Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय

Hartalika Teej 2026: हरतालिका तीज हा देवी पार्वती आणि भगवान शंकराला समर्पित महत्त्वाचा हिंदू सण आहे. यंदा हरतालिका तीज १४ सप्टेंबर २०२६ रोजी साजरी केली जात आहे. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी, तर अविवाहित मुली मनासारखा जीवनसाथी मिळावा यासाठी उपवास करतात

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 14, 2026 | 03:10 PM
Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज!

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज!

Follow Us
Follow Us:

 

  • हरतालिका तीज २०२६: सोमवार, १४ सप्टेंबरला साजरी केली जात आहे.
  • शिव-पार्वतीची पूजा करून वैवाहिक सुखासाठी प्रार्थना केली जाते.
  • स्थानिक पंचांगानुसार पूजेची शुभ वेळ तपासणे महत्त्वाचे आहे.
 

आज सगळीकडे हरतालिका तीजचा सण आहे. वैवाहिक सुखासाठी केला जाणारा हा सगळ्यात मोठा उपवास मानला जातो. आख्यायिका अशी आहे की देवी पार्वतीने भगवान शंकराला नवरा म्हणून मिळवण्यासाठी खूप कठीण तप केलं होतं. त्याच तपाची आठवण म्हणून हा उपवास केला जातो.लग्न झालेल्या महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी हा उपवास करतात, तर ज्या मुलींचं लग्न व्हायचं आहे त्या चांगला नवरा मिळावा म्हणून हा उपवास करतात. Hartalika Teej 2026:

तीज कधी आहे?

यंदा हरतालिका तीज सोमवार, 14 सप्टेंबर 2026 रोजी आली आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात तिसऱ्या दिवशी हा उपवास असतो. यावेळी तृतीया तिथी 13 सप्टेंबर सकाळी सुरु झाली आणि 14 सप्टेंबर सकाळी संपत आहे, त्यामुळे उदय तिथीनुसार आज 14 सप्टेंबरला उपवास धरला जात आहे.

पूजा कधी करायची?

दिल्लीच्या पंचांगानुसार आज सकाळी 6:05 ते 7:06 ही वेळ पूजेसाठी शुभ आहे. पण हे लक्षात ठेवा, प्रत्येक गावाच्या, शहराच्या वेळा वेगळ्या असतात. बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी प्रदोष काळात शंकर-पार्वतीची पूजा करतात. त्यामुळे तुमच्या गावच्या पंचांगातली वेळ एकदा नक्की बघा.

तीजची गोष्ट काय आहे?

गोष्ट त्रेता युगातली आहे. देवी पार्वतीला भगवान शंकराशी लग्न करायचं होतं, पण तिचे वडील हिमालय तिचं लग्न विष्णू देवासोबत लावणार होते. पार्वतीला हे मान्य नव्हतं. तेव्हा तिच्या मैत्रिणींनी तिला जंगलात नेलं. तिथे पार्वतीने वाळूचं शिवलिंग बनवलं, दिवस-रात्र शंकराची पूजा केली, कडक उपवास केला आणि शंकरालाच पती म्हणून मिळवीन असा हट्ट धरला. शेवटी तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शंकराने तिला पत्नी म्हणून स्वीकारलं. म्हणून या सणाला हरतालिका म्हणतात – हर म्हणजे हरण करणे आणि तालिका म्हणजे मैत्रीण. मैत्रिणींनी हरण करून नेलं म्हणून हरतालिका.पूजा कशी करायची?आजच्या दिवशी सगळ्यात आधी गणपतीची पूजा करायची आणि मग शंकर-पार्वतीची.तुम्ही घरातच वाळू किंवा मातीचं शिवलिंग आणि पार्वतीची मूर्ती बनवू शकता. त्याला पाणी, पंचामृत, अक्षता, कुंकू, चंदन, फुलं, बेलाची पानं, धूप, दिवा वाहा. देवी पार्वतीला बांगड्या, टिकली, साडी अशा सुहागाच्या वस्तू अर्पण करा. आणि मग तीजची कथा ऐका. शेवटी आरती करून घरात सुख-शांती राहू दे अशी प्रार्थना करा.

आज दान काय करावं?

तीजच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही गरिबांना कपडे, धान्य, फळं, मिठाई दान करू शकता. सुहागिन महिलांनी दुसऱ्या गरजू महिलेला साडी, बांगड्या, कुंकू, मेंदी, टिकली दान केली तर खूप पुण्य मिळतं असं म्हणतात. दान दाखवण्यासाठी करू नका, मनापासून करा.

सोळा शृंगाराचं महत्त्व

आजच्या दिवशी महिला नटून-थटून सोळा शृंगार करतात. सिंदूर, टिकली, बांगड्या, मेंदी, मंगळसूत्र, पैंजण हे सगळं सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. अशी मान्यता आहे की असे नटून पूजा केली की अखंड सौभाग्य मिळतं.उपवास करताना तब्येतीची काळजी घ्या.

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

हरतालिका तीजचा उपवास निर्जला असतो, म्हणजे दिवसभर अन्न नाही आणि पाणी पण नाही. हा खूप कठीण उपवास आहे. सगळ्यांची तब्येत सारखी नसते.जर तुम्हाला काही आजार असेल, तुम्ही गरोदर असाल, गोळ्या-औषधं सुरु असतील किंवा डॉक्टरांनी उपवास करायला नको सांगितलं असेल तर उगाच हट्ट करू नका.

Ganesh Chaturthi: महाराष्ट्रापुरतीच नाही, देशातील या ८ राज्यांमध्येही गणेश चतुर्थीची धूम; जाणून घ्या कुठे कसा साजरा होतो उत्सव

पाण्याशिवाय उपवास करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. श्रद्धा महत्त्वाची आहेच पण तब्येत त्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे.रात्रभर जागरण आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडणे बऱ्याच घरांमध्ये आज रात्रभर जागरण करतात, भजन म्हणतात, शिव-पार्वतीची गाणी म्हणतात आणि तीजची कथा सांगतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून पूजा करून मग उपवास सोडला जातो. प्रत्येक भागात पद्धत थोडी वेगळी असू शकते.

Web Title: Date puja muhurat vrat rituals and hartalika teej story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News
  • Religion
  • religion news

संबंधित बातम्या

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
1

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Instagram New Feature: Instagram वापरताय? मग ‘हे’ Latest फीचर नक्की ट्राय करा; प्रोफाइलला मिळणार भन्नाट लूक!
2

Instagram New Feature: Instagram वापरताय? मग ‘हे’ Latest फीचर नक्की ट्राय करा; प्रोफाइलला मिळणार भन्नाट लूक!

Ganeshotsav AI Photo Prompts:  बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!
3

Ganeshotsav AI Photo Prompts: बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या
4

Weekly Horoscope: सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा सर्व राशींसाठी कसा राहील जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.