंदू धर्मात कालाष्टमीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान कालभैरवाच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी विधी केल्याने भीती, अडथळे आणि नकारात्मक शक्ती दूर होतात. कालाष्टमी कधी आहे, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 08, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कालाष्टमी कधी आहे
  • कालाष्टमी मुहूर्त
  • कालाष्टमीचे काय आहे महत्त्व
 

 

 

हिंदू धर्मात कालाष्टमीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाला समर्पित आहे. कालाष्टमी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालाष्टमीचा सण साजरा केला जातो. यावेळी एप्रिल महिन्यामध्ये कालाष्टमी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

कधी आहे कालाष्टमी

पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी तिथीची सुरुवात ९ एप्रिल रोजी रात्री ०९:१९ वाजता सुरू होणार आहे आणि याची समाप्ती १० एप्रिल रोजी रात्री ११:१५ वाजता होणार आहे. धार्मिक श्रद्धेनुसार कालाष्टमी रात्री साजरी केली जाणार आहे. यावेळी मासिक कालाष्टमी शुक्रवार, 10 एप्रिल रोजी आहे.

Krishnashtakam: कृष्णभक्तांसाठी खास! श्रीकृष्ण अष्टकम गाण्याचे काय आहेत आध्यात्मिक फायदे

कालाष्टमी शुभ मुहूर्त

अष्टमी तिथीची सुरुवात ९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजून १९ मिनिटांनी होणार आहे. कालाष्टमीची पूजा रात्री केली जाते, त्यामुळे ९ एप्रिलच्या रात्रीच पूजा करणे उत्तम राहील. उदयतिथीनुसार मासिक कालाष्टमीचे व्रत शुक्रवार, 10 एप्रिल रोजी पाळले जाणार आहे.

कालाष्टमीची पूजा करण्याची पद्धत

कालाष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवास करण्याचा संकल्प केला जातो आणि रात्री भगवान काळभैरवाची विशेष पूजा केली जाते. सर्वप्रथम, भगवान काळभैरवाच्या मूर्तीची किंवा चित्राची स्थापना केली जाते. यानंतर मोहरीचे तेल, काळे तीळ, फुले आणि नारळ अर्पण केले जातात. दिवा लावा, आरती करा आणि भैरव चालिसा किंवा मंत्रांचे पठण करा. या दिवशी काळ्या कुत्र्याला खाऊ घालणे देखील शुभ मानले जाते. शेवटी, प्रसाद वाटून उपवास सोडला जातो.

Sopandev: अल्पायुष्यातही अमरत्व मिळवणारे संत सोपानदेवांचा कसा आहे आध्यात्मिक वारसा, जाणून घ्या

कालाष्टमी व्रताचे महत्त्व

असे मानले जाते की या दिवशी भगवान काळभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि शत्रूंपासून संरक्षण मिळते. याशिवाय, हा उपवास मानसिक ताण कमी करतो आणि सुख-समृद्धी आणतो. काळभैरवाला वेळेचा स्वामी मानले जाते, त्यामुळे त्याच्या कृपेने जीवनात स्थिरता आणि शिस्तही येते.

कालष्टमीला काय करावे?

या दिवशी भैरव बाबांची पूजा करणे, दिवे दान करणे, मोहरीच्या तेलाचे दिवे लावणे आणि ‘ओम काल भैरवाय नमः’ या मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे जीवनातील अडचणी कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा येते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मासिक कालाष्टमी म्हणजे काय?

    Ans: प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला येणारा दिवस ‘कालाष्टमी’ म्हणून ओळखला जातो, जो कालभैरव यांना समर्पित आहे.

  • Que: कालाष्टमीला कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

    Ans: या दिवशी मुख्यतः कालभैरव यांची पूजा केली जाते.

  • Que: कालाष्टमी व्रताचे महत्त्व काय आहे?

    Ans: हे व्रत केल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात, संकटे कमी होतात आणि संरक्षण मिळते, अशी श्रद्धा आहे.

Web Title: When is masik kalashtami 2026 muhurt and importance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • astrology news
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Dombivli News: संस्कारांचा वारसा जतनासाठी डोंबिवलीत उपकर्म उत्सव; २०० ब्राह्मण कुटुंबांचा सहभाग
1

Dombivli News: संस्कारांचा वारसा जतनासाठी डोंबिवलीत उपकर्म उत्सव; २०० ब्राह्मण कुटुंबांचा सहभाग

Panchak Upay: पंचक दोष टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय, राहूचा तणाव होईल दूर
2

Panchak Upay: पंचक दोष टाळण्यासाठी करा हे घरगुती उपाय, राहूचा तणाव होईल दूर

Shadashtak Yog: २ सप्टेंबरला शनि-शुक्र षडाष्टक योग! या राशींवर होऊ शकतो करिअर आणि आरोग्यावर परिणाम
3

Shadashtak Yog: २ सप्टेंबरला शनि-शुक्र षडाष्टक योग! या राशींवर होऊ शकतो करिअर आणि आरोग्यावर परिणाम

Jatashankar Mahadev Temple: गिरनार पर्वतावरील जटाशंकर महादेव मंदिराची काय आहे आख्यायिका, जाणून घ्या
4

Jatashankar Mahadev Temple: गिरनार पर्वतावरील जटाशंकर महादेव मंदिराची काय आहे आख्यायिका, जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.