Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा ‘हा’ श्लोक; जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Rishi Panchami 2026: ऋषीपंचमी हा ऋषी-मुनींचे स्मरण आणि त्यांच्या ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा धार्मिक सण आहे. यंदा १५ सप्टेंबर २०२६ रोजी ऋषीपंचमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी उपवास करताना पारंपरिक रानभाज्या, ऋषीची भाजी आणि इतर सात्त्विक पदार्थ खाण्याची प्रथा आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 14, 2026 | 04:07 PM
Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Rishi Panchami 2026: सप्तर्षींचं स्मरण करताना म्हणा( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ऋषीपंचमी २०२६: १५ सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार.
  • पूजेवेळी सप्तर्षींचे स्मरण करून विशेष श्लोक म्हणण्याची परंपरा आहे.
  • रानभाज्या आणि ऋषीची भाजी या दिवसाच्या पारंपरिक आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत.
प्रत्येक सण लक्षात राहतो तो त्याच्या नैवेद्यामुळे. ऋषीपंचमी पण तशीच. वर्षभर जे लोक उकडलेल्या भाज्या नाक मुरडून खातात, तेच लोक ऋषीपंचमीची भाजी अगदी आवडीने खातात. सोबत तांदळाची भाकरी, तेलाचा थेंब पण नाही, फक्त खोबऱ्यावर केलेली ही भाजी.पण हा सण फक्त खाण्यापिण्यापुरता नाही. याचा खरा अर्थ आहे आपल्या ऋषींना आठवणं. त्यासाठीच भाद्रपद शुद्ध पंचमी ही तिथी ठरवली आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी हा सण येतो. यंदा 15 सप्टेंबरला ऋषीपंचमी आहे. या दिवशी बैलांनी कष्ट केलेलं धान्य खायचं नाही, हाताने सडलेले तांदूळ, रानभाज्या आणि ऋषीची भाजी खाऊन उपवास करतात. ऋषी कसे कंदमुळे, पालेभाज्या खाऊन निरोगी आणि दीर्घायुषी राहायचे हे यातून सांगितलं जातं.

सात ऋषींचं नाव घेणारा श्लोक

ऋषीपंचमीच्या दिवशी आंघोळ झाल्यावर किंवा पूजेच्या वेळी हा श्लोक म्हणायचा असतो:कश्यपोऽत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोऽथ गौतमः । जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः ॥याचा अर्थ सोपा आहे. कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ हे सात ऋषी आपल्याला ज्ञान देणारे मानले जातात. या सात जणांचं नाव जरी घेतलं तरी मन शांत होतं आणि आयुष्यातले अडथळे दूर होतात असं धर्मात सांगितलं आहे. Rishi Panchami 2026:

ऋषीपंचमी का साजरी करायची?

आपल्या ऋषींनी जंगलात तप करून वेद, उपनिषद, आयुर्वेद, खगोलशास्त्र, गणित हे सगळं ज्ञान आपल्याला दिलं. आपण ज्या गोत्रात जन्मलो, जे ज्ञान आपण वापरतो, ते त्यांच्यामुळेच. त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही, पण निदान त्यांची आठवण ठेवून आभार मानण्यासाठी हा दिवस आहे.आपल्या हातून रोज कळत-नकळत चुका होतात, छोटे जीव मारले जातात, बोलण्यातून कोणाला दुखावलं जातं. या सगळ्या दोषांचं क्षालन व्हावं, मन साफ व्हावं म्हणून हे व्रत केलं जातं.

त्या भाजीमागचं खरं विज्ञान काय?

ऋषीपंचमीला न नांगरलेल्या जमिनीत उगवलेल्या भाज्या खातात. म्हणजे जिथे बैलांनी कष्ट केले नाहीत अशा रानभाज्या. अळू, माठ, लाल भोपळा, तोंडली, दोडकी, सुरण, शिराळं अशा भाज्या एकत्र करून त्यात कंदमुळे आणि नारळाचं दूध टाकून ही भाजी बनवतात.यामागे दोन मोठी कारणं आहेत.पहिलं म्हणजे बैलांना आराम. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना एक दिवस तरी सुट्टी मिळावी, हा विचार. किती साधा पण किती मोठा विचार आहे.दुसरं म्हणजे तब्येत. पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमी झालेली असते. या रानभाज्या नैसर्गिक असतात, त्या शरीरातले विषारी घटक बाहेर काढतात, पचन सुधारतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय

पूजा कशी करायची?

सकाळी लवकर उठून आघाड्याच्या काडीने दात घासायचे आणि अंगाला तीळ लावून आंघोळ करायची अशी परंपरा आहे. नंतर पाटावर सात सुपाऱ्या किंवा तांदळाच्या राशी मांडून त्यावर सप्तर्षी आणि अरुंधतीची स्थापना करायची.

Ganesh Chaturthi: महाराष्ट्रापुरतीच नाही, देशातील या ८ राज्यांमध्येही गणेश चतुर्थीची धूम; जाणून घ्या कुठे कसा साजरा होतो उत्सव

पूजा झाल्यावर हात जोडून असं म्हणायचं –

“हे ऋषींनो, आमच्या हातून शरीराने, मनाने किंवा बोलण्यातून काही चूक झाली असेल तर माफ करा. आम्हाला चांगली बुद्धी, चांगले विचार आणि चांगलं आरोग्य द्या.”फक्त जिभेचे चोचले म्हणून भाजी खाऊ नका. या दिवशी ऋषींनी दिलेल्या ज्ञानाची आठवण ठेवा आणि निसर्गाचा आदर करा. तरच खरी ऋषीपंचमी साजरी होईल.

Web Title: Rishi panchami 2026 date shloka vrat significance bhaji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News
  • Religion
  • religion news

संबंधित बातम्या

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
1

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय
2

Hartalika Teej 2026: आज हरतालिका तीज! ‘या’ ५ वस्तूंचं दान करा अन् समृद्धीसाठी करा खास उपाय

Instagram New Feature: Instagram वापरताय? मग ‘हे’ Latest फीचर नक्की ट्राय करा; प्रोफाइलला मिळणार भन्नाट लूक!
3

Instagram New Feature: Instagram वापरताय? मग ‘हे’ Latest फीचर नक्की ट्राय करा; प्रोफाइलला मिळणार भन्नाट लूक!

Ganeshotsav AI Photo Prompts:  बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!
4

Ganeshotsav AI Photo Prompts: बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.