Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नामध्ये मुलीला माहेरहून अन्नपूर्णा देवीची मूर्ती का देतात? काय आहे त्यामागील शास्त्र?

अन्नपूर्णा म्हणजे पार्वती देवीचेच एक रूप म्हणून त्यांची पूजा केली जाते. “अन्नपूर्णा” या शब्दाचा अर्थ म्हणजे अन्नाने परिपूर्ण करणारी जी घरात कधीही अन्नाची कमतरता पडू देत नाही. याची एकदंत कथा देखील सांगितली जाते.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 28, 2026 | 04:36 PM
लग्नामध्ये मुलीला माहेरहून अन्नपूर्णा देवीची मूर्ती का देतात? काय आहे त्यामागील शास्त्र?
Follow Us
Follow Us:
  • लग्नामध्ये मुलीला माहेरहून अन्नपूर्णा देवीची मूर्ती का देतात?
  • काय आहे त्यामागील शास्त्र?
हिंदू धर्मानुसार असं म्हटलं जातं की, गणपती, बाळकृष्ण, तुमचं कुलदैवत आणि त्याबरोबर पाहिजे असते ती म्हणजे अन्नपूर्णेची मूर्ती. हिंदू धर्मात देवी अन्नपुर्णेला सर्वात जास्त महत्व आहे. अन्नपूर्णा देवी ही अन्नाची, समृद्धीची आणि धनधान्याची देवी मानली जाते. अन्नपूर्णा म्हणजे पार्वती देवीचेच एक रूप म्हणून त्यांची पूजा केली जाते. “अन्नपूर्णा” या शब्दाचा अर्थ म्हणजे अन्नाने परिपूर्ण करणारी जी घरात कधीही अन्नाची कमतरता पडू देत नाही. याची एकदंत कथा देखील सांगितली जाते.

पुराणांनुसार, एकदा भगवान शिव बोलता बोलता बोलून गेले की, “हे संपूर्ण जग माया आहे आणि अन्नालाही काही खरं अस्तित्व नाही.” त्यांच्या या विचाराने पार्वती देवी नाराज झाल्या. कारण अन्न हे प्रत्येक सजीवाच्या जगण्याची मूलभूत गरज आहे आणि त्याला “माया” म्हणणे म्हणजे या निसर्गचक्राला नाकारणे होय. या अन्नाचं महत्व महादेवांना पटवून द्यायलाच पाहिजे असं पार्वतीमातेने ठरवलं. पार्वती देवीने संपूर्ण जगातून अन्न नाहीसे केले.अन्न नाहीसे होताच पृथ्वीवर भीषण परिस्थिती निर्माण झाली. सर्व जीव उपाशी राहू लागले, देव-दानव सुद्धा व्याकुळ झाले. सृष्टीचा समतोल बिघडला आणि जीवन चक्र संपून जायला लागलं. या संकटातून शिवांनाही जाणवले की अन्न ही केवळ माया नसून, तीच सृष्टीचा आधार आहे.

अन्नपूर्णा देवी झाली प्रकट
शेवटी महादेवांनी  पार्वती देवीची माफी  मागितली. त्यानंतर पार्वती देवी काशी येथे अन्नपूर्णा देवीच्या रूपात प्रकट झाल्या. त्यांनी अन्नदान सुरू केले आणि संपूर्ण सृष्टीचे पोषण केले.या प्रसंगात एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असा होता की, भगवान शिव स्वतः भिक्षुकाच्या रूपात अन्न मागण्यासाठी अन्नपूर्णा देवीसमोर गेले. देवीने त्यांना अन्न दिले आणि त्यातून अन्नाचे सर्वोच्च महत्त्व पटवून दिलं. याचं महत्व एवढंच नाही तर लग्नात देखील नवरी मुलीला सासरी जाताना अन्नपुर्णेची मूर्ती दिली जाते.

Kendra Drishti Rajyog 2026: २७ एप्रिल रोजी तयार होत आहे केंद्र दृष्टी योग, या राशींच्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता

लग्नात मुलीला का देतात अन्नपूर्णेची मूर्ती ? 
लग्नात मुलीला अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा या कथेशी निगडित आहे. नववधू ही अन्नपूर्णेचे रूप मानली जाते. ती ज्या घरात जाते, तिथे अन्न, समृद्धी आणि सुख नांदावे, हीच या परंपरेमागील भावना आहे. म्हणूनच, अन्नपूर्णा देवीची मूर्ती देणे म्हणजे मुलीला तिच्या नव्या आयुष्यासाठी समृद्धी, पोषण आणि अखंड सुखाचा आशीर्वाद देणे होय.अन्नपूर्णा देवी आपल्याला अन्नाचे महत्त्व, स्त्रीची भूमिका आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीचे महत्व शिकवते. त्यामुळेच आजही ही परंपरा श्रद्धेने आणि आदराने पाळली जाते.

नवीन घरात समृद्धी येण्यासाठी
मुलगी लग्नानंतर नव्या घरात जाते. अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याचा अर्थ असा की, तिच्या हातून त्या घरात कधीही अन्नाची व संपत्तीची कमतरता भासू नये.

गृहलक्ष्मीचे प्रतीक

भारतीय संस्कृतीत नववधूला “गृहलक्ष्मी” मानले जाते. लक्ष्मी देवी प्रमाणेच ती घरात सुख-समृद्धी आणणारी असते. अन्नपूर्णा देवीची मूर्ती म्हणजे देवी पार्वतीचा मिळालेला आशीर्वाद म्हटलं जातं.

जबाबदारीची जाणीव

पूर्वीच्या काळात स्त्री घराच्या अन्नव्यवस्थेची प्रमुख होती. ही मूर्ती देऊन तिला घर सांभाळण्याची आणि कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी सूचित केली जात असे.

शुभतेचे आणि सतत अन्नसंपत्तीचे प्रतीक

धार्मिक श्रद्धेनुसार, ज्या घरात अन्नपूर्णा देवीची पूजा होते, तिथे अन्नाची कधीही कमतरता भासत नाही.

शास्त्रीय (धार्मिक) आधार

हिंदू धर्मग्रंथांमध्ये अन्नाला “ब्रह्म” मानले आहे. “अन्नं ब्रह्म”. अन्नपूर्णा देवी ही त्या अन्नब्रह्माची अधिष्ठात्री मानली जाते. म्हणून विवाहासारख्या शुभ प्रसंगी तिची स्थापना केल्याने नव्या संसाराला दिव्य आशीर्वाद मिळतो, असं मानलं जातं.

Ghrishneshwar Jyotirlinga: घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची काय आहे पौराणिक कथा, जाणून घ्या

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Why is an idol of goddess annapurna given to a girl from her husband at her wedding what is the scripture behind it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • hindu religion
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड
1

World News : चांगलंच महाग पडलं Googleला ;आयर्लंडकडून तब्बल 403 दशलक्ष युरोचा दंड

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद
2

World News : महाकाय जहाजाची छोट्या बोटीला धडक! सिंगापूरजवळ समुद्रात थरारक अपघात कॅमेऱ्यात कैद

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट
3

World Politics :नेतन्याहू यांना अटक? बंद करतो तुम्हाला मिळणारा पैसा फुकट

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट
4

world news : अमेरिकेला स्वर्ग नकोच आहे का ? पलाऊवर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.