फोटो सौजन्य- pinterest
भारताच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. हे मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यातील एलोरा लेण्यांच्या जवळ वेरूळ येथे स्थित आहे. भगवान शिव यांना समर्पित असलेले हे मंदिर अत्यंत पवित्र मानले जाते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा काय आहे ते जाणून घ्या
१२ ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं आणि भगवान शिवाच अत्यंत असे पवित्र मंदिर म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ या गावामध्ये हे मंदिर स्थित आहे. प्रसिद्ध असा वेरूळ लेण्यामध्ये हे मंदिर आहे. वर्षभर येथे भाविकांची प्रचंड गदी असते. घृष्णेश्वर मंदिराचा इतिहास हा प्राचीन काळाशी संबंधित आहे. अनेक आक्रमणामुळे हे मंदिर नष्ट देखील झाले आहे. नंतर मराठा साम्राजाच्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यामुळे आज दिसणार हे मंदिर त्यांच्या काळातील बांधकाम शैलीचं उत्तम उदाहरण आहे. घृष्णेश्वर मंदिर लहान लहान दगडांनी बांधलेलं असून त्याची वास्तूकला अत्यंत सुंदर आहे. मंदिराच्या भीतीवरती आणि खांबावरती विविध देवदेवतांची आणि पौराणिक कथा दर्शवणारी शिल्प कोरलेली आहे. मंदिराचा सभागृह आणि गर्भागृह अत्यंत आकर्षण आहे. येथे भक्ताला शिवलिंगाला स्पर्श करून अभिषेक करण्याची परवानगी आहे. जे इतर अनेक ज्योतिर्लिंगामध्ये आढळत नाही. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची पौराणिक कथा काय आहे ते जाणून घ्या
“घृष्णेश्वर” या नावाचा अर्थ “करुणा आणि प्रेमाने भक्तांचे रक्षण करणारा भगवान शिव” असा होतो. काही ठिकाणी याला “घुश्मेश्वर” असेही म्हटले जाते.
प्राचीन काळी देवगिरी परिसरात सुधर्मा नावाचा ब्राम्हण आणि त्याची पत्नी सुदेहा राहत होती त्यांना मुलं नव्हतं म्हणून सुदेहाने आपली बहीण कृष्णाशी आपल्या पतीचा विवाह लावून दिला. कृष्णा अत्यंत शिवभक्त होती ती रोज 101 शिवलिंग तयार करून त्याची पूजा करत असे आणि नदीत विसर्जन देखील करत असे. काही काळानंतर कृष्णाला पुत्र रत्न प्राप्त झाला. हे पाहून सुदेहाच्या मनात मत्सर निर्माण झाला एका रात्रीत तिने त्या मुलाला ठार मारून त्या नदीत टाकलं. दुसऱ्या दिवशी कृष्णाने शिवपूजा केली आणि देवावरती पूर्ण विश्वास ठेवला. तिच्या अखंड भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिव प्रकट झाले आणि तिचा पुत्र जिवंत केला. त्या ठिकाणी शिवाने ज्योतिर्लिंग रूप धारण केलं आणि भक्त कृष्णांच्या नावावरूनच त्या ज्योतिर्लिंगाला घृष्णेश्वर असे नाव पडले.
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यानंतर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, असे म्हटले जाते. म्हणूनच दरवर्षी येथे भाविकांची खूप गर्दी असते. याशिवाय महाशिवरात्रीला येते खूप मोठा उत्सव देखील पाहायला मिळतो. अनेक भक्त अभिषेक, रुद्राभिषेक आणि विशेष पूजा देखील करून घेतात.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे ज्योतिर्लिंग
दर्शनाने पापक्षालन आणि मनःशांती मिळते असे मानले जाते
श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला विशेष महत्त्व
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील औरंगाबाद (छ. संभाजीनगर) जिल्ह्यातील वेरूळ येथे, एलोरा लेण्यांच्या जवळ स्थित आहे.
Ans: हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे (१२वे) ज्योतिर्लिंग मानले जाते. येथे दर्शन घेतल्याने पापक्षालन होते आणि मनःशांती मिळते, असे मानले जाते.
Ans: सकाळी लवकर किंवा संध्याकाळी दर्शनासाठी शांत वातावरण मिळते. सणांच्या दिवशी मोठी गर्दी असते.






