
फोटो सौजन्य- pinterest
आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गजानन संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला लोक गजानन संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात आणि अडथळे दूर करणाऱ्या गणेशाची पूजा करतात. या वेळी संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, परंतु दिवसभर पंचकही असणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भक्त पूर्ण दिवस उपवास करतात. या दिवशी चंद्राला जल अर्पण करून उपवास सोडला जातो. संकष्टी चतुर्थी कधी आहे, मुहूर्त आणि चंद्रोद्याची वेळ जाणून घ्या
पंचांगानुसार, आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थीची सुरुवात १ ऑगस्ट रोजी रात्री ११:०७ वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ ऑगस्ट रोजी रात्री ११:१५ वाजता होईल. उद्यतिथीनुसार यावेळी संकष्टी चतुर्थीचे व्रत रविवार २ ऑगस्ट रोजी पाळले जाणार आहे.
गजानन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे ४:१९ ते पहाटे ५:०१ पर्यंत असेल, तर अभिजीत मुहूर्त दुपारी १२:०० ते १२:५४ पर्यंत असतो. उपवास करणारे सकाळी ७:२४ ते दुपारी १२:२७ च्या दरम्यान कधीही भगवान गणेशाची पूजा करू शकतात. या शुभ मुहूर्तामध्ये, चर-सामान्य मुहूर्त सकाळी ०७:२४ ते सकाळी ०९:०५ पर्यंत, लाभ-उन्नती मुहूर्त सकाळी ०९:०५ ते सकाळी १०:४६ पर्यंत, तर अमृत-सर्वोत्तम मुहूर्त सकाळी १०:४६ ते दुपारी १२:२७ पर्यंत आहे.
गजानन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. हा शुभ आणि फलदायी योग ३ ऑगस्ट रोजी रात्री ९:३७ वाजता तयार होईल आणि पहाटे ५:४४ पर्यंत टिकेल. या योगादरम्यान हाती घेतलेले कार्य यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे. चतुर्थीच्या सकाळी अतिगंडा योग तयार होईल, जो रात्री १०:३० पर्यंत असेल, त्यानंतर शुक्रमा योग तयार होईल. त्या दिवशी पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळपासून रात्री ९:३७ पर्यंत राहील, त्यानंतर उत्तरा भाद्रपदा नक्षत्र असेल.
गजानन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर प्रार्थना करावी. संध्याकाळी चौरंगावर किंवा पाटावर लाल रंगांचे वस्त्र अंथरावे. त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करावी. दिवा किंवा धूप लावावा. त्यानंतर गणपती बाप्पाला चंदन लावावे. फूल अर्पण करावी. त्यानंतर लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवावा. पूजा करतेवेळी दुर्वा अर्पण करायला विसरू नका. पूजा झाल्यानंतर संकष्टी चतुर्थीची कथा वाचावी किंवा ऐकावी त्यानंतर आरती करावी. त्यानंतर रात्री चंद्रोद्याच्या वेळी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडं दूध, तांदूळ आणि फूल टाका आणि ते चंद्राला अर्पण करा. नैवेद्य दाखवून तो घराध्ये सर्वांना वाटा.
गजानन संकष्टी चतुर्थीला लोक उपवास करतात आणि गणपतीच्या गजानन रूपाची पूजा करतात. जे लोक योग्य विधीपूर्वक हा उपवास करतात, त्यांच्या त्रासातून त्यांची सुटका होते. गणपतीच्या आशीर्वादाने त्यांचे दुःख दूर होते आणि त्यांना सुख प्राप्त होते. त्यांच्या जीवनात शुभता वाढते.
गजानन संकष्टी चतुर्थीला रात्री ९ वाजून २४ मिनिटांनी चंद्रोदय होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ऑगस्ट महिन्यातील संकष्टी चतुर्थी रविवार २ ऑगस्ट रोजी आहे
Ans: हा दिवस भगवान श्रीगणेशाला समर्पित असून, या दिवशी व्रत आणि पूजन केल्याने संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे.
Ans: धार्मिक मान्यतेनुसार विघ्नांचा नाश होतो, आर्थिक अडचणी कमी होतात, आरोग्य सुधारते आणि श्रीगणेशाची कृपा प्राप्त होते.